संत गाडगेबाबा मराठी माहिती। Sant Gadge baba information in marathi.

संत गाडगेबाबा माहिती मराठी (Sant gadge maharaj marathi mahiti)

आधुनिक भारताचे महान संत आणि समाज सुधारक डेबूजी झिंगराजी जाणोरकर ज्यांना गाडगेबाबा किंवा संत गाडगे महाराज या नावाने देखील ओळखले जाते. गाडगेबाबा महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक गावामध्ये भटकंती केली. समाज सुधारणा, शिक्षण आणि स्वच्छता या विषयामध्ये त्यांची विशेष रुची होती. आजच्या या लेखात तुम्हाला संत गाडगे महाराज यांच्या बद्दल माहिती (Gadge baba information in marathiमिळणार आहे.


sant gadge baba information in marathi, sant gadge maharaj story marathi gadge baba marathi

संत गाडगे महाराज जीवन परिचय (sant gadge maharaj story marathi)

संत गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये शिवरात्रीच्या दिवशी महाराष्टातील अमरावती जिल्ह्यातल्या शेणगाव येथे परीट (धोबी) जाती मध्ये झाला. त्यांचे जन्म नाव डेबू असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. 


त्यांच्या वडिलांना दारूची सवय होती. यामुळे त्यांचे स्वस्थ खराब असायचे, घराची परिस्थिती पण अतिशय हलाखीची होती. डेबुजी यांचे बालपण त्यांच्या मामांकडेच गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती, डेबूजीनां लहानपणापासून शेती व गुरांची निगराणी राखायला आवडत असते. लहान असतांनाच डेबुजीचे वडील दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने लहानपणापासूनच गुरे चारणे, शेत नांगरणे, शेती करणे तसेच गावातील इतर कामे डेबुजी करू लागले. 


गाडगे बाबा गृहत्याग व सामाजिक कार्य

नंतरच्या काळात घरदार सोडून गाडगे महाराज संसार सुधारण्यासाठी घराबाहेर पडले. स्वच्छता हा त्यांच्यातील विशेष गुण होता. गावात कोठेही काम असो गाडगे महाराज स्वतः हून पुढे यायचे. सार्वजनिक हिताची कामे सर्वांनी एकत्र येऊन करायला हवीत असे त्यांचे मत होते. घर सोडल्यानंतर जिकडे रस्ता दिसेल तिकडे ते चालत चालत निघाले. गाडगे बाबा फाटलेले कपडे आणि अंगावर एक जुनी चादर पांघरून पायी प्रवास करत असत. त्यांच्या एका हातात काठी व दुसऱ्या हातात एक मातीचे गाडगे असायचे ज्यात ते जेवण करत असत. त्यांचे असे रूप पाहून लोक त्यांना भिकारी समजत असत. बऱ्याचदा त्यांना लोकांद्वारे अपमानित पण व्हावे लागले. परंतु त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.


गाडगे बाबा ज्या गावात पोहचत असत त्या गावाला झाडून स्वच्छ करायचे. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, शैक्षणिक सुधारणा, जातिभेद, अस्पृश्यता, व्यसनमुक्ती, प्राणीहत्या इत्यादी विषयावर त्यांनी आपले प्रवचन केले. देव दगडात नसून माणसात आहे असे ते सांगत असत. 


संत गाडगेबाबांनी अनेक तीर्थस्थानांवर मोठमोठ्या धर्मशाळा स्थापित केल्या. गरीब यात्रेकरूंना मोफत राहण्याची व्यवस्था त्यांनी केली. नाशिक मध्ये त्यांनी बनवलेल्या धर्मशाळेत 500 लोक एक सोबत राहू शकतात. या शिवाय अपंग लोकांसाठी पण ते कपडे, भांडे अश्या वस्तू वाटत असत. 


संत गाडगे बाबा द्वारे स्थापित 'गाडगे महाराज मिशन' आज पण समाज सेवेत कार्यरत आहे. अश्या हे मानवतेचे महान उपासक 20 डिसेंबर 1956 ला ब्रह्मलीन झाले.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून मी bhashan marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने