माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध] | My village essay in marathi

माझे गाव मराठी निबंध | My village essay in marathi

My village essay in marathi : गांव म्हटले म्हणजे हिरवळ, पक्ष्यांची किलबिलाट, प्राण्यांचे आवाज आणि अद्भुत निसर्ग सौन्दर्य. शहरातील धावपडीच्या जीवनापेक्षा गावातील शांत जीवन कधीही चांगलेच असते. जास्त करून लोकांचा जन्म खेड्या गावातच झालेले असतो. नंतरच्या काळात नौकरी तसेच शिक्षणामुळे त्यांना शहरात वास्तव्यास यावे लागते. परंतु तरीही तुम्हास आपल्या गावचा विसर पडू नये म्हणून ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी (maza gaon nibandh) माझे गाव निबंध मराठी घेऊन आलो आहोत हा निबंध एकदा नक्की वाचा अन आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. 


majhe gaon nibandh

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi 

मी व माझे आई वडील सुट्ट्यांच्या दिवसात गावी जातो. माझ्या गावाचे नाव महाराष्ट्रातील जामखेड आहे. माझे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप लहान आहे. गावात माझे आजी बाबा शेती करतात. तेथे त्यांचे एक घर आहे. मला गावी गेल्यावर खूप शांत आणि आनंदी वाटते. माझ्या गावाच्या चारही बाजूंना हिरवी शेत आहेत. या शिवाय अनेक हिरवी झाडे झुडपे प्रत्येक घरासमोर आहेत. माझ्या गावातील सर्व लोक एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. 


माझ्या गावात एक मोठी नदी आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दुपारी मी या नदीत आंघोळीला जातो. नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे या मंदिराच्या ओट्यावर दररोज संध्याकाळी गावातील वृद्ध लोक बसलेले असतात. या शिवाय गल्लीतील लहान मुले येथे खेळताना दिसतात. माझ्या गावात एक शाळा देखील आहे पण तेथे फक्त पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी मुळे जवळच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरात जातात.


माझ्या गावात प्रसिद्ध भगवान शंकराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिराच्या पटांगणात मोठी जत्रा भरते. भगवान शंकराच्या दर्शनासाठी दुरून दुरून लोक इथे येतात. या दरम्यान गावात कपडे, दागिने आणि खेळणीची मोठमोठी दुकाने लागलेली असतात. म्हणून आजूबाजूच्या गावातील लोक आमच्या गावात येऊन खरेदी करतात. माझ्या गावात खूप सारे मोकळे मैदान आहेत येथे आम्ही क्रिकेट तसेच इतर खेळ खेळतात. माझ्या गावात खूप कमी प्रमनात वाहने चालतांना दिसतात. म्हणून येथील प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे. मला शेतांमध्ये जाऊन बसायला खूप आवडते. माझ्या गावातील हवा खूप शुद्ध आहे. शुद्ध हवे मुळे गावातील सर्व लोक निरोगी आणि दीर्घायुषी आहेत. 


माझ्या गावात आधुनिकीकरण नसल्यामुळे गावातील जास्त रस्ते हे मातीचे आहेत. माझी इच्छा आहे की मी मोठा झाल्यावर इंजिनीयर बनून गावाचे रस्ते व इतर विकासाची कामे पूर्ण करील. मला माझे गाव खूप आवडते. माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे.

--समाप्त--


2) माझे गाव मराठी निबंध | maza gaon nibandh

आपल्या देशाला गावांचा देश म्हटले जाते. यामागील कारण असे आहे की भारतातील लोकसंख्येचा 2 तृतीयांश भाग गावात राहतो. गाव भारताचा पाठीचा कणा आहे आणि गावातील 90 टक्के लोक शेती व पशुपालनावर अवलंबून आहेत. म्हणून भारतातील गाव देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताला कृषिप्रधान देश म्हणूनही ओळखले जाते. गावातील लोक शहरातील लोकांच्या तुलनेत साधारण आणि चिंतामुक्त जीवन व्यतीत करतात. कोणी तरी म्हटले आहे की भारताला जर ओळखायचे असेल तर गावांमध्ये जाऊन पहा. गावांमध्ये अजुनही आपली संस्कृती जिवंत आहे. 


माझ्या गावाचे नाव लोणी आहे. हे गाव जळगाव जिल्ह्यापासून 40 किलोमीटर दूर आहे. माझ्या या गावात सर्व जाती धर्माचे लोक सोबत राहतात. माझ्या गावात जवळपास 300 घरे आहेत आणि येथील लोक मोठ्याप्रमाणात शेत व्यवसाय करतात. माझ्या या गावात कोणताही कार्यक्रम असो सर्व लोक सोबत येऊन साजरा करतात. गावातील लोकांमध्ये मोठी एकजुटता आहे म्हणून सर्वजण एकमेकांसोबत मिळूनमिसळून गुण्यागोविंदाने राहतात. 


माझ्या गावात शिक्षणाचा मोठा विकास झाला आहे. येथे शासनाद्वारे 10 वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. शिक्षणासाठी गावात आजूबाजूच्या गावातील मुलेही शिक्षण येतात. शासनाने आमच्या गावच्या चारही बाजूच्या मुख्य रस्त्यांवर पक्के काम केले आहे. ज्यामुळे बाहेरील लोकांना गावात येण्यात अडचण होत नाही. आमच्या गावात एक आयुर्वेदिक रुग्णालय उघडण्यात आले आहे. ज्यात गावातील लोक इलाज करण्यासाठी येतात. 


माझ्या गावात एक ग्राम पंचायत आहे. या पंचायतीत गावातील भांडणे सोडवली जातात. आमच्या गावात एक लहान पोस्ट ऑफिस देखील आहे, जेथे बँकेतील पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. माझ्या गावातील जास्त लोकसंख्या शेतावर निर्भर असल्याने गावात खूप सारे शेत आहेत, जेथे मक्की, गहू, भुईमुग, बाजरी इत्यादी पिके लावली जातात. सिंचनासाठी गावातील शेतात ट्युबवेल लावली आहे. परंतु जास्तकरून शेत पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. म्हणून जर पाऊस आला तर शेत चांगले होते नाहीतर बऱ्याचदा शेतातील पीक खराब होऊन जाते. म्हणून आमच्या गावातील जास्तकरून लोक गरीब आहेत. 


शासनाच्या प्रयत्नामुळे आमच्या गावात मोबाईल टॉवर, वीज व आधुनिकीकरणाची साधणे उपलब्ध होत आहेत. माझे गावात हिरवळ आणि सुंदरता भरलेली आहे. आमचे गाव एक आदर्श गाव आहे.

--समाप्त--


तर मित्रांनो हा होता माझे गाव मराठी निबंध या निबंधाचे शीर्षक तुम्ही पुढील प्रमाणे देऊ शकतात. 

  • माझे गाव मराठी निबंध
  • माझे गाव स्वच्छ गाव निबंध
  • गंदगी मुक्त माझे गाव निबंध
  • सुंदर माझे गाव
  • माझा आदर्श गाव मराठी निबंध
  • maze gav marathi nibandh 
  • my village essay in marathi


तुम्हाला हा निबंध कसा वाटला मला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद.... 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने