(Top5) माझी आई निबंध मराठी । My Mother Essay in Marathi

माझी आई निबंध मराठी - My Mother Essay in Marathi : मित्रानो आई ही बाळाचा पहिला गुरु असते. असे म्हटले जाते की 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी'. आई शिवाय एक सुखी जीवनाची कल्पनाच करता येत नाही. बऱ्याचदा शाळा कॉलेज मध्ये माझी आई या विषयवार निबंध लिहिण्यास सांगीतला जातो. 

म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी माझी आई निबंध मराठी - My Mother Essay in Marathi घेऊन आलो आहोत. या लेखात माझी आई विषयावरील तीन निबंध देण्यात आले आहेत. या तिन्ही निबंधांचा आपण अभ्यास करू शकतात. तर चला My Mother Essay in Marathi ला सुरुवात करूया...


माझी आई निबंध

माझी आई निबंध मराठी | Essay on my mother in marathi 

(150 words)

मला माझी आई खूप आवडते कारण ती आई असण्यासोबतच माझी खूप चांगली मैत्रीण देखील आहे. माझी आई नेहमी माझी काळजी घेते. ती रोज सकाळी आमच्यासाठी नाश्ता बनवते आणि माझा शाळेचा डब्बा चविष्ट पदार्थांनी भरून देते. 

ती रोज सकाळी सर्वांच्या उठण्याधीच सर्व व्यवस्था करून ठेवते. माझी आई माझे आरोग्य आणि जेवणाची खूप काळजी करते. ती तिच्या मोकळ्या वेळात मला माझ्या शाळेच्या होमवर्क मध्ये सुद्धा मदत करते. 

मला माझ्या आई सोबत बाजारात जायला खूप आवडते. माझी आई आमच्या सर्वांच्या गरज व इच्छांची खूप काळजी करते. आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती स्वतः कडे सुद्धा दुर्लक्ष करते. माझी आई माझ्या आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या योग्य व्यवस्थेकडे लक्ष ठेऊन असते, तिला कायम आमची काळजी लागलेली असते. 

माझी आई मला कधीही कंटाळा येऊ देत नाही. जरी ती दिवसभर घरात कामे करीत असली तरीही ती कधीही या बद्दल तक्रार करीत नाही. ती कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते. आई ही खरोखर परमेश्वराने दिलेले सर्वात चांगले उपहार आहे. माझी आई मला खूप आवडते व मी कायम तिचे उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असतो. (My Mother Essay)

***


माझी आई निबंध मराठी | Essay on my mother in marathi 

(५०० words)

माझ्या आयुष्यात जर कोणी माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल, तर ती माझी आई आहे. माझ्या आईने मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत, ज्या मला संपूर्ण आयुष्य उपयोगी ठरणार आहेत. आणि म्हणूनच मी अभिमानाने सांगू इच्छितो की माझी आई माझा गुरु व आदर्श असण्यासोबताच माझ्या जीवनाचा प्रेणास्रोत देखील आहे. आई हा शब्द जरी दोन अक्षरांचा असला तरी या शब्दात संपूर्ण सृष्टि समावलेली आहे, आई हा एक असा शब्द आहे ज्याच्या महत्त्वाबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे.

ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी

तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई 

आपण आई शिवाय एका सुखी जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. आईच्या महानतेचा अंदाज याच गोष्टीवरून लावता येईल की एका वेळेला व्यक्ती देवाचे नाव घेणे विसरेल पण आई चे नाव विसरत नाही. आईला प्रेम व करुणे चे प्रतीक मानले जाते. एक आई ही जगभराचे दुख, वेदना आणि कष्ट सहन करून सुद्धा आपल्या मुलाला चांगल्यात चांगली सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करते.  

आई आपल्या मुलांना सर्वाधिक प्रेम करत असते. एका वेळी ती स्वतः उपाशी झोपेल पण आपल्या मुलाबाळांसाठी जेवणाची योग्य व्यवस्था करण्यास विसरणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांची आई एका शिक्षकापासून पालनकर्ता पर्यंत च्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. म्हणूनच आपल्याला आपल्या आईचा कायम सन्मान करायला हवा. कारण एक वेळेला ईश्वर आपल्यापासून नाराज होऊ शकतो पण आई कधीही तिच्या मुलांवर नाराज होत नाही. हेच कारण आहे की आपल्या जीवनात आईच्या या नात्याला इतर सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हटले आहे. 

माझ्या आईचे नाव निलम आहे ती खूपच धार्मिक स्वभावाची स्त्री आहे. ती जास्त शिकलेली नाही आहे. परंतु तरीही तिला सांसारिक गोष्टींचे खूप ज्ञान आहे. घराची कामे करण्यात तिला विशेष आवड आहे. माझी आई घरातील सर्व सदस्यांची योग्य काळजी घेते. मला एक भाऊ आणि बहीण आहेत. आई आम्हा तीनही भाऊ बहिणीला समान प्रेम करते. जर घरात कोणी आजारी पडले तर आई त्याची दिवस रात्र काळजी घेते. अश्या वेळी ती रात्र रात्र जागून आमची काळजी करते. माझी आई एक दयाळू आणि उदार मनाची महिला आहे. ती वेळोवेळी गरिबांना दानधर्म करते. तिला गरीब व गरजू लोकांना अन्न देण्यात आनंद वाटतो. माझी आई दररोज न चुकता मंदिरात जाते व सण उत्सवाच्या दिवशी उपवास देखील करते. 

आई आमच्या चारित्र्य विकासावर विशेष लक्ष देते. तिची इच्छा आहे की आम्ही एक आदर्श नागरिक बनावे. दररोज संध्याकाळी आई आम्हाला धार्मिक बोधकथा सांगते. या कथांद्वारे आमचे भविष्य अधिक उज्ज्वल कसे करता येईल यावर तिचा भर असतो. 

माझ्या आईला सकाळ पासून तर रात्र होईपर्यन्त घराची सर्व कामे करावी लागतात. ती सकाळी 5 वाजता उठते. आमच्या उठण्याआधीच ती आमच्या चहा नाश्त्याची व्यवस्था करून ठेवते. नंतर माझ्या शाळेच्या वेळे आधी ती जेवण व माझा डबा तयार करून देते. आम्हाला शाळेत पाठवल्यानंतर ती मंदिरात जाते. मंदिरातून परत आल्यावर घरातील इतर कामे आवरते. दिवसभर काही न काही काम सुरूच असतात आणि संध्याकाळी पुन्हा तिला स्वयंपाक करावा लागतो. अश्या पद्धतीने माझी आई दिवसभर व्यस्त असूनही ती आमच्यासाठी वेळ काढत असते.

तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते.

तशीच आई घरात असली की

घरातल्या प्रत्येक गोष्टीत गोडी लागते.

देवाने मला अशी जगातील सर्वात चांगली आई दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. व मी कायम परमेश्वराजवळ आईच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असतो.

***


माझी आई विषयावर 10 ओळी | 10 lines on my mother in marath

  1. माझी आई जगातील सर्वात चांगली आई आहे.
  2. माझी आई माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आहे.
  3. माझी आई मला खूप प्रेम करते.
  4. ती माझ्यासाठी स्वादिष्ट व्यंजन बनवते.
  5. मला रोज सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार करते.
  6. माझी आई मला अभ्यासात मदत करते.
  7. मी सुद्धा घराच्या कामात आईला मदत करतो.
  8. माझी आई मला चांगल्या गोष्टी शिकवते.
  9. माझी आई मला दररोज छान छान गोष्टी सांगते.
  10.  माझी आई मला प्रेमाने दादू म्हणते.


माझी आई निबंध मराठी | My Mother Essay in Marathi

(200 शब्द)

जेव्हा मुलगा पहिल्यांदा बोलणे सुरू करतो तेव्हा त्याचा पहिला शब्द आई असतो. लहान मुलांसाठी आई ही सर्वकाही असते. आई शिवाय घर सुनेसुने वाटते. प्रत्येकाच्या जीवनात आईचे भरपूर महत्व असते, म्हणून मोठंमोठ्या लोकांनी आईच्या प्रेमाचा महिमा गायला आहे. जेव्हा आपण जन्माला येतो, मोठे होऊन चालायला लागतो, बोलणे सुरू करतो, शाळेत जायला लागतो या प्रत्येक ठिकाणी आई ही आपल्या सोबतच असते. आईला परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते. असे म्हणतात की देव प्रत्येकाजवळ राहू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवले. आपल्या संस्कृतीती आईला देवी समान पूजनीय मानले जाते.  

आई ही एकच अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या दुःखांना विसरून मुलांच्या सुखासाठी प्रयत्न करते. स्वतःच्या जेवणाआधी ती मुलांना अन्न भरवते. आई ही मुलांना कधीही भुखे झोपू देत नाही, रात्री जर मुलाला झोप येत नसेल तर आई अंगाई गीत गाऊन झोपवते. आई मुलांना राजा राणी व पऱ्यांच्या सुंदर गोष्टी सांगते. आई आपल्या मुलांकडे पाहून नेहमी खुश होते. मुलांना जर थोडे पण दुःख झाले तर ती विचलित होते. आपले सर्व दुःख व चिंताना विसरून ती मुलांचे दुःख आधी दूर करते. अशी ही प्रत्येकाची आई असते. 

आई शब्द ऐकून आपले मन प्रफुल्लित होते. म्हणून ज्या पद्धतीने आई आपली चिंता व देखभाल करते त्याच पद्धतीने आई व वडिलांच्या म्हातारपणात आपण देखील त्याची देखभाल करायला हवी.

***


तर मित्रांनो हे होते माझी आई निबंध मराठी - Essay on my mother in marathi. या निबंधांचा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता My Mother Essay in Marathi या लेखात उत्तम निबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे. आशा आहे आपणास हे निबंध आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद... 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने