गणपती स्तोत्र मराठी | Ganpati Stotra Lyrics in Marathi

गणपती स्तोत्र मराठी | Ganpati Stotra Lyrics in Marathi : श्री गणेशांना बुद्धीचे देवता म्हणून पूजले जाते. गणपती, वक्रतुंड, विनायक, गजानन इत्यादि अनेक नावांनी ओळखले जाणारे गणपती हे देवांचे देव महादेव व देवी पार्वती चे पुत्र आहेत. गणपती च्या पत्नीचे नाव रिद्धि आणि सिद्धी आहे. 

भगवान गणेश विद्यार्थ्याला बुद्धी, व्यापऱ्याला धन संपत्ति आणि संतान प्राप्ती ची कामना करणाऱ्याला संतान सुख देतात. असे गणपती स्तोत्र मराठी मध्ये सांगण्यात आलेले आहेत. गणपती स्त्रोत्राच्या नियमित पठणाने व्यक्ति मध्ये अनेक चांगले बदल घडून येतात. या लेखात आम्ही आपल्याला Ganpati Stotra Lyrics in Marathi देत आहोत. तर चला सुरू करूया..


Ganpati Stotra Lyrics in Marathi


गणपती स्तोत्र मराठी - Ganpati Stotra Lyrics in Marathi

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्

भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिद्धये ॥१॥


प्रथमं वक्रतुण्डंच एकदन्तं द्वितीयकम्

तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥


लम्बोदरं पञ्चमंच षष्ठं विकटमेव च

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥


नवमं भालचंद्रंच दशमं तु विनायकम्

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥


द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर:

नच विघ्नभयं तस्य सर्वसिद्धीकर प्रभो ॥५॥


विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्

पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥


जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्

संवत्सरेण सिद्धींच लभते नात्र संशयः ॥७॥


अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥


इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

***गणपती स्तोत्र चा मराठी अर्थ - Ganpati Stotra Meaning in Marathi


प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्

भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिद्धये ॥१॥

पार्वती पुत्र देवांचे देव गणपतीला मस्तक टेकवून प्रणाम करा. आणि मग आपले आयुष्य, वय आणि धनाच्या पूर्तीसाठी भक्तीने त्यांचे नियमित स्मरण करा. 


प्रथमं वक्रतुण्डंच एकदन्तं द्वितीयकम्

तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

गणपती चे प्रथम नाव वक्रतुंड आहे तर दुसरे नाव एकदंत आहे. तिसरे कृष्ण पिंगाक्ष तर चौथे गज्वक्र आहे. 


लम्बोदरं पञ्चमंच षष्ठं विकटमेव च

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

पाचवे नाव लंबोदर, सहावे विकट विक्राळ, सातवे विघ्न राजेंद्र आणि आठवे नाव धुम्रवर्ण असे आहे. 


नवमं भालचंद्रंच दशमं तु विनायकम्

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

गणेशाचे नववे नाव भालचंद्र, दहावे विनायक, अकरावे गणपती आणि बारावे गजानन असे आहे.


द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर:

नच विघ्नभयं तस्य सर्वसिद्धीकर प्रभो ॥५॥

या बारा नावांची जो व्यक्ती सकाळ-संध्याकाळ तिन्ही संध्या पाठ करतो, हे प्रभू! त्याला कोणत्याही प्रकारचे विघ्नभय राहत नाही. या पद्धतीने केलेले स्मरण सर्व तऱ्हेच्या सिद्धी ची प्राप्ती करून देते. 


विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्

पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

गणेश स्तोत्रांच्या पठणाने विद्यार्थ्याला विद्या, धनाची इच्छा असणाऱ्याला धन, पुत्र प्राप्तीची इच्छा असणाऱ्याला पुत्र आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्याला मोक्ष प्राप्ती होते. 


जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्

संवत्सरेण सिद्धींच लभते नात्र संशयः ॥७॥

गणपती स्तोत्राचा पठाणाने सहा महिन्यातच इच्छित फळाची प्राप्ती होते. आणि एका महिन्यात संपूर्ण सिद्धिंची प्राप्ती होऊन जाते. 


अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

जो व्यक्ती गणेश स्तोत्र लिहून आठ ब्राह्मणांनी समर्पित करतो त्यावर गणेशांच्या कृपेने सर्व विद्यांची प्राप्ती होऊन जाते. तर मंडळी या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत गणपती स्तोत्र मराठी मध्ये शेअर केले आहे. हे Ganpati Stotra Lyrics in Marathi आपणास उपयोगी ठरले असेल अशी आशा आहे. आपण नियमित या गणेश स्त्रोत्राचे पठन करून गणेशांचे आशीर्वाद प्राप्त करावेत अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद..

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने