मित्रांनो आजच्या या लेखात आपण स्थानांतरण प्रमाणपत्र कसे लिहावे हे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया
प्रति
माननीय मुख्यद्यापाक
महात्मा गांधी विद्यालय, औरंगाबाद
दिनांक - 27 जानेवारी 2001
विषय- हस्तांतरण प्रमाणपत्र (Transfer certificate)
महोदय
आदरणीय मुख्याध्यापक सर मी आपल्या शाळेत इयत्ता आठवीत शिकत आहे. माझे वडील BCCL कंपनीमध्ये काम करीत आहेत. व कंपनी वाले माझ्या वडिलांची बदली पुण्याला करीत आहेत. आणि आमचे संपूर्ण कुटुंब पुण्याला जात आहे. म्हणून माझे पुढील शिक्षणही पुण्यातच पूर्ण होईल.
मी आपल्या शाळेतील संपूर्ण फी भरली आहे. आणि पुढील शिक्षणासाठी आपल्या शिक्षकांकडून योग्य सल्ला घेतला आहे.
शेवटी माझी तुम्हाला विनंती आहे की मला Transfer certificate (हस्तांतरण प्रमाणपत्र) लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे.
आपला आज्ञाकारी विद्यार्थी
मोहित पाटील
इयत्ता- 8 वी
या tc application marathi ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
----
कंपनी किंवा ऑफिस मधून transfer certificate मिळवण्यासाठी application
श्रीमान व्यवस्थापक
टाटा स्टील लिमिटेड (औरंगाबाद)
दिनांक - 27 जानेवारी 2001
विषय: हस्तांतरण प्रमाणपत्र हेतू
महोदय
सविनय निवेदन आहे की मी मोहित पाटील आपल्या कंपनीत जूनियर इंजीनियर या पदावर कार्यरत आहे. माझे संपूर्ण कुटुंब पुण्यात वास्तव्यास आहे. व मला आताच माहीत पडले की आपल्या कंपनीची एक शाखा पुण्यातही उघडली आहे. माझी पुण्यात कुटुंबासोबत राहून या आपल्या कंपनीसाठी काम करण्याची इच्छा आहे.
माझ्या बदलीमुळे पुण्याच्या शाखेतील नवीन स्टाफ ला देखील माझ्या अनुभवाचा लाभ होईल. शेवटी तुम्हाला विनंती आहे की मला हस्तांतरण प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी. तुमच्या या सहाय्या बद्दल मी नेहमी आपला आभारी असेल.
आपला विश्वासू
मोहित पाटील
ज्युनियर इंजिनियर