घरातील उंदीर घालवण्याचे घरगुती उपाय [Undir Marnyache Upay]

उंदीर मारण्याचे घरगुती उपाय [उंदीर घालवण्याचे उपाय] Undir marnyache upay  जेव्हा केव्हा तुम्ही घरात उंदरांना पाहत असाल तेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न नक्की येत असेल की उंदरांना घरातून घालवण्यासाठी काय उपाय करायला हवा. भारतातील अधिकांश घरांमध्ये उंदरांची समस्या सामान्य आहे. उंदीर घरातील धान्याची नास धुस तर करतातच पण याशिवाय ते मलमुत्रा द्वारे गंदगी व रोग वाढवतात. म्हणूनच आज आपण उंदीर मारण्याचे घरगुती उपाय जाणणार आहोत. याशिवाय आपण उंदीर मारल्याशिवाय घरातून बाहेर कसे घालवावे याबद्दल पण माहिती मिळवणार आहोत.


उंदीर मारण्याचे घरगुती उपाय

पुदिना: 

स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या पुदिन्याची गंध तुम्हा सर्वांना आवडत असेल. परंतु हेच पुदिन्याचे तेल उंदरांसाठी घातक असते. तर चला जणुया उंदीर मारण्यासाठी पुदिन्याचे उपयोग.

कृती-

सर्वात आधी 30 थेंब पुदिन्याचे तेल एका कटोरी मध्ये जमा करा. आता या तेलात कापसाचे तुकडे बुडवून या तुकड्यांना उंदीर येत असलेल्या जागेवर ठेवावे. पुदिन्याच्या वास उंदीर ती जागा सोडून देतील नाहीतर मारून जातील.


नँपथलीन बॉल्स (मोथ बॉल्स)

बाजारात येणारे सुगंधित नँपथलीन बॉल्स. या बॉल्स ला कपड्यांचा वास येऊ नये म्हणून कपड्यांमध्ये ठेवले जाते. हे बॉल कमी किमतीत बाजारात मिळून जातात. उंदीर मारण्यासाठी किंवा पळवून लावण्यासाठी या बॉल्स ला त्या जागी ठेवावे जेथे उंदीर येतात.


प्लास्टर ऑफ पॅरिस

प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये कोको पावडर (चॉकलेट पावडर) मिळवून एक मिश्रण तयार करावे. या मिश्रणाला उंदीर येणाऱ्या जागी ठेवावे. उंदीर चॉकलेटकडे आकर्षित होतात व हे मिश्रण खाऊन त्यांचा मृत्यू होतो.


लाल मिरची

उंदीर मारण्यासाठी लाल मिरची खूप उपयुक्त आहे. तिखट लाल मिरचीच्या वासाने उंदीर येत नाहीत. ज्याठिकाणी उंदरांचे प्रमाण जास्त असेल तेथे मिरची चे तुकडे तोडून टाकून द्यावे. या प्रक्रियेने तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.


उंदीर पकडण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे पिंजरा.

जर तुम्हाला उंदीर मारायचे नसेल आणि त्याच्यापासून सुटकाही मिळवायचे असेल तर बाजारात येणारा माऊस ट्रॅप म्हणजेच उंदीर पकडण्याचा पिंजरा तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या पिंजऱ्यात पोळीचा तुकडा किंवा इतर कोणताही खाद्यपदार्थ ठेवावा. अन्न पाहून उंदीर या जाळ्यात फसून जातो व त्याला बाहेर निघता येत नाही. यानंतर तुम्ही गावाबाहेर पिंजरा नेऊन त्याचे झाकण उघडू शकतात व उंदराला घरापासून दूर करू शकता.


उंदीर पळवण्यासाठी घरगुती उपाय-

  1. नेहमी आपल्या घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी. उंदराला लपण्यासाठी जागा निर्माण होऊ देऊ नका. 
  2. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या ठिकाणी उंदीर लपू शकतो, तर लगेच अश्या जागांना बंद करा.
  3. घरातील कचरा कुंडीला नेहमी स्वच्छ करीत रहा जास्तवेळ कचरा राहू दिल्याने उंदीर त्यात अन्न शोधायला येतात.
  4. किचन किंवा घरातील कोणत्याही रूम मध्ये अन्न उघडे पडू देऊ नका.
  5. शक्य होईल तर घरात एक मांजर पाळा. मांजरीला पाहून उंदीर घरात येण्याची हिंमत करीत नाही.
  6. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या जागी उंदीर आला आहे तर लगेच त्या जागेला फिनायील ने स्वच्छ करा.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने