[मी मुख्यमंत्री झालो तर] निबंध मराठी | Mi Mukhyamantri Zalo tar Essay in Marathi

जर मी मुख्यमंत्री झालो तर मराठी निबंध - Me mukhyamantri zalo tar

मित्रांनो आजच्या या लेखात आपण जर मी मुख्यमंत्री झालो तर या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. ह्या निबंधात जर मी मुख्यमंत्री झालो तर राज्यात काय काय विकास कार्य करेल या बद्दल माहिती दिली आहे. तर चला सुरू करूया.. मी मुख्यमंत्री झालो तर मराठी निबंध | mi mukhyamantri zalo tar marathi nibandh

कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री बनणे एक गौरवशाली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्याकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा असतात. व प्रत्येक राज्यातील जनतेचा विश्वास असतो की त्यांनी निवडलेले मुख्यमंत्री त्यांच्या समस्या सोडवून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतील. मला माहित आहे की लोकशाही मध्ये कोणीही त्याच्या इच्छेने मुख्यमंत्री बनू शकत नाही. परंतु जर भविष्यात कधी आपल्या राज्यातील जनतेने मला मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली तर मी राज्यातील अनेक गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करेल.


जर मी मुख्यमंत्री झालो तर सर्वात आधी आपल्या राज्यातील शिक्षण प्रणाली सुधारेल. शाळा मध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देतात प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देईल. जुन्या शिक्षण पद्धतीत बदल करून शासकीय शाळांना अधिकाधिक प्रगत करेल, जेणेकरून पालक आपली मुले प्रायव्हेट शाळेऐवजी सरकारी शाळेत पाठवतील. व असे केल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगती सोबत भारत शासनालाही फायदा होईल.


जर मी मुख्यमंत्री झालो तर दुसरे कार्य मी शेतकऱ्यांसाठी करेल. देशातील सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी उचित सुविधा उपलब्ध करून देईल. जुन्या पारंपरिक पद्धतीऐवजी मी आधुनिक शेतीवर भर देईल व राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देईल. उत्तम तऱ्हेचे बी आणि शेतीचे यंत्र कमी दरात उपलब्ध करून देईल. गावांमध्ये पक्के रस्ते तयार करेल जेणेकरून सर्व शेतकरी आपले अन्न धान्य शहरात येऊन विकू शकतील. 


आजकाल चारही बाजूंना भ्रष्टाचार वाढला आहे. घोटाळे, भ्रष्टाचार व कालाबाजारी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक ठिकाणी वाढता भ्रष्टाचार देशाच्या विकासासाठी घातक आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर महत्त्वाचे काम भ्रष्टाचार कमी करण्याचे केले असते. जास्तीत जास्त भ्रष्टाचारी नेत्यांची तपासणी करून त्यांना तुरुंगात टाकले असते. माझ्या मंत्री मंडळात एकही भ्रष्टाचारी नेत्याला स्थान दिले नसते व राज्यात कोठेही भ्रष्टाचार होऊ नये म्हणून भ्रष्टाचार विरोधी कठोर कायदे बनवले असते. 


आपल्या देशात आजही खेड्या गावामध्ये योग्य चिकित्सा सेवा उपलब्ध नाही आहे. ज्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडतात. मी मुख्यमंत्री झाल्यावर खेड्यांच्या विकासावर भर दिला असता. प्रत्येक गावात योग्य सरकारी डॉक्टर व नर्स ची व्यवस्था केली असती. या शिवाय राज्यात नाव नवीन उद्योग धंद्यांना प्रोत्साहन दिले असते. जेणेकरून राज्यातील एकही तरुण बेरोजगार राहायला नको. अश्या पद्धतीने मी दिवस रात्र मेहनत करून राज्याचा विकास केला असता.

***

जर मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध वाचा येथे 

तर मित्रांनो हा होता if i became chief minister marathi essay आशा करतो की तुम्हाला me mukhyamantri zalo tar हा मराठी निबंध आवडला असेल, निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...  

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने