[सोशल मीडिया] मराठी माहिती व निबंध | Social Media Marathi Essay

मानवजातीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांती इंटरनेट आणि सोशल मीडिया क्रांती आहे. सोशल मीडिया ने संपूर्ण जगाला जवळ आणले आहे. आज अनेक व्यवसाय ऑफलाईन जगातून ऑनलाईन सोशल मीडिया वर आलेले आहेत. 


परंतु सोशल मीडिया चे जसे फायदे आहे तसेच काही नुकसान देखील आहेत. व या समस्या संपूर्ण जगासाठी एक आव्हान आहेत. आजच्या या लेखात आपण social media marathi essay प्राप्त करणार आहोत.

            

सोशल मीडिया मराठी निबंध या निबंधात सोशल मीडिया चे फायदे व तोटे आणि मानवी जीवनातील भूमिकेचे वर्णन केले आहे. तर चला निबंधाला सुरू करूया..


सोशल मीडिया मराठी माहिती सोशल मीडिया चे फायदे व तोटे

सोशल मीडिया मराठी निबंध (Social Media Marathi Nibandh)

आजच्या युगात सोशल मीडिया जगातील सर्वात जलद संप्रेषणाचे साधन बनले आहे. सोशल मीडियाची लोकप्रियता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचा उपयोग प्रत्येक वयातील लोक करीत आहेत. परंतु ज्या पद्धतीने नाण्याच्या दोन बाजू असतात त्याच पद्धतीने सोशल मीडियाचे एकीकडे सकारात्मक फायदे तर आहेत परंतु दुसरीकडे यांचे भयंकर दुष्परिणाम देखील होत आहेत.


आज जगभरात सोशल मीडिया अनेक प्रकारच्या कार्यांसाठी वापरले जाते. सोशल मीडियाच्या मदतीने कोणतीही बातमी खूप कमी वेळात जगभरात पोहोचवली जाते. वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे जगातील एका कोपर्‍यात बसलेला व्यक्ति दुसऱ्या कोपऱ्यातील आपले मित्र व नातेवाईक यांच्याशी संपर्क साधू शकतो व फक्त आवाज ऐकणे नव्हे तर त्यांच्याशी व्हिडिओ कॉल द्वारे समोरासमोर संपर्क प्रस्थापित करू शकतो.


सोशल मीडिया चे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. भारतासह जगभरात व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रसिद्ध आहेत. आजकाल युट्युब वर अनेक ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवले जातात. यूट्यूब वर कोणीही व्यक्ती चॅनल बनवून लोकांसमोर आपले ज्ञान व आपली कला दाखवू शकतो. आजकाल भारतातील अनेक लोक यूट्यूब च्या मदतीने घरबसल्या पैसे कमावत आहेत. 


याशिवाय फेसबुक, व्हॉटसअप व इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपले अकाउंट बनवून नवीन मित्र बनवले जातात आणि जुन्या मित्रांच्या संपर्कात राहिले जाते. या प्लॅटफॉर्म वर आपले नवीन नवीन फोटो टाकण्याची तरुणांमध्ये वेड आहे. सोशल मीडिया मुळे अनेक लहान मोठे व्यवसायिक ऑनलाइन स्वीच झाले आहेत. ज्यामुळे त्यांची विक्री वाढली आहे. ऑनलाईन आलेले सर्व व्यवसाय वेगाने प्रगती करीत आहेत. 


सोशल मीडिया चे फायदे तर अनेक आहेत. परंतु दुसरीकडे यामुळे अनेक नुकसान ही होत आहेत. सोशल मीडियाचा अती वापर करणाऱ्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडत आहेत. जे विद्यार्थी सोशल मीडिया मध्ये जास्त आवड दाखवत आहेत त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. 


इंटरनेट वापरणारे विद्यार्थी आपला अधिकांश वेळ सोशल मीडियावर फोटो लाईक करणे, व्हिडिओ पाहणे अश्या गोष्टींमध्ये वाया घालवत आहे. ज्यामुळे अनेक जण मानसिक रोगी झाले आहेत. तासनतास एका जागी बसून सोशल मीडिया वापरल्याने एकाग्रता कमी होते. शारीरिक वजन वाढायला लागते. व्यायाम व खेलकूद न झाल्याने शरीराला अनेक रोग ग्रस्तात. 


या शिवाय सोशल मीडियाचा वापर करून काही लोक सायबर क्राईम करतात. या मध्ये दुसऱ्याचे पासवर्ड चोरून माहिती लिक करणे, बँकेचे तपशील विचारून पैसे चोरणे, ब्लॅकमेल करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. सोशल फ्रॉड व सोशल मीडियाने डिप्रेशन आलेले अनेक लोक आत्महत्या करायला मजबूर होतात. 


मानवाने लावलेल्या शोधांपैकी सोशल क्रांती खूप महत्त्वाचा शोध आहे. परंतु आपण याचा योग्य वापर  करायला हवा. कारण शेवटी कोणत्याही गोष्टीचे परिणाम हे त्याच्या वापरकर्त्यावर अवलंबून असतात.

मोबाइल वापराचे फायदे व तोटे वाचा येथे 


तर मित्रहो हा होता social media marathi essay या मराठी निबंधात आपण social media che fayde ani tote दोघांचा समावेश केलेला आहे. 

आशा करतो की सोशल मीडिया मराठी निबंध तुम्हाला आवडला असेलच. या निबंधाला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. व इतर कोणत्याही विषयावरील निबंध मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट वर topic सर्च करा. 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने