आजच्या या लेखात आपण सूर्य मावळला नाही तर..? या विषयावर मराठी निबंध प्राप्त करणार आहोत. Surya mavala nahi tar काय चांगल्या गोष्टी घडतील आणि काय काय संकटे येतील या बद्दल माहिती पुढे देण्यात आली आहे.
हा निबंध एकातऱ्हेचा कल्पनाप्रधान निबंध मराठी असणार आहे. या मध्ये कल्पना करण्यात आली आहे की जर सूर्य मावळला नाही तर कोण कोणत्या प्रिय व अप्रिय घटना घटित होतील.
सूर्य मावळला नाही तर |
जर सूर्य मावळला नाही तर मराठी निबंध | surya mavala nahi tar nibandh
आपल्या पृथ्वीवर सुर्य हा एकमेव नैसर्गिक ऊर्जा आणि उष्णतेचा स्त्रोत आहे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अमर्यादित आहे. या ऊर्जेचा वापर करून आपण अनेक कार्य करू शकतो. मानवजातीच्या अस्तित्वासाठी सुर्य खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. सूर्य हा फक्त पृथ्वीवरीलच नव्हे तर आकाश गंगेतील ऊर्जेचा एकमेव स्त्रोत आहे. पण जर एखाद्या वेळी सूर्य मावळलाच नाही तर...? ऐकायला थोडे विचित्र वाटते ना. पण जर असे खरंच झाले तर.
जर सूर्य मावळला नाही तर जी पहिली सर्वात चांगली गोष्ट होईल ती म्हणजे मला दिवसभर खेळता येईल. कारण दररोज संध्याकाळ झाली कि माझी आई मला घरात येण्यासाठी आवाज देते त्यावेळी मला सूर्यावर खूप राग येतो. याच्यामुळे मला जास्त वेळ खेळता देखील येत नाही. म्हणून जर सुर्य मावळला नाही तर मी मनसोक्त खेळेल आणि आई बोलवायला लागली तर तिला सांगेल की अजून तर रात्र झालीच नाही आहे म्हणून.
सूर्य मावळला नाही तर सगळीकडे प्रकाश पसरलेला राहील. ज्यामुळे रात्री लागणारी वीजचा वापर कमी होऊन विजेची बचत होईल. याशिवाय सौर ऊर्जेचा वापर वाढेल. कमी किमतीत भरपूर ऊर्जा उपलब्ध होईल.
ह्या तर होत्या काही चांगल्या गोष्टी पण जर सूर्यास्त झाला नाहीतर नेहमी उजेळ आणि दिवस राहील. ज्यामुळे लोकांना आराम करता येणार नाही. दिवस आहे म्हणून सर्व बाजार चालूच राहील आणि लोक नेहमी कामच करत राहतील. ज्यामुळे त्यांचे शरीर थकेल आणि कमजोरी वाढायला लागेल. रात्रीचा चंद्र आणि तारे पाहण्याचा आनंद अनुभवता येणार नाही.
सूर्यापासून आपल्याला मोफत ऊर्जा मिळते हे खरे आहे, परंतु जर सुर्य 24 तास आकाशात राहिला तर त्याच्या उष्णतेने पृथ्वीवरील तापमान वाढायला लागेल. पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ लागेल. ज्यामुळे पृथ्वीवरील जलस्त्रोत कोरडे पडतील. आणि संक्षेपण प्रक्रिया न झाल्याने पाऊस देखील पडणार नाही परिणामी मनुष्य व प्राण्यांना प्यायला पाणी उरणार नाही. वातावरणात आद्रतेचे प्रमाण वाढायला लागेल. आकाशातील वातावरण जास्तीत जास्त दाट होऊ लागेल. ज्यामुळे आकाशात उडणारे विमान वाहतूक बंद करावे लागेल.
सूर्य न मावळल्याने पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे झाडे झुडपे नष्ट होऊ लागतील. शेती करणे कठीण होईल परिणामी मनुष्य व प्राण्यांना खाण्यासाठी अन्न उरणार नाही. सूर्याच्या उष्णतेमुळे पर्वतावरील बर्फ वितळू लागेल. या बर्फाचे पाणी मनुष्य वस्तीत शिरेल ज्यामुळे महापूर येण्याचा देखील धोका आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर सूर्य न मावळल्याने सृष्टी चे चक्र बिघडून जाईल. मनुष्य जीवन आज जसे आहे त्या पद्धतीने अस्तित्वात राहणार नाही. परंतु आपल्याला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही कारण आपली दिनचर्या चुकवायला सूर्य काय मनुष्य नाही. त्याचे अस्तित्व मनुष्य जन्माच्या हजारो वर्षांआधी होते आणि मनुष्य जीवन नष्ट झाल्यावरही राहील.
--समाप्त--
तर मित्रहो हा होता सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी व surya mavala nahi tar या विषयावरील Marathi Nibandh आशा करतो की हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल. या निबंधाला आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
READ MORE
Kup sundr
उत्तर द्याहटवाchhaan
उत्तर द्याहटवा