मराठी म्हणी व त्याचे अर्थ | Marathi mhani with meaning

आजच्या या लेखात आपण मराठी म्हणी व म्हणी व त्याचे अर्थ पाहणार आहोत. म्हणी या शाळा कॉलेज तसेच विविध स्पर्धा परीक्षामध्ये मोठ्या प्रमाणात विचारल्या जातात. या Marathi mhani with meaning मध्ये शरीराच्या अवयवांवर जसे जीभ, गळा इ. म्हणी, जुन्या ऐतिहासिक, शैक्षणिक व विनोदी म्हणी संग्रहित आहेत. म्हणींना इंग्रजी भाषेत proverbs म्हटले जाते. आज आपण proverbs in Marathi पाहणार आहोत.



म्हणी म्हणजे काय?

आपल्या संस्कृतीत "म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी" असेही म्हटले जाते. 'दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे व मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य' म्हणजे म्हण होय. 

म्हणीची ही वाक्य चटकदार, आटोपशीर व बोधप्रद असतात. म्हणीची रचना यमक, अनुप्रासयुक्त असल्याने त्यांना लक्षात ठेवणे सोपे जाते. आता आपण Marathi Mhani List पाहूया या.  

मराठी वाक्यप्रचार व अर्थ वाचा येथे.. 


म्हणी व त्याचे अर्थ- Marathi mhani with meaning

  • अति तिथे माती- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो.
  • अती शहाणा त्याचा बैल रिकामा- जो माणूस फार शहाणपण करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. 
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी- शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.
  • असतील शिते तर जमतील भूते- आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या सभोवती माणसे गोळा होतात.
  • आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी- जेथे मदतीची गरज आहे, तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे.
  • आगीतून फुपाट्यात- लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे.
  • आधी पोटोबा मग विठोबा- आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे.
  • अंथरूण पाहून पाय पसरावे- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा.
  • आवळा देऊन कोहळा काढणे- 
  • क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. 
  • आयत्या बिळात नागोबा- दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे.
  • आलिया भोगासी असावे सादर- जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे.
  • आपला हात जगन्नाथ- आपले काम पार पाडण्यासाठी स्वतः कष्ट सोसणे योग्य ठरते.
  • आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार- जे मुळात अस्तित्वातच नाही त्यांची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
  • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन- किमान लाभाची अपेक्षा केली असताना, अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे.
  • इकडे आड, तिकडे विहीर- दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.
  • उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग- उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
  • उचलली जीभ लावली टाळ्याला- विचार न करता वाटेल ते अमर्यादितपणे बोलणे.
  • उथळ पाण्याला खळखळाट फार- ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाया मारतो.
  • ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये- एखादी गोष्ट आवडली असली तर तिचा अति लोभ बाळगू नये.
  • एक ना धड, भाराभर चिंध्या- एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्याने शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.
  • एका हाताने टाळी वाजत नाही- कोणत्याही भांडणात, भांडणारे दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात.
  • ऐकावे जनाचे करावे मनाचे- कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे.
  • कर नाही त्याला डर कशाला- ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. 
  • करावे तसे भरावे- दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
  • कामापुरता मामा- गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस.
  • काखेत कळसा गावाला वळसा- हरवलेली वस्तू जवळ असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे.
  • कानामागून आली आणि तिखट झाली- एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे.
  • काळ आला होता, पण वेळ आली नव्हती- एखादे घोर संकट येऊनही त्यातून सहीसलामत सुटणे.
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही- क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे काहीही नुकसान होत नाही. 
  • कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ- आपलाच मनुष्य आपल्या नुकसानाला कारणीभूत ठरतो.
  • कुठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभटाची तट्टाणी- अति थोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊ शकत नाही.
  • कोळसा उगाळावा तितका काळाच- दुष्ट माणसा बाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्य उजेडात येतात.
  • कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही- निश्चित घडणारी घटना, कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
  • कोंड्याचा मांडा करुन खाणे- हलाखीच्या अवस्थेत, आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे.
  • कोल्हा काकडीला राजी- सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात.
  • खाई त्याला खवखवे- जे वाईट काम करतो, त्याला मनात धास्ती वाटते.
  • खाण तशी माती / बाप तसा बेटा / कुंभार तसा लोटा- आई-वडिलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे.
  • खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी- एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे या पैकी एकाचीच निवड करणे.
  • खायला काळ, भुईला भार- निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.
  • गरजवंताला अक्कल नसते- गरजू माणसाला प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते.
  • गर्वाचे घर खाली- गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो.
  • गरज सरो, वैद्य मरो- आपले काम संपताच उपकार करत्याला विसरणे.
  • गरजेल तो पडेल काय?- केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही.
  • गाढवाला गुळाची चव काय?- अडण्याला चांगल्या गोष्टींचे मोल कळत नाही.
  • गाव करी ते राव न करी- जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात, ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशांच्या बळावर करू शकणार नाही. 
  • गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली- एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाहीतर तिचा वेगळा वापर करून घेणे.
  • गुरुची विद्या गुरुलाच फळली- एखाद्याच्या डाव त्यांच्यावरच उलटने.
  • गोगल गाय अन् पोटात पाय- एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.

मित्रांनो या होत्या मराठी भाषेतील काही प्रसिद्ध म्हणी व त्यांचे अर्थ जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेन्ट करून विचारा. 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने