गाजलेल्या उत्कृष्ट मराठी कादंबरी ची यादी | Best Marathi Kadambari List

Best Marathi Kadambari List: मित्रानो आजच्या आधुनिक युगात वाचन खूप कमी झाले आहे. परंतु वाचनाचे महत्व आजही जसेच्या तसे आहे. 'वाचाल तर वाचाल' ही म्हण अशीच नाही आहे. आपल्या मराठी साहित्यात अतिशय महान साहित्यिक होऊन गेलेत. ज्यांच्यामुळे मराठी साहित्य क्षेत्रात महत्वाचे परिवर्तन घडून आले. 

आज आपण काही उत्कृष्ट मराठी कादंबऱ्याची यादी मिळवणार आहोत. या Best Marathi Kadambari List प्रत्येक वायातील लोकांसाठी वाचनीय आहेत. तुम्ही यांना ऑनलाइन ebook च्या माध्यमाने वाचू शकतात या शिवाय तुम्ही पुस्तकाच्या फोटोवर क्लीक करून त्यांना ऑनलाइन खरेदी करू शकतात.   



  • list of Kadambari marathi books

1) ययाति (Yayati Kadambari)

लेखक: विष्णू सखाराम खांडेकर

पुस्तकाची थोडक्यात माहिती

'ययाति' मराठी भाषेतील एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे. ययाति ही महाभारतातील राजा ययाति व देवयानी यांची प्रेमकथा आहे. लेखक वि. स. खांडेकर नुसार ययाती कादंबरी ही ययाती ची कामकथा, देवयानी ची संसारकथा, शर्मिष्ठाची प्रेमकथा आणि कचाची भक्तिगाथा आहे. या कादंबरीला उत्कृष्ट मराठी साहित्याबद्दल ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 


देवयानी आणि शर्मिष्ठा या दोघी मैत्रिणी असतात व दोघंही यायाती राजाच्या प्रेमात पडतात. काही कारणामुळे यायातीचा विवाह देवयानीशी होतो व शर्मिष्ठा ही त्यांची दासी बनून येते. यानंतर शर्मिष्ठा व ययाति दोघेही पुन्हा एकदा प्रेमात पडतात. ययाती वासनेच्या या जाळेत अडकून सर्व नैतिक नियमांना विसरून जातो. आता हा कामुक, लंपट आणि संयम नसलेला ययाति वासनेच्या जाळ्यामधून कसा बाहेर निघेल? त्याला आपली चूक लक्षात येईल की नाही? हे तुम्हाला कादंबरी वाचल्यावर लक्षात येईल.


2) मृत्युंजय (Mrityunjay Kadambari)

लेखक: शिवाजी सावंत

पुस्तकाची थोडक्यात माहिती 

मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मृत्युंजय ही कादंबरी भारतीय कथा साहित्यामध्ये एका चमत्काराप्रमाणे आहे. या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मृत्युंजय ही कादंबरी महाभारतातील पात्र महारथी दानवीर कर्ण यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे. कर्णाबद्दल असलेल्या महाभारतातील कथा या कादंबरीत सांगितल्या गेल्या आहेत. शिवाजी सावंतद्वारे रचित मृत्युंजय ही करणाची अमरगाथा आहे. 


3) छावा (chava Kadambari)

लेखक: शिवाजी सावंत

पुस्तकाची थोडक्यात माहिती

छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आणखी एक अजरामर कादंबरी आहे. ही कादंबरी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवन पटावर लिहिलेली आहे. छत्रपती संभाजी हे शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव होते. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे ते फार पराक्रमी होते. शिवाजी सावंत यांनी आपल्या या कादंबरी मध्ये संभाजी राजांचे संपूर्ण जीवन चरित्र मांडले आहे. 


4) श्रीमान योगी (shriman yogi Kadambari) 

लेखक: रणजित देसाई

पुस्तकाची थोडक्यात माहिती

'श्रीमान योगी' हे महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेले आत्मचरित्र आहे. या पुस्तकात रणजित देसाई यांनी शिवाजी महाराजांचे शौर्य व संपूर्ण जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले आहे.


5) श्यामची आई (Shyamchi Aai Kadambari)

लेखक: साने गुरुजी

पुस्तकाची माहिती

पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्यात सानेगुरुजी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. आपल्या आई बद्दल असलेले प्रेम भक्ति व कृतज्ञता श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेली आहे. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल हे पुस्तक एक सत्यकथा आहे. नाशिकच्या तुरुंगात असताना साने गुरुजींनी हे पुस्तक अवघ्या पाच दिवसात लिहून संपवले होते.


6) पानिपत (Panipat Kadambari)

लेखक: विश्वास पाटील

पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती

पानिपत ही कादंबरी मराठा व अहमद शाह दुराणी (अफगाणी सैन्य) यांच्यात घडलेला पानिपतची तिसरी लढाई वर आधारित आहे. मराठा सैन्य सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली लढले. या पुस्तकात मराठा सैन्याचे शौर्य वर्णित करण्यात आले आहे.


7) एक होता कार्व्हर (Ek hota carver)

लेखिका: वीणा गवाणकर

पुस्तकाची थोडक्यात माहिती

एक होता कार्व्हर हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र आहे. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास लेखिकेने अतिशय मार्मिकपणे रेखाटलेला आहे. व्यक्तीचे मोठेपण त्याच्या बाह्यसौंदर्यापेक्षा त्याचे गुण, प्रतिभा व आत्मिक सौंदर्यावर जास्त प्रमाणात अवलंबून असते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर होय. 


8) माझे सत्याचे प्रयोग (Maze satyache prayog) 

लेखक: महात्मा गांधी

पुस्तकाची थोडक्यात माहिती

माझे सत्याचे प्रयोग हे भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र आहे. गांधीजीनी जीवनभर कशा पद्धतीने वाटचाल केलेली याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहे. 

या पुस्तकात लहानपणापासून ते 1921 पर्यंतचे गांधीजी आयुष्य रेखाटले आहे. दर आठवड्याला थोडे थोडे या प्रमाणे हे पुस्तक लिहिले गेले आहे.


तर मित्रहो ह्या होत्या मराठी भाषेतील गाजलेल्या व उत्कृष्ट कादंबऱ्या आशा करतो marathi kadambari आपणास आवडल्या असतील. ही यादी आपले वाचक मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद



Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

  1. अभिषेक साळुंखे यांची शौर्यशृंग ही रहस्यमय कादंबरी वाचा. अलीकडच्या काळात प्रकाशित झालेली सर्वात उत्तम कादंबरी आहे ती. रहस्यांनी काठोकाठ भरलेली आणि विस्मयकारक.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने