लता मंगेशकर निधन वार्ता | lata mangeshkar death news in Marathi

lata mangeshkar news in Marathi : हिंदी सिनेमा आणि संपूर्ण संगीत सृष्टीला स्तब्ध करणारी बातमी समोर आली आहे. भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. 92 वर्षाच्या वयात लता मंगेशकर यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वार्तेने संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये शोक चे वातावरण निर्माण. 


लता मंगेशकर भावपूर्ण श्रद्धांजलि

लता मंगेशकर यांचे निधन | lata mangeshkar news in marathi

लता मंगेशकर जवळपास एक महिन्यापासून आजारी होत्या. 8 जानेवारीला पहिल्यांदा कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. व तेव्हापासून तर आतापर्यंत त्या दवाखान्यातच होत्या. लता मंगेशकर यांच्यावर सतत उपचार सुरू होते. त्यांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांना आयसीयूमध्ये अनेक डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते. 


या संपूर्ण उपचारादरम्यान त्यांना फक्त दोन दिवसांसाठी व्हेंटिलेटर पासून दूर करण्यात आले होते. परंतु जसेही डॉक्टरांनी वेंटिलेटर दूर केले त्यांची तब्येत आणखी बिघडायला लागली. यानंतर त्यांना पुन्हा एकदा वेंटीलेटर वर टाकण्यात आले. परंतु आज 06 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची तब्येत अचानक आणखी बिघडली. व सकाळी 8 वाजून 11 मिनिटांच्या सुमारास त्यांनी आपला शेवटचा श्वास घेऊन स्वर्गाच्या अखंड यात्रेस प्रारंभ केला. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार लता मंगेशकर यांचा मृत्यू मल्टीपल ऑर्गन फेलियर मुळे झाला. निधनाच्या वेळी त्यांचे वय 92 वर्षाचे होते.


5 वर्षाच्या कमी वयात सुरू केला प्रवास

लता मंगेशकर यांचे संगीत आणि चित्रपट सृष्टीतील योगदान अतुलनीय आहे आणि ते कधीही विसरले जाऊ शकत नाही. 78 वर्षाच्या करियरमध्ये लता मंगेशकर यांनी 25 हजाराहून अधिक गाणे म्हटले. त्यांच्या मधुर आवाजामुळे त्यांना अनेक नॅशनल आणि इण्टरनॅशनल पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना तीन वेळा नॅशनल अवॉर्ड देण्यात आला आहे, याशिवाय दादासाहेब फाळके पुरस्कार, भारतरत्न यासारख्या अनेक पुरस्कारांनी लता मंगेशकर (lata mangeshkar news in marathi) यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. 


लता मंगेशकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात पाच वर्षाच्या कमी वयातच केली होती. ज्या वयात मुलांना खेळ खेळणे माहीत असते त्या वयात लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. व आपल्या भावा बहिणीच्या उत्तम भविष्यासाठी त्यांनी आयुष्यात विवाह देखील केला नाही. लता मंगेशकर जरी जग सोडून गेल्या तरी त्यांची सदाबहार गाने कायम सर्वांच्या मनात घर करून राहतील. 


तर मित्रांनो या लेखात आम्ही आपणास lata mangeshkar news in marathi देऊन जागृत केले. आशा आहे लता मंगेशकर निधन वार्ता ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने