स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध | Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

मित्रहो ज्या पद्धतीने आपण आपले घर व घराबाहेरचा परिसर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने संपूर्ण देश स्वच्छ व्हावा आणि देशातून रोगराई नष्ट होऊन देशाची प्रगती व्हावी यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले होते. या लेखात आपण स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध - Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi पाहणार आहोत. हा निबंध शाळा कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयोगाचा आहे. तर चला सुरू करूया.

 

स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध

स्वच्छ भारत अभियान निबंध - Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi 

(१०० शब्द)

महात्मा गांधींच्या १४९ व्या जयंती ला २ ऑक्टोंबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियान सुरु करण्यात आले. भारत स्वच्छ करणे हा या अभियानाचा उद्देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास होता की महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीला संपूर्ण भारत स्वच्छ होईल. आपल्या देशामध्ये आजारवाढ होऊ नये व लोकांना बाहेर उघड्यावर शौचाला बसण्या पासून रोखणे या साठीच हे अभियान सुरू करण्यात आले होते. आपल्या देशातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावणे हा देखील या अभियानाचा उद्देश होता. या अभियानासाठी १.९६ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती . यामधुन १.२ कोटींची शौचालये बांधण्यात आली. 

---


स्वच्छ भारत अभियान निबंध - Swachh Bharat Abhiyan nibandh Marathi

( २०० शब्द ) 

महात्मा गांधी नेहमी म्हणायचे स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता जास्त महत्वाची आहे. स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला या वाक्यावरुन समजले असेलच. स्वच्छते मुळे आपले शरीर आणि मन दोन्ही सुरक्षित राहते. सर्वांनी स्वत:साठी तरी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकार ने स्वच्छतेसाठी सुरू केलेला प्रयत्न आहे. आपले परीसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात महात्मा गांधींच्या १४९ व्या जयंतीपासून केली. स्वच्छ भारत अभियानाचे उद्दिष्ट देश स्वच्छ करणे व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे हा आहे. या अभियानाचा जनतेवर खूप परिणाम झाला. हा अभियान राबवल्यामुळे आपल्या देशातील‌‌ अनेक भागातील राहणीमान उंचावले गेले. स्वच्छ भारत अभियाना मध्ये इंदूर हे शहर देशातील सगळ्यात जास्त स्वच्छ शहर ठरले आहे. स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल हा स्वच्छ भारत अभियानाचा नारा होता. 


खुप लोकांनी या अभियानाला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडूलकर, सलमान खान , बाबा रामदेव, प्रियंका चोप्रा, विराट कोहली, कमल हसन, अनिल अंबानी, मृदुला सिन्हा, शशी थरूर, तारक का उलटा चश्मा मालिकेची टिम, महेंद्रसिगं धोनी यांना या अभियानाचा प्रचार करण्याची जिम्मेदारी दिली होती. आपल्या देशातील लोकांना तसेच लहान मुलांना देखील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. हे अभियान अखंडपणे चालणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे 2014 ते 2019 पर्यंत 10.24 कोटी घरगुती शौचालये बांधुन देण्यात आली आहेत.स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेत्यांद्वारे स्वच्छता राखली जावी यासाठी अनेक कायदे तयार केले.

--- 


स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध - Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

(३०० शब्द)

महात्मा गांधी यांच्या १४५ व्या जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबर २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन केले गेले. आपला देश देखील अन्य देशांप्रमाणे स्वच्छ व निरोगी राहायला पाहिजे यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील राजघाट येथून या मोहिमेला सुरुवात केली. भारताला शुद्ध व स्वच्छ देश बनवण्याचे स्वप्न महात्मा गांधींचे होते . त्यांच्या या स्वप्नाबद्दल बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते की स्वातंत्र्यापेक्षा देखील स्वच्छता जास्त महत्वाची आहे कारण स्वच्छता हा आपल्या शांत आणि निरोगी आयुष्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.


जर आपल्याला आपला देश स्वच्छ ठेवायचा असेल तर स्वच्छ भारत अभियान अखंडपणे चालू ठेवणे गरजेचे आहे. भारतातील जनतेच्या शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी भारतातील जनतेमध्ये स्वच्छतेची जाणीव पसरवणे अत्यंत गरजेचे आहे. या अभियानामुळे आपल्या देशावर खुप मोठ्या प्रमाणात चांगला प्रभाव पडला. स्वच्छ भारत अभियानामध्ये सफलता मिळवण्यासाठी सरकारने इंटरनेट ची देखील मदत घ्यायला सांगितली आहे. सरकारने जागा स्वच्छ करुन झाल्यानंतर त्याचे फोटो सोशल साइट्स वर शेयर करायला व नागरीकांना प्रवृत्त करायला सांगितले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला या अभियानामध्ये सामील होण्याचे आव्हान केले. या अभियानाला जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सेलीब्रीटींनी सुद्धा या अभियानाला हातभार लावला. पंतप्रधान व लोक सुद्धा या अभियानासाठी रस्त्यावर उतरले. वाराणसी येथील गंगेच्या तीरावरील अस्सी घाट येथे पंतप्रधानांनी उतरुन हातात झाडू घेतला व अस्सी घाट स्वच्छ केला.स्वच्छ भारत मीशनच्या पहिल्या टप्प्यामध्ये २०१४ ते २०१९ या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये उघड्यावर शौचाला बसण्याची पद्धत बंद करण्यासाठी प्रयत्न‌ करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत भारतामध्ये शंभर दशलक्षाहून जास्त शौचालये बांधण्यात आली. 


स्वच्छ भारत मीशनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देशामध्ये शौचालयाच्या नियमित वापरासाठी, नागरीकांना या योजनेच्या माध्यमातून शौचालये बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.या योजनेअंतर्गत शौचालये बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले गेले. भारतामध्ये स्वच्छ भारत मिशन शौचालय योजना ही योजना राबविण्यात आली. या योजने अंतर्गत ज्या घरात शौचालय नाही त्यांना शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. जर सर्वांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये एकत्र येऊन काम केले तर लवकरात लवकर आपल्याला पण आपला देश‌ परदेशाप्रमाणे स्वच्छ बघायला मिळेल.

---


स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध -  Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

( ४०० शब्द )

महात्मा गांधींच्या १४९ व्या जयंती च्या निमित्ताने २ ऑक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करण्यात आली. आपला भारत देश स्वच्छ करणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भारत देश स्वच्छ होईल असा विश्वास होता. महात्मा गांधी यांचे स्वप्न होते की आपला देश स्वच्छ व्हावा पण त्या काळात त्यांना स्वच्छता मोहिमेसाठी हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांची स्वच्छता मोहीम सफल झाली नाही. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. 


१ एप्रिल २०१२ रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निर्मल भारत अभियानाची सुरुवात केली होती. पण त्या वेळी त्यांची ही मोहीम हवी तशी सफल झाली नाही आणि ही मोहीम बंद करण्यात आली. पण २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियानामध्ये प्रचंड प्रतिसाद पहायला मिळाला. २०१९ पर्यंत आपला भारत देश पुर्णपणे स्वच्छ व्हायला हवा हा या मोहिमेचा उद्देश होता. या अभियानाअंतर्गत स्वच्छतेबद्दल लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यात आली. या अभियानाअंतर्गत देशात लाखो शौचालये बांधण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कचरा व्यवस्थापन यंत्रणा देखील तयार करण्यात आली. 


स्वच्छतेपासून आपल्याला खूप लाभ मिळतात. स्वच्छतेच्या सवयी मुळे आपले खुप प्रकारच्या रोगांपासून बचाव होते. खराब अन्नाचे सेवन केल्यामुळे व दुषित पाणी पिल्यामुळे टायफाॅइड , काॅलरा व पिलिया यांसारखे आजार होतात. जास्त दिवस पाणी साचून राहिल्यावर तिथे पाण्याची समस्या उद्भवते. यामुळे मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया सारख्या आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या सभोवतालामध्ये स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे. जर नागरिकांनी स्वच्छता राखली नाही तर देशात सर्वत्र जाण जमा होईल. खुप लोक कचराकुंडी असुनही कचराकुंडी मध्ये कचरा टाकत नाहीत तर इकडे तिकडे कचरा टाकून देतात. त्यामुळे अस्वच्छता पसरते‌. लोकांच्या मनात स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. 


स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यामागे कोणतेही राजकारण नाही. या अभियानामुळे लोकांच्या मनात देशमक्ती जागृत होते. स्वच्छ भारत अभियान सफल करण्यासाठी खूप लोकांनी हातभार लावला आहे.‌ या अभियानाअंतर्गत रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर स्वच्छतागृहे बांधण्यात आली. लोकांनी इकडे तिकडे कचरा टाकू नये म्हणून ठिकठिकाणी डस्टबिन ठेवण्यात आले होते. स्वच्छ भारत - स्वच्छ शाळा मोहीम केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे राबविण्यात आली होती. या मोहिमेचे शाळांमध्ये स्वच्छता ठेवणे हे उद्दिष्ट होते‌. या मोहिमेअंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. जसे की निबंध लेखन स्पर्धा, महान लोकांच्या योगदाना बद्दल भाषण, चित्रकला , आरोग्य व स्वच्छते बद्दल नाटक अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात आले होते. याशिवाय आठवड्यातून दोन वेळा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्यास सांगितले होते.


देशामध्ये स्वच्छता ठेवण्याचे काम फक्त शासनानेच नाही तर आपल्याला सुद्धा करायचे आहे. देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिले पाहिजे. भारतातील प्रत्येक नागरिकाने ही गोष्ट अगदी मनावर घेतली पाहिजे की आपल्या योगदानातून आपण एक दिवस नक्कीच आपल्या देशाला " स्वच्छ भारत, सुंदर भारत " बनवू शकतो.

---


मित्रांनो या लेखात मी आपल्यासाठी स्वच्छ भारत अभियान या विषयावरील काही मराठी निबंध उपलब्ध करून दिलेले आहेत. आशा आहे की आपणास हे Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi नक्की उपयोगाचे ठरतील. यामध्ये स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध हे चार प्रकारात दिले आहेत. ज्यात प्रथम निबंध हा 100 शब्द, दूसरा निबंध 200 शब्द, तिसरा निबंध 300 शब्द आणि चौथा निबंध हा 400 शब्दांचा आहे. आपणास हे निबंध कसे वाटले आम्हाला कमेन्ट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद..


Read More

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने