माझे आवडते ठिकाण [पर्यटन स्थळ] Maze avadte thikan essay in marahi

Maze avadte thikan : बाहेर फिरायचे म्हटले की प्रत्येक व्यक्ति तयारच असतो. कारण बाहेर फिरण्यात व विशेषतः सुंदर पर्यटन स्थळांना भेट देण्यात वेगळाच आनंद मिळतो. 

आपल्या देशात अनेक वेगवेगळी ठिकाणे आहेत. परंतु आजच्या या लेखात आपण मी भेट दिलेले आणि माझे आवडते ठिकाण काश्मीर बद्दल निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करू majhe avadte thikan मराठी निबंध.


काश्मीर मराठी निबंध 

माझे आवडते ठिकाण निबंध मराठी | kashmir marathi nibandh 

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगले भोजन, चांगले कपडे आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. आणि जर गोष्ट बाहेर फिरण्याची असेल तर व्यक्ती कधीही नाही म्हणत नाही. बाहेर फिरायला प्रत्येकालाच आवडते. आजच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे, बाहेर फिरण्याचा आनंद अनुभवण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. पण जर कधी कोणाला आपल्या शहराबाहेर पर्यटन म्हणून जाण्याची संधी मिळाली, तर प्रत्येकालाच आनंद होतो. पर्यटन फिरायला जाण्याने शरीराचा सर्व थकवा निघून जातो व जीवनाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. 


आपल्या भारतात अनेक सुंदर पर्यटन स्थळ आहेत जेथे फिरायला जाऊन आपण जीवनाचा खरा आनंद मिळवू शकतो. परंतु मी पाहिलेल्या पर्यटन स्थळांपैकी माझे आवडते ठिकाण कश्मीर आहे. मी यावर्षी माझ्या कुटुंबासोबत काश्मीरला गेलो होतो. जसेही आमच्या गाडीने घाटाच्या सीमेत प्रवेश केला, पृथ्वीच्या या स्वर्ग सौंदर्याला पाहून मी थक्क झालो. कोणीतरी म्हटले आहे की कश्मीर भारताचे स्विजरलैंड आहे. तेथे गेल्यावर मला ही गोष्ट खरी जाणवली, खरोखर काश्मीरच्या घाट जगातील सर्वाधिक मोहक आणि रमणीय स्थळ आहे. हे विशाल स्थान हिमालयाच्या मध्यात स्थित आहे. काश्मीर देवतांचे निवासस्थान आहे, येथे विपुल प्रमाणात फळे-फुले, वनस्पती आणि जीवजंतू आढळतात.


याशिवाय येथे अनेक ऐतिहासिक स्मारक, सुंदर चित्राप्रमाणे दिसणारे स्थळ, रम्य दृश्य व हिरवी जंगले आहेत. काश्मीर मध्ये अनेक मंदिरे, देवी-देवता व साधुसंत निवास करतात. येथील नागमोडी वळणाच्या नद्या, मोठमोठे तलाव, विशाल झरणे, बर्फाने झाकलेली पर्वते, सुरुची वृक्ष व सुंदर बगीचे काश्मीरच्या सौंदर्यात अधिकच भर करतात. निशात बाग, चंदन बारी, अनंतनाग, चष्मे शाही, नागिन लेक व शालिमार बाग येथील प्रसिद्ध दर्शनीय स्थळ आहेत. 


येथील विशाल धबधब्यातून पडणारे पाणी मधुर संगीत निर्माण करते. काश्मीरमधील अमरनाथ ची गुहा प्रसिद्ध आहे. येथे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. अमरनाथ मंदिर धरती पासून पंधरा हजार फूट उंचीवर स्थित आहे. याशिवाय काश्मीरमध्ये धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले अनेक तीर्थस्थळ आहेत. दरवर्षी हजारो पर्यटन यात्री या प्राचीन व धार्मिक स्थळांची यात्रा करतात. काश्मीर भारतातील सर्वाधिक सुंदर नैसर्गिक स्थळांपैकी एक आहे. काश्मीरचा संपूर्ण घाट रमणीय आहे. म्हणूनच दरवर्षी भारतासह विदेशातून मोठ्या संख्येत पर्यटक येथे येतात.

--समाप्त--

माझी सहल मराठी निबंध वाचा येथे 


तर हा होता काश्मीर ला भेट दिल्याचा निबंध, मित्रांनो तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून सांगा. 

आता बऱ्याच मित्रांची तक्रार असेल की त्यांनी काश्मीर नाही तर इतर कोणत्या ठिकाणी भेट दिली आहे व त्यांचे आवडते ठिकाण दुसरे काही आहे. तर अश्यात आपण वरील निबंधाला लक्षात घेऊन तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणची माहिती लिहू शकतात. 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने