जागतिक महिला दिनानिमित्त भाषण । 8 March Women's Day Speech in Marathi

जागतिक महिला दिन मराठी भाषण | mahila din bhashan in Marathi

Women's Day Speech in Marathi: सर्वाना नमस्ते महिला दिनाच्या आजच्या या शुभ मुहूर्तावर तुम्हाला देत आहोत महिला दिन मराठी भाषण. हे भाषण आपण शाळा कॉलेज तसेच Mahila din Marathi Speech समारंभ मध्ये देऊ शकतात




महिला दिन मराठी भाषण (mahila din speech in marathi)

नमस्कार अंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. आज महिला सशक्तीकरणाच्यां अनेक गोष्टी केल्या जातात. परंतु खऱ्या प्रमाणात महिला सशक्तीकरण काय आहे हे कोणालाच माहीत नाही. महिला सशक्तीकरण ही एक विवेकपूर्ण प्रक्रिया आहे. परंतु आपण अतिमहत्तवाकांक्षेलाच सशक्तीकरण समजले आहे. 


मला असे वाटते की जो पर्यंत महिलांची दशा सुधारत नाही, तो पर्यंत महिला दिवसाचे औचित्य साधले जाणार नाही. महिला धोरण आहे परंतु त्याची अंमलबजावणी गंभीरतेने होत आहे? आज हे पाहायला हवे की महिलांना त्याचे अधिकार प्राप्त होत आहेत की नाही. वास्तविक महिला सशक्तीकरण तेव्हाच होईल जेव्हा स्त्रिया आर्थिक रूपाने आत्मनिर्भर होतील आणि त्यांच्यात काहीतरी करून दाखवायचा आत्मविश्वास जागृत होईल. 


हे महत्त्वाचे आहे की महिला दिवस चे आयोजन फक्त एक समारंभ म्हणून राहता कामा नये. हे शुभ संकेत आहेत की महिलांमध्ये आपल्या अधिकाराविषयी समझ विकसित झाली आहे. आपली शक्ती लक्षात आल्याने, महिला घरेलु अत्याचारापासून सुटका मिळवू शकतात.


आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये लिहिले आहे की ज्या ठिकाणी महिलेचा सन्मान होतो तेथे देवता वास करतात, तसे पाहता स्त्रियांना संपूर्ण जगात सन्मानाच्या दृष्टीने पाहिले जाते पण भारतीय संस्कृतीत स्त्रियाचे विशेष स्थान आहे. परंतु अजूनही भारतीय समाजात दोन प्रकारच्या स्त्रिया आहेत यात एकीकडे दबावलेली, अशिक्षित, मागे पळलेली स्त्री आहे तर दूसरी कडे प्रगतीपथावर पुढे जाणारी महिला आहे. बऱ्याच बाबीमध्ये तर पुरुषां पेक्षाही महिला अग्रेसर आहेत. 


आज एकीकडे महिलांच्या पिछळेपणा, शोषण, कुपोषण आणि कष्टदायक जीवनाला पुरुषप्रधान समाज जवाबदार ठरवला जातो.  पण हे सुद्धा कटू सत्य आहे की अनेकदा महिलाच महिलांच्या पिछळेपणासाठी जवाबदार असतात आणि हे सुद्धा सत्य आहे की महिलांच्या तुलनेत पुरुषांनीच महिलां शक्तीला सहजतेने स्वीकार केले आहे. 


घरातील चुलीमधून बाहेर येऊन व्यवसाय, साहित्य, प्रशासन, पोलिस, सैन्य विभाग, खेळ इत्यादी क्षेत्रामध्ये महिलांनी यश मिळवले आहे. जगातील बऱ्याच देशां मध्ये राष्ट्राध्यक्ष महिला आहेत.


आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसावर महिलांची ही सफलता मनाला आनंद देते. अश्यात हे गरजेचे आहे की आज महिला पुरुष प्रतिस्पर्धा स्थापित न करता. एक दुसऱ्याच्या सहयोगाने समाज व देशाचा विकास करायला हवा. विशेष रूपाने आज ग्रामीण क्षेत्रातील महिलाच जीवन सुधारण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण क्षेत्रात अधिकाधिक महिलांना शिक्षित करून त्यांचे हक्क समजवायला हवेत. जेणेकरून त्या घरेलु अत्याचारापासून दूर राहतील.


तर हे होते महिला दिनाचे भाषण. आशा आहे की हे Women's Day Speech in Marathi तुम्हाला ठरेल धन्यवाद..  

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने