कवितेची ओळख स्वाध्याय इयत्ता सातवी | Kavitechi Olakh Swadhyay in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखात आपण इयत्ता सातवी मराठी विषयाचा 14 वा पाठ कवितेची ओळख चा स्वाध्याय व त्याची उत्तरे प्राप्त करणार आहोत. या लेखात देण्यात आलेला कवितेची ओळख स्वाध्याय (Kavitechi Olakh Swadhyay) आपण अभ्यासू शकतात व याद्वारे परीक्षेची योग्य तयारी करू शकता.


कवितेची ओळख स्वाध्याय

कवितेची ओळख स्वाध्याय - Kavitechi Olakh Swadhyay

प्र. १. खालील चौकटी पूर्ण करा.

(अ) आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ

उत्तर: कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं, म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं होय. 

(आ) सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत.

उत्तर: सर्वजण कवितेत संभाषण करू लागले.

(इ) बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण

उत्तर: सुधीरला कविता करण्याची आवड निर्माण व्हावी. 

(ई) कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण

उत्तर: सुधीरची काव्यप्रतिभा वाढली


प्र. २. पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा.

उत्तर: पाठात सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सर्वजण यमक जुळवून कवितेतून संवाद साधू लागतात.  प्रत्येकजण आपापल्या परीने कविता करीत असतो. जसे कवितेची सुरूवात करून आजी म्हणते "घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात". लगेच याला प्रतिउत्तर म्हणून आजोबा म्हणतात "आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात", "तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. ". बाबा हे ऑफिस ला जाण्याच्या घाईत असल्याने ते देखील, "अगं आई, अगं आई,पटकन खायला दे ना गं काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही" आशा पद्धतीने सुंदर कविता करतात. सुधीर ची आई देखील सर्वांच्या कविता ऐकून, "काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल." आशा पद्धतीने यमक जुडवते. एकंदरीत सर्वजण छान यमक जुडवता ज्यामुळे कवितेतून बोलण्याची गंमत तर लक्षात येतेच परंतु याशिवाय सुधीर ला देखील कवितेत संभाषण करून कशा पद्धतीने काव्यप्रतिभा वाढवता येऊ शकते याविषयी चे ज्ञान होते.


प्र. ३. या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा.

उत्तर: सुधीर हा एक शाळकरी मुलगा असतो. एके दिवशी शाळा सुटल्यावर सुधीर घरी येतो, परंतु त्या दिवस तो कोणाशीच जास्त बोलत नाही. त्याची ही स्थिती पाहून त्याचे आजोबा त्याला विचारतात की, "सुधीर आज तू इतका शांत का आहेस?" यावर सुधीर आजोबांना सांगतो की आजोबा, आज शाळेत 'काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न' या विषयावर प्रकल्प दिला आहे. पण या प्रकल्पात काय करावे याबद्दल मला काहीच माहित नाही व म्हणून मला फार ताण आलेला आहे. 

यानंतर आजोबा सुधीर ला प्रकल्पाबद्दल माहिती देतात. आजोबा सांगतात की, कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं, म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं होय. यानंतर कुटुंबातील सर्वजण सुधीर, बाबा, आई, ताई, आजोबा अन् आजी हे  एकमेकांसोबत कवितेतून संवाद साधू लागतात. 

कुटुंबातील सर्वांचा सहभाग आणि प्रयत्नामुळे सुधीर ला कविता कशी केली जाते हे लक्षात येते आणि त्याची काव्यप्रतिभा देखील वाढते. अशा पद्धतीने सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करून त्याची मदत करतात.


प्र. ४. ‘आम्ही चित्र काढतो’ या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा.

उत्तर: 

मयूर: मित्रांनो मी आणतो एक शीट, आपण चित्र काढुया नीट.

धनंजय: माझ्याकडे आहेत सुंदर रंग मित्र, ज्याच्याने आपण रेखाटू सुंदर चित्र.

मोहित: पण चित्र कसले काढायचे? चला त्यासाठी प्रत्येकाने एक एक आयडिया सुचवायचे.

मयूर: काढुया सुंदर निसर्ग, ज्यात असेल नदी, आकाश आणि फुलांचा मार्ग.

धनंजय: नाही नाही आपण दाखवू सध्याची स्थिती, प्रदूषणाने ग्रस्त आपली धरती.

मोहित: धनंजय, प्रदूषणाने होणाऱ्या नुकसानांची तुला जाण आहे, चित्राद्वारे परिवर्तन घडवण्याची आयडिया तुझी छान आहे. चला तर मग मिळून प्रदूषणाने होणारी परिस्थिती रेखाटू, आपण सर्व मिळून सुरेख चित्र काढू..!


प्र. ५. पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा.

उत्तर: शांताबाईंची बाग अन् सुर्वेची गिरणी, गदिमांचे घर अन् बालकवींची फुलराणी. चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी. हा काव्यसंवाद मला खूप आवडला. कारण या काव्यामध्ये सुधीरच्या मनःस्थितीचे वर्णन केले आपल्याला पाहायला मिळते.


प्र. ६. खालील आकृती पूर्ण करा.



तुम्हांला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल?

  • मला कवितेची आवड निर्माण करण्यासाठी मी जास्तीत जास्त पुस्तके वाचेल. मोठ मोठे लेखक आणि कवींनी लिहिलेल्या कविता वाचल्याने माझ्या शब्दसमूहात वृद्धी होईल. ज्यामुळे मला देखील स्वतः च्या कविता बनवण्यास सोपे जाईल. 
  • आज अनेक ऑनलाइन सोशल मीडिया माध्यमे उपलब्ध असल्याने मी गूगल, यूट्यूब इत्यादि द्वारे मोठ मोठ्या कवींच्या कविता आणि कविसंमेलन चे विडियो पाहिल. 
  • माझ्या लिहिलेल्या कविता मी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व त्यांचे अभिप्राय प्राप्त करण्यासाठी सोशल मीडिया चा उपयोग करेल. याशिवाय दैनिक वर्तमान पत्रे आणि मासिकांद्वारे देखील मी माझ्या कविता प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेल. 

खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा

(अ) खो देणे : नकार देणे.

(आ) पाश सोडणे: बंधनातून मुक्त होणे. 

(इ) हेका धरणे: हट्ट करणे.

(ई) भावनांचे मोहोळ चेतवणे: भावना जागृत करणे. 


(अ) खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा.

(अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो

उत्तर: गर्वाचे घर खाली

(आ) एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले, की त्याला सोडून द्यायच

उत्तर: कामापुरता मामा

(इ) सर्वत्र परिस्थिती समान असणे.

उत्तर: पळसाला पाने तीनच

(ई) थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे.

उत्तर: थेंबेथेंबे तळे साचे

(उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे

उत्तर: आगीतून उठून फुपाट्यात पडणे

(ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो

उत्तर: अति तिथे माती

(ए) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती पसंत पडत नाही

उत्तर: नावडतीचे मीठ अळणी


खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा

(१) आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे, की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे.

उत्तर: सर = शिक्षक, सर येणे: तुलना नसणे.

(२) सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही

उत्तर: कपात : चहाच्या पेल्यात, कपात करणे: कमी करणे

(३) एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, ‘‘सर, आपण आमच्या शाळेला भेट द्या.’’ मी त्यांना विचारले, ‘‘काय भेट देऊ?’’ ते शिक्षक म्हणाले, ‘‘ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा.’

उत्तर: भेट देणे: भेटायला येणे, भेट: नजराणा


तर मित्रहो या लेखाद्वारे मी आपल्यासोबत  इयत्ता सातवी च्या 14 व्या पाठातील कवितेची ओळख स्वाध्याय - Kavitechi Olakh Swadhyay शेअर केला. आशा करतो या लेखाद्वारे आपल्याला आपल्या शालेय अभ्यासात योग्य मदत मिळाली असेल. व ज्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला येत नव्हती ती देखील आपण अभ्यासली असतील. आपणास हा लेख कसा वाटला मला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद..

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने