ताजमहल बद्दल मराठी माहिती | Taj mahal information in Marathi

ताजमहाल संपूर्ण मराठी माहिती (Taj mahal information in marathi)

जगातील सात आश्चर्यामध्ये समाविष्ट आपल्या देशातील ताजमहाल त्याची भव्यता आणि सुंदरतेमुळे जगभरात ओळखले जाते. ताजमहाल ला प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते. असे म्हटले जाते की ताज महाल मुघल बादशाह शाहजहान याने आपली पत्नी मुमताज महल ची आठवण म्हणून बनवले होते. 

आजच्या या लेखात आपण ताजमहाल ची मराठी माहिती | Taj mahal information in Marathi मिळवणार आहोत. तर चला आजच्या या लेखाला सुरू करू.


Taj mahal marathi information

ताजमहाल मराठी माहिती | Taj mahal mahiti in marathi

ताज महाल हे भारताच्या आग्रा शहरात स्थित एक प्राचीन महल आहे. याला जगाच्या सात आश्चर्या मध्ये समाविष्ट केले आहे. ताजमहाल चे निर्माण मुगल बादशाह शहाजहान याने आपली पत्नी मुमताज महल च्या आठवणीत केले होते. ताजमहाल अतिउत्तम मानवी कृती पैकी एक आहे, याला पांढर्या संगमरवर पासून बनवण्यात आले आहे. ताजमहाल बद्दल सांगितले जाते की त्याच्या निर्माण कार्यानंतर शहाजान ने ताजमहाल बनवणाऱ्या कारागिरांचे हात कापून टाकले होते. या मागे त्याचा उद्देश होता की ताजमहल सारखी दुसरी इमारत जगात कुठेही बनायला नको. 


ताजमहलचा इतिहास (Taj mahal history in Marathi)

ताजमहालाच्या निर्माणाचे श्रेय मुघल शासक शाहजहान ला दिले जाते. शाहजहान याने भारतावर इसवी सन 1628 ते 1658 पर्यंत शासन केले. 


शहाजहानने आपल्या सर्व पत्न्यापैकी प्रिय पत्नी मुमताज महल च्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून "मुमताज का मकबरा" म्हणजेच ताजमहाल चे निर्माण केले.


1631 मध्ये शहाजहानने ताजमहाल च्या निर्माण कार्याची घोषणा केली व 1632 मध्ये ताजमहाल चे निर्माणकार्य सुरू झाले. 


ताजमहाल च्या निर्माण मध्ये जवळपास 11 वर्षे लागली व 1643 मध्ये याचे निर्माण कार्य पूर्ण झाले. परंतु याच्या सर्व बाजूंवर काम पूर्ण करण्यात आणखी 10 वर्षाचा कालावधी लागला. 


ताजमहालच्या निर्माण कार्यात 1653 साली 320 लाख रुपये खर्च लागला. ज्याची आजच्या काळात किंमत 52.8 अरब रुपये आहे. 


ताजमहालचा निर्माण कार्यात 20000 कारागीरांना लावण्यात आले होते व असे म्हटले जाते की शहाजहानने ताजमहल चे कार्य पूर्ण झाल्यावर सर्व कारागिरांचे हात कापून टाकले होते. 


ताजमहाल ची रचना 

ताजमहल ची रचना प्राचीन मुघल कलांवर आधारित आहे. ताजमहाल च्या निर्माण कार्यात बहुमूल्य व महागडे पांढरे संगमरवर वापरण्यात आले होते. या शिवाय लाल व इतर लहान मोठे 28 प्रकारचे दगड गोटे वापरण्यात आले आहेत. ये दगड चमकदार व कधीही काळे न पडणारे आहेत. यातील काही दगडे रात्रीच्या अंधारात चमकतात.


जगातील सर्वात सुंदर इमारत असलेल्या ताज महालाच्या भिंतीवर सुंदर नक्षी करण्यात आल्या आहेत. ताज महालाच्या वरच्या बाजूला 275 फूट उंच विशाल गुंबद बनवण्यात आले आहे, हे गुंबद ताजमहलच्या सुंदरतेला आणखी वाढवते. 


ताजमहाल च्या या गुंबदांखाली दोन प्रेमी शहाजहान व मुमताज महाल ची कब्र बनवण्यात आले आहे. अर्धगोलाकार आकारात असलेल्या ताजमहालाची सुंदरता आणि भव्यता पाहून प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन जातो. 


1) ताजमहालचे एन्ट्री गेट 

जगातील सर्वात सुंदर इमारत असलेल्या ताजमहालचे मुख्य प्रवेश द्वार दक्षिण दिशेला आहे. या द्वाराची उंची 151 फूट आणि रुंदी 117 फूट आहे. 

2) गुंबद

मुमताज महल च्या शिखरावर पांढरा संगमरवराने बनलेले एक विशाल गुंबद आहे. हे गुंबद एका उलट्या कलश प्रमाणे सुशोभित आहे. 

3) कलश

इसवीसन 1800 मध्य ताजमहालचा शिखरावर असलेल्या गुंबदांवरील कलश सोन्याचा होता. परंतु यानंतर याला कास्या पासून बनवण्यात आले. या कलशावर चंद्राची आकृती बनवण्यात आली आहे. चंद्रमा ची आकृती व कलशचे टोक मिळून त्रिशूळ चा आकार तयार होतो. हिंदू मान्यतेनुसार त्रिशूळ भगवान शंकर ला दर्शवतो. 

4) ताजमहल च्या बाहेरील उद्यान

जगातील सात आश्चर्य मध्ये समाविष्ट ताजमहल च्या आजूबाजूला सुंदर बगीचे बनवण्यात आले आहेत. ताजमहल च्या दोघी बाजूंना चार सुंदर बगीचे बनवण्यात आले आहेत. ताजमहल पहायला येणारे पर्यटक या ठिकाणी फोटो वैगरे काढतात.


बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा <<वाचा येथे


तर मित्रहो ही होती Taj Mahal Marathi information अशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद...

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने