[उत्तम] मराठी उखाणे नवरदेवासाठी | Marathi ukhane for male romantic

Marathi ukhane for male romantic : आयुष्यातील आनंदी क्षणांपैकी लग्नाचा क्षण हा नवरदेव नवरी सोबतच कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही महत्वाचा असतो. लग्नाच्या या दिवसांमध्ये खूप मौज मस्ती केली जाते. परंतु या सोबतच मोठी जवाबदरीही पार पाडावी लागते. लग्नाच्या या दिवशी मराठी उखाणे घ्यायला सांगितले जाते. नवरी तरी आपल्या मैत्रिणींना विचारून उखाणे आठवण करून ठेवते पण नवरदेवला काय उखाणे घ्यावे लक्षात येत नाही म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत नवरदेवासाठी लग्नाचे एकदम नवीन, गमतीदार, खास असे मराठी उखाणे. 

हे सर्व मराठी उखाणे नवरदेवासाठी खूप उपयुक्त ठरतील. आम्ही दिलेल्या या उखाण्यामध्ये Marathi ukhane for male romantic, smart, modern, funny, chavat, non veg इत्यादि प्रत्येक श्रेणीतील उखाणे आपल्याला वाचवायला मिळतील.

READ MORE > लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


मराठी उखाणे नवरदेवासाठी

उखाणे मराठी नवरदेव | marathi ukhane for male romantic


चंद्राला पाहून भरती येते सागराला

.... ची उत्तम साथ मिळाली माझ्या जीवनाला.


आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा

.... नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.


प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पुल,

.... च्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भुल.


भाजीत भाजी मेथीची

.... माझ्या प्रितीची.


ती सोबत असली की खराब मुड होतो बरा

.... मुळे कळला जगण्याचा आनंद खरा.


गोऱ्या गोऱ्या गालावरती तिळ काळा काळा

.... च्या गोल हास्याचा मला लागले लळा.


गणेशाची मी करितो आरती

... माझ्या जीवनाची सार्थी.


तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी,

बघताच क्षणी प्रेमात पडलो .... ची लाल ओढणी.


जुईच्या वेलीवर लागली सुगंधित नाजुक फुले

.... ने मला दिली दोन गोड मुले.


ती आली की पैंजण छुम छुम वाजते

.... माझी किती गोड लाजते.


मी आणि .... प्रेमाचे बंध बंधू तुमच्या आणि 

सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सुखाने नांदू.


सासू माझी प्रेमळ सासरे माझे दयाळू

.... माझी खूपच मायाळू.


उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात

सोन्याचा हार माझ्या .... च्या गळ्यात.


प्रेमाच्या चौकात किती पण फिरा

शोधून नाही सापडणार .... सारखा हिरा.


दवबिंदूनी चमकतो फुलांचा रंग

सुखी आहे संसारात .... संग.


झुळझुळ पाण्यात हळू हळू चाले होळी,

शोभून दिसते सर्वांमध्ये .... व माझी जोडी.


मुद्दाम नाही करत नकळत हे घडते

माझे मन रोज नव्याने .... च्याच प्रेमात पडत. 


एका वर्षात महिने असतात 12

.... वाढलाय आनंद सारा.


लहानसहान गोष्टींनीही आधी व्हायचो त्रस्त,

.... आल्यापासून झालंय आयुष्य खूप मस्त.


माधुरीच्या अदा आणि कतरीनाचे रूप,

.... प्रत्येक गोष्ट मला भावते खूप.


फुलांच्या तोरणात आंब्याचे पान

.... च्या रूपाने झालो मी बेभान.


सोन्याच्या कपावर चांदीची बशी,

.... समोर फिक्या पडतील रंभा आणि उर्वशी.


एक दोन तीन चार 

.... वर आहे माझे प्रेम फार.


मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध,

.... मुळे कळला मला जीवनाचा आनंद.


हत्तीच्या अंबारीला मखमली झुल

.... माझी नाजूक जसे गुलाबाचे फुल.


जाई च्या वेणीला चांदीची तार

.... माझी म्हणजे लाखात एक नार.


नभांगणी दिसे शरदाचे चांदणे

.... चे रुप आहे खूपच देखणे.


चांदीच्या ताटावर सोन्याचे ठसे

.... ला पाहून चंद्र सूर्यही आनंदाने हसे. 


नंदन वनात आहेत अमृताचे कळस

.... माझी आहे खूपच सालस.


कोकिळेचा आवाज वाटतो खूपच गोड,

.... ला जपतो मी जसा तळहाताचा फोड.


चांदीच्या कढईत सोन्याचा झारा

.... चा स्वभाव मला खूपच प्यारा.


दोन शिंपल्यांच्या कुशीत वाढतो टपोरा मोती,

.... ची व माझी अशीच राहो अखंड प्रीती.


उंदीर राहतो ती जागा असते बीळ,

घायाळ करतो .... च्या गालावरचा तिळ.


.... आणि माझे नाते आंबा कैरीची फोड 

आंबट वाटला आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड.


पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजिरा,

.... वर शोभून दिसतो सुगंधी मोगर्याचा गजरा.


Comedy, funny ukhane in marathi for male


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान

.... नाव घेतो एका देऊन कान.


सगळी कडे पेरला लसूण 

.... ला चित्रपटाला नेईल बुलेट वर बसवून.


केशर दुधात टाकले काजू बदाम जायफळ,

.... नाव घेतो पिडू नका वायफळ.


डाळीत डाळ तुरीची डाळ,

.... मांडीवर खेळविन एका वर्षात बाळं.


हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू

मी आहे लंबु आणि .... किती टींगु.


संध्याकाळच्या आकाशाचा पिवळा केसरी रंग

.... माझी नेहमी घर कामात असते दंग.


आंब्याला आहे फळांचा राजाचा मान

.... चे घेतोय नाव ऐका देऊन कान.


मैदानात खेळत होतो क्रिकेट,

.... ला पाहून पडली माझी विकेट..!


Smart marathi ukhane male


गाडीत गाडी डेक्कन क्वीन,

.... माझी ब्युटी क्वीन.


ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल

.... चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.


डोळ्यावरची बट दिसते एकदम भारी,

.... माझी झाल्यापासून जळतात बघा सारी.


.... आहे माझी सर्व कलांमध्ये कुशल,

तुमच्या येण्यानं झाला दिवस एकदम स्पेशल.


कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी …

आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी


नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…

चल .... पिक्चरला, सीट पकडू लास्ट


आणखी उखाणे पहा>> Navardevache Ukhane Marathi 

मराठी प्रेम कविता

तर मित्रांनो हे होते Marathi ukhane for male romantic लग्नातील नवरदेवाचे विनोदी, इंग्रजी आणि सोपे मराठी उखाणे. मला आशा आहे की तुम्हाला हे मराठी उखाणे नक्कीच उपयुक्त ठरले असतील. तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद...

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने