{भाषण} झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी भाषण | Zashichi rani Marathi bhashan

Zashichi rani Marathi bhashan: आजच्या या लेखात आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मराठी भाषण मिळवणार आहोत. हे Marathi bhashan आपण शाळेत झाशीची राणी जयंती च्या दिवशी देऊ शकतात, तर चला सुरू करूया.... 


zashichi rani marathi bhashan

राणी लक्ष्मीबाई मराठी भाषण- Zashichi rani Marathi bhashan


 सिंहासन हिल उठे राजवंशो ने भुकुटी तानी थी।

बूढ़े भारत मे आई फिर से नई जवानी थी।


गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी।

दूर फिरंगी को करने की सबने मन मे ठानी थी।


बुंदेले हर बोलो के मुँह हमने सुनी कहा थी।

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।”


मित्रांनो झाशीची राणी लक्ष्मीबाई त्या वीरांगना होत्या ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रणभुमित हसत हसत आपले प्राण त्यागले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यात आलेल्या 1857 च्या युद्धाचा इतिहास लक्ष्मीबाई यांनी आपल्या रक्ताने लिहिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहेत.


राणी लक्ष्मीबाई यांचे वास्तविक नाव मनुबाई किंवा मनिकर्णिका होते. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 ला उत्तर प्रदेशमधील काशी येथे झाला. त्यांचे वडील मोरोपंत तांबे पुण्याच्या पेशव्यांच्या सेवेत होते. मनूच्या जन्माच्या 4 वर्षातच त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर मनु बाई यांनी आपला अत्याधिक वेळ वडिलांसोबत पेशव्यांच्या दरबारात घालवला. मनु या लहानपणापासूनच पुरुषांप्रमाणे खेळ खेळत असत. आत्मरक्षा, तलवारबाजी, घोडेस्वारी, निशानेबाजी, घेराव, कुस्ती इत्यादी त्यांचे आवडते खेळ होते. त्यांच्या या अभ्यासात तात्या टोपे यांनी त्यांना महत्त्वाचे सहकार्य केले. 


इ.स. 1824 मध्ये मनु चा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी करण्यात आला. विवाहानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. गंगाधर रावांना दरबारातील कामकाज राणीने पाहावे हे मंजूर नव्हते म्हणून लक्ष्मीबाई आपल्या रिकाम्या वेळेत व्यायाम, कसरत, घोड्स्वारी करीत असत. लग्नाच्या 9 वर्षांनंतर गंगाधर राव व लक्ष्मीबाईंना एक पुत्र झाला. परंतु जन्माच्या 3 महिन्यातच त्याचा मृत्यू झाला. पुत्राच्या दुःखात गंगाधरराव आजारी पडले. या नंतर त्यांनी आपल्या भावाच्या मुलाला दत्तक घेतले. परंतु शेवटी 1853 मध्ये गंगाधर रावांचे निधन झाले. 


गंगाधर रावांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी झाशीच्या राणीला अनाथ समजून त्यांना झाशीचा किल्ला खाली करून इंग्रजांच्या हाती सोपण्यास सांगितले. परंतु लक्ष्मीबाई यांनी ठामपणे इंग्रजांना सांगितले की "मी माझी झाशी देणार नाही". इंग्रजांविरुद्ध लक्ष्मीबाईंनी लंडन मध्ये खटला दाखल केला. परंतु यामध्येही इंग्रजांना विजय प्राप्त झाली. शेवटी रणींना किल्ला सोडून राजवाड्यात राहायला जावे लागले. परंतु लवकरच 1857 च्या स्वतंत्र युद्धात त्यांनी परत आपला किल्ला पुन्हा हस्तगत केला.


काही काळानंतर 21 मार्च 1858 मध्ये इंग्रज अधिकारी सर ह्यु रोज याने उत्तम प्रतीचे सेनानी आणि कर्तबगार राजकारणी यांच्या मदतीने झाशीवर आक्रमण केले. या युद्धात इंग्रजांच्या उत्तम शस्त्रांनी सज्ज सैन्याने राणी लक्ष्मीबाई च्या सैन्याला पराजित करीत झाशी वर पुन्हा आपले अधिपत्य प्राप्त केले. राणी लक्ष्मीबाई कश्यातरी तात्या टोपे व आपल्या दलासोबत जवळ पास 24 तासाच्या प्रवासात 102 किलोमीटर अंतर पार करून काल्पी येथे येऊन पोहचल्या. तेथील पेशव्याने परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना शरण दिली व आपले सैन्य बलही उपलब्ध करून दिले. यानंतर लक्ष्मीबाई यांनी आपल्या प्रमुख सैनिकांच्या मदतीने ग्वालियर च्या राजाला पराजित करून हे राज्य काल्पी च्या पेशव्याच्या स्वाधीन केले.


१८ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ याने सैन्यासह ग्वालियर वर हल्ला चढवला. या युद्धात लक्ष्मी बाईकाल्पी च्या पेशव्यांच्या बाजूने लढल्या. इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. शेवटी त्या सेवकानेच त्यांना मुखाग्नी दिला. इंग्रजांच्या शरण न जाता स्वाभिमानाने वीरमरण स्वीकारणाऱ्या या शूर राणीला माझा प्रणाम..!  

****

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण वाचा येथे 


तर मित्रांनो हे होते zashichi rani speech in marathi तुम्हाला हे मराठी भाषण कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की सांगा. व इतर विषयांवरील मराठी भाषणे आणि निबंध मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट https://www.bhashanmarathi.com ला 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने