आजकाल बऱ्याच लोकांमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती कमी झाल्याचे दिसून येते. लहानसहान गोष्टी देखील लक्षात राहत नाहीत. अशात आपली स्मरणशक्ती चांगली असावी असे सर्वानाच वाटते. सुदैवाने, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय - How to Increase Concentration Power in Marathi याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. या लेखातील उपाय आपण स्वतः करावेत आणि इतरांसोबत देखील ही माहिती शेअर करावी.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय - Tips to Increase Concentration Power in Marathi
1) साखर कमी खा.
जास्त प्रमाणात साखर खाणे हे अनेक आरोग्याच्या समस्यांचे आणि आजारांचे मुख्य कारण आहे.
संशोधनात असे दिसून आले आहे की साखरयुक्त आहारामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि मेंदूची कार्यशीलता देखील कमी होते, विशेषत: मेंदूचा तो भाग जेथे अल्पकालीन स्मृती साठवल्या जातात, त्या भागावर अधिक परिणाम होतो. उदाहरणार्थ, ४००० हून अधिक लोकांच्या एका अभ्यासात असे आढळून आले की ज्यांनी शर्करायुक्त पेये जास्त प्रमाणात घेतली आहेत अश्या लोकांच्या मेंदूच्या कार्य करण्याच्या क्षमतेचे प्रमाण इतरांपेक्षा तुलनेने कमी होते.
आहारातून साखरेचे प्रमाण कमी केल्याने केवळ तुमची स्मरणशक्तीच नाही तर तुमचे संपूर्ण आरोग्य सुधारते.
2) ध्यानासाठी वेळ काढा.
ध्यानाचा सराव तुमच्या आरोग्यावर अनेक प्रकारे सकारात्मक परिणाम करू शकतो.
ध्यान करणे हे आरामदायी आणि सुखदायक आहे, तसेच तणाव आणि वेदना कमी करते, रक्तदाब नियंत्रित करते आणि स्मरणशक्ती सुधारते. खरं तर, ध्यान केल्याने मेंदूतील ग्रे मॅटर वाढते असे दिसून आले आहे. ग्रे मॅटरमध्ये न्यूरॉन सेल बॉडी असतात. म्हणून ध्यान केवळ तुमच्या शरीरासाठीच चांगले नाही तर ते तुमच्या मेंदूसाठी देखील चांगले आहे.
प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी स्मरणशक्तीत वाढ करण्यासाठी रोज सकाळी कमीत कमी १५ ते २० मिनिटे तरी ध्यान केले पाहिजे.
Read>> वाचलेले लक्षात राहण्यासाठी अभ्यास कसा करावा?
3) माइंडफुलनेसचा सराव करा
माइंडफुलनेस ही एक मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सद्यस्थितीवर लक्ष केंद्रित करता, तुमच्या सभोवतालच्या परिसराची, व्यक्तींची जाणीव ठेवता.
माइंडफुलनेसचा उपयोग ध्यानात केला जातो, परंतु दोन्ही गोष्टी एकसारख्या नाहीत. ध्यान हा एक अधिक औपचारिक सराव आहे, तर माइंडफुलनेस ही एक मानसिक सवय आहे जी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत वापरू शकता. बऱ्याच संशोधनातून लक्षात आले आहे की मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी माइंडफूल असणे म्हणजेच सजग असणे खूप प्रभावी आहे.
माइंडफुलनेस तंत्रांचा वापर करण्यासाठी तुमच्या सद्यस्थितीकडे अधिक लक्ष द्यावे, आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून आणि मन भटकत असताना हळूवारपणे आपले लक्ष रीसेट करून आपण दिनचर्येमध्ये माइंडफुलनेसचा समावेश करु शकता.
विडियो पहा
How to Increase Concentration Power in Marathi
4) दररोज त्राटक करा.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्राटक करा. त्राटक करताना बिंदू त्राटकापासून सुरुवात करावी. आणि त्यानंतर दीप त्राटक करावे. दिवसातून फक्त ५ मिनिटे त्राटक करणेही पुरेसे असते. त्राटक केल्याने एकाग्रता वाढते आणि त्यामुळे स्मरणशक्ती सुद्धा वाढते.
बिंदु त्राटक करण्यासाठी एका स्वच्छ कागदावर एक लहानसा काळ्या रंगाचा ठिपका ठेवावा व 5 मिनिटे कोणताही विचार न करता एकटक (डोळ्यांची पापणी बंद न करता) बिंदु त्राटक चा सराव करावा.
5) पुरेशी झोप घ्या.
स्मरणशक्ती चांगली किंवा वाईट असण्यामध्ये झोप महत्त्वाची भूमिका बजावते, आपण जेव्हा झोपलेलो असतो त्याच काळात आपल्या अल्पकालीन आठवणी मजबूत होतात आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आठवणींमध्ये रूपांतरित होतात.
संशोधनात असे दिसून आले आहे की जर तुमची झोप कमी होत असेल तर त्याचा तुमच्या स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आरोग्यतज्ञ सांगतात की प्रौढांनी चांगल्या आरोग्यासाठी दररोज रात्री ७ ते ९ तास झोपावे. म्हणून रोज रात्री ७ ते ९ तास चांगली गाढ झोप घ्या. लवकर झोप लागण्यासाठी उपाय <<येथे वाचा
6) विविध बौद्धिक खेळांद्वारे तुमच्या मेंदूला प्रशिक्षित करा
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय म्हणून मेंदूचे खेळ खेळून संज्ञानात्मक कौशल्ये वापरणे हा स्मरणशक्ती वाढवण्याचा एक मजेदार आणि प्रभावी मार्ग आहे.
क्रॉसवर्ड, वर्ड-रिकॉल गेम्स किंवा बुद्धिबळ आणि अगदी आजकाल मोबाइलवर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी असलेले अॅप्लिकेशन आणि गेम्स हे सुद्धा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम साधन आहे.
तुमच्या मेंदूला आव्हान देणारे खेळ स्मरणशक्ती व मेंदूच्या कार्य करण्याची शक्ति वाढवतात. म्हणून आपण मेंदू संबंधी चे ब्रेन गेम्स देखील खेळू शकतात.
7) व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात घ्या.
व्हिटॅमिन डी हे एक महत्वाचे पोषक तत्व आहे जे शरीरात अनेक महत्वाच्या भूमिका बजावते.
व्हिटॅमिन डी ची निम्न पातळी अनेक आरोग्य समस्यांशी जोडली गेली आहे, ज्यामध्ये स्मरणशक्ती कमी होणे देखील समाविष्ट आहे.
३१८ प्रौढ व्यक्तींवर केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की ज्यांच्या रक्तात व्हिटॅमिन डी ची पातळी २० नॅनोग्राम प्रति मिलिलिटर पेक्षा कमी होती त्यांची स्मरणशक्ती व्हिटॅमिन डी ची चांगली पातळी असलेल्या लोकांपेक्षा खूप कमी होती. व्हिटॅमिन डी ची कमी पातळी मुळे स्मृतिभ्रंशाचा धोका देखील संभवू शकतो.
व्हिटॅमिन डी ची कमतरता खूप सामान्य आहे, विशेषतः थंड हवामानात आणि गडद त्वचा असलेल्या लोकांमध्ये. जर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी असेल तर त्यावर उपाय म्हणून रोज सकाळी सुर्योदयावेळी १५ मिनिटे सूर्याची कोवळी किरणे अंगावर घ्यावीत. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी आपोआप तयार होते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय
8) व्यायाम आणि योग करा.
एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे.
संशोधनाने हे सिद्ध केले आहे लहान मुलांपासून ते मोठ्या प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांची स्मरणशक्ती सुधारण्यास व्यायाम आणि योग मदत करू शकते. योग करताना विशेषतः शीर्षासनाचा आणि सूर्यनमस्काराचा अभ्यास करावा.
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्यायामामुळे आणि योगामुळे न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रोटीनचा स्राव वाढू शकतो आणि न्यूरॉन्सची वाढ आणि विकास सुधारू शकतो, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.
लहानपणापासूनच नियमित व्यायाम केल्यास नंतरच्या आयुष्यात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी होतो. म्हणून लहान मुलांना आधीपासून व्यायाम व योग ची सवय लावावी.
9) कमी दाहक (Anti-inflammatory) पदार्थांचे सेवन करा.
Anti-inflammatory पदार्थांनी समृद्ध आहार घेतल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते.
अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्समुळे होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. तुम्ही फळे, भाज्या यांचे सेवन आहारात करू शकतात.
बेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँथोसायनिन्स सारख्या अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्यासाठी ते खाणे हा एक उत्कृष्ट मार्ग असू शकतो.
स्मरणशक्तीत वाढ करण्यासाठी आयुर्वेदिक रूटीन
जर तुम्ही एक विद्यार्थी आहात. तुमची परीक्षा जवळ आली आहे आणि तुम्हाला तुमची बौद्धिक क्षमता, एकाग्रता आणि स्मरणशक्ती या तिन्ही गोष्टी वाढवायच्या आहेत तर वरील सर्व उपयांसोबतच तुम्ही चार टप्प्यांचे पूर्णपणे आयुर्वेदिक असे एक रूटीन सुद्धा फॉलो करू शकता.
आयुर्वेदानुसार कमी स्मरणशक्ती आणि कमी एकाग्रतेचे मुख्य कारण आहे मेंदूच्या मज्जातंतूमध्ये कोरडेपणा येणे. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपल्याला मेंदू मध्ये वंगण घालण्याची आवश्यकता आहे.
- पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला एक चमचा ब्रम्हरसायन सकाळी खायचे आहे. सकाळी पाणी प्यायल्यानंतर व फ्रेश झाल्यानंतर एक चमचा ब्रम्हरसायन खावे. महर्षी चरक यांनी चरकसंहिते मध्ये स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ब्रम्हरसायनाला मुख्य औषध सांगितले आहे. ५० पेक्षा जास्त औषधी वनस्पतीनी बनलेले ब्रम्हरसायन मेंदूतील मज्जातंतू वर प्रभाव पाडते. ज्याप्रमाणे च्यवनप्राश शारीरिक शक्ती वाढवते त्याचप्रमाणे ब्रम्हरसायन स्मरणशक्ती वाढवते. ब्रम्हरसायन घेतल्यानंतर कमीतकमी पुढचे ३० मिनिटे काहीही खाऊ नका. तुम्ही ब्रम्हरसायन तुमच्या जवळील कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामधून किंवा ऑनलाइन ही विकत घेऊ शकता.
- दुसऱ्या टप्प्यात घरचा पौष्टिक नाश्ता केल्यानंतर ४० ते ४५ मिनिटांनी तुम्हाला सारस्वतारिष्ट घ्यायचे आहे. तीन चमचे सारस्वतारिष्ट ३ चमचे पाण्यात टाकून प्यावे. सारस्वतारिष्टमध्ये ब्राम्हीचे औषधी तत्व असते. ब्राम्ही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त औषधी वनस्पतीपैकी एक आहे. मॉडर्न सायन्स रिसर्चने सुद्धा हे सांगितले आहे की ब्राम्ही दीर्घकालीन आणि अल्पकालीन स्मृती वाढवते. सारस्वतारिष्ट पिताना ते काचेच्या भांड्यातच प्यावे.
- या टप्प्यात रात्री झोपण्यापूर्वी १ तासाआधी १ चमचा ब्राम्ही घृतं १ ग्लास दुधात टाकून प्यावे. आयुर्वेदानुसार दूध आणि तूप यांचे मिश्रण आरोग्यासाठी उत्तम असते. आणि जेव्हा तुम्ही सामान्य तूपाऐवजी ब्राम्ही घृतं वापरता ज्यात ब्राम्हीसोबतच संकपुष्पि सुद्धा असते जे मेंदूला वंगण घालते. यामुळे तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.
- या रूटीनची शेवटचा टप्पा तुम्हाला रात्री झोपायच्या आधी करायचा आहे. यासाठी तुम्हाला लागेल ज्योतिश्मती तेल. ब्राम्हीसोबतच आयुर्वेदामध्ये मालकांग्नी म्हणजेच ज्योतिश्मती स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. ज्योतिश्मती तेल झोपताना ड्रॉपरच्या मदतीने दोन्ही नासिकांमध्ये दोन-दोन थेंब टाकावे व तसेच झोपून जावे. याने झोपही चांगली येते.
तर मित्रांनो, या लेखात आपण स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय आणि एक संपूर्ण रूटीनही पाहिले. आपण या गोष्टी नियमीपणे आपल्या दिनचर्यामध्ये सामील करा, आपणास एका महिन्यातच जबरदस्त परिणाम पाहावयास मिळेल. How to Increase Concentration Power in Marathi हा लेख इतरांसोबातही शेअर करा. धन्यवाद