मित्रानो महान क्रांतिकारी भगत सिंह बद्दल तर आपणाला माहितीच असेल. भगत सिंह यांनी भारतीय स्वतंत्र लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे, याजच्या या लेखात आपण भगत सिंह यांची मराठी माहिती मिळवणार आहोत. ही माहिती तुम्ही भगत सिंह निबंध किंवा भगत सिंह भाषण मराठी म्हणून देखील वापरू शकतात.
भारताच्या स्वतंत्र लढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे व अवघ्या 23 वर्षाच्या वयात फाशीची शिक्षा स्वीकारणारे महान क्रांतिकारी भगत सिंह यांचा जन्म 23 मार्च 1907 साली पंजाब मधील ल्यालपुर जिल्ह्यातील बंगा या गावी झाला. त्यांचा वडिलांचे नाव किशन सिंह तर आईचे नाव विद्यावती होते. ज्या दिवशी भगत सिंह जन्माला आले त्याच दिवशी त्यांचे वडील व काका तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. त्यांचे वडील, काका व इतर बरेच सदस्य भारतीय स्वांत्र्यलढ्यात सामील होते, परिवारातील काही सदस्य हे पंजाब प्रांतातील त्या काळचे राजा 'महाराज रणजितसिंह' याच्या सैन्यात सैनिक म्हणून होते. परिवारातील या वातावरणाचा भगत सिंह यांच्यावर खोल प्रभाव पडला. लहापणापासूनच त्यांच्या शरीरात देशभक्ती जागृत झाली.
1916 साली ते लाहोर च्या डी ए वी विद्यालयात शिकू लागले. त्या काळात ते अनेक राजनेत्याच्या संपर्कात आले. 13 एप्रिल 1919 साली जेव्हा अमृतसर मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरण घडले तेव्हा भगत सिंह 12 वर्षाचे होते. या घटनेचा भगत सिंह यांच्या विचारावर खोल प्रभाव झाला. दुसऱ्या दिवशी ते जालियनवाला बाग गेले व तेथील माती उचलून आपल्या घरी घेऊन आले. या घटनेनंतर त्यांनी इंग्रजांना भारतातून बाहेर करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून दिले.
क्रांतिकारी जीवनाची सुरुवात-
महात्मा गांधींनी जेव्हा 1921 साली इंग्रज शासाना विरुद्ध असहयोग आंदोलन सुरू केले, तेव्हा भगत सिंह आपले शिक्षण सोडून या आंदोलनात सामील होऊन गेले. पण वर्ष 1922 मध्ये गोरखपूर मधील चौरीचौरा येथे झालेल्या हिंसेने व्यथित होऊन गांधीजींनी हे आंदोलन रोखून दिले. हे सर्व पाहून भगत सिंह निराश झाले. त्यांच्या लक्षात आले की आहिंसेने स्वतंत्र मिळवणे कठीण आहे. आहिंसेत त्याचा विश्वास कमी व्हायला लागला व त्यांनी निश्चय केला की ते सशस्त्र इंग्रजांशी युद्ध करतील. ते वेगवगळ्या क्रांतिकारी दलामध्ये शामिल होऊ लागले. या दरम्यान त्यांचा परिचय भगवती चरण वर्मा, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद व इतर क्रांतिकारीशी झाला.
लाला लजपतराय याच्या मृत्यू चा सूड-
फेब्रुवारी 1928 मध्ये इंग्लंड मधून सायमन कमिशन नावाचा ब्रिटिशांनी नेमलेला आयोग भारतात आला. या आयोगाचे काम स्वायत्तता व राजशाही मध्ये भारतीयांना समाविष्ट करणे हे होते. पण या आयोगात एकाही भारतीयाचा समावेश नव्हता. ज्यामुळे सायमन कमिशन विरुद्ध आंदोलन सुरू झाले. सायमन कमिशन विरुद्ध नारेबाजी करत असताना लाला लजपतराय याच्यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जबरदस्त लाठीचार्ज केला. ज्या मुळे घायाळ होऊन त्याचा मृत्यू झाला. भगत सिंह यांनी लाला लजपतराय याच्या मृत्यू चे जबाबदार ब्रिटिश अधिकारी स्कॉट याला समजले व स्कॉट ला मारण्याचा त्यांनी संकल्प केला.
पण चुकीने त्यांनी पोलिस अधिकारी जेम्स स्कॉट ऐवजी त्याचा सहायक पोलिस सौंडर्स याची गोळी मारून हत्या केली. या योजनेत चंद्रशेखर आझाद यांनी भगत सिंह यांचे सहकार्य केले. त्यांनी पकडायला येत असलेल्या पोलीस अधिकारी चानन सिंह ला सुद्धा गोळ्या मारून ठार केले. या घटनेनंतर फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी भागात सिंह यांनी लाहोर सोडले व ते हवड्याला आले.
विधान सभेत बॉम्ब फेकण्याची योजना-
इंग्रज शासनाचे भारतीयांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढीत होते. डिफेन्स ऑफ इंडिया या कायद्यानुसार इंग्रज सरकारने पोलिसांना अधिक अत्याचारी अधिकार देऊन टाकले. यानुसार संदिग्ध गतिविधिंवर रोक लाऊन अटक करण्याचा अधिकार देण्यात आला. केंद्रीय विधानसभेत आणलेला हा कायदा एका मताने हरून गेला. यानंतर इंग्रज सरकारने याला जनतेचा हिताचा सांगून एक अध्यादेशच्या रूपाने पास करण्याचा निर्णय घेतला.
भगत सिंह के कधीही हिंसेला योग्य समजणारे नव्हते. पण कार्ल मार्क्स च्या सिद्धांताने ते खूप प्रभावित होते. या मुळेच त्यांना श्रीमंतां द्वारे मजदुराच्या शोषणाची निती पसंद नव्हती आणि कारण त्या काळात इंग्रज मजदुरांवर अत्याचार करीत असत. त्यामुळे इंग्रजांना भारतीय शक्ती दाखवण्यासाठी त्यांनी अजून एक कठीण निर्णय घेतला. त्यांनी विधानसभेत बॉम्ब फेकण्याचा निर्णय केला.
ठरलेल्या कार्यक्रमानुसार 8 एप्रिल 1929 ला भगत सिंह व त्यांचे सहकारी बटुकेश्र्वर दत्त यांनी मिळून केंद्रीय विधान सभेच्या सत्रदर्म्यान विधानसभेत बॉम्ब फेकला. या हल्ल्यात कोणीही ठार होऊ नये याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. बॉम्ब अश्या जागी फेकण्यात आला जेथे कोणीही उभे नव्हते. बॉम्ब मुळे पूर्ण हॉल धुक्याने भरून गेला. भगत सिंह व बटुकेश्र्वर दत्त तिथून पळू शकले असते पण त्यांना आपल्या कार्याचा दंड स्वीकार होता. बॉम्ब फुटल्यानंतर त्यांनी 'इंकलाब झिंदाबाद' व 'साम्राज्यवाद मुर्दाबाद' असे नारे दिले. आपल्या हातात आणलेले कागद हवेत उडून दिले. काही वेळात पोलिस आले व त्यांनी दोघांनीही बंदी बनवले. ज्या वेळेस त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्या दोघांनी खाकी शर्ट व निकर घातले होते.
भगत सिंह, सुखदेव व राजगुरू यांना फाशी-
7 ऑक्टोबर 1930 ला भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विशेष न्यायालय द्वारे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अनेक भारतीय नेत्यांच्या विरोध असताना देखील 23 मार्च 1931 ला त्या तिघांना फाशी देण्यात आली. फाशी ल जात असताना देखील मस्ती व आनंदाने ते तिघेही गात होते..... मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे बसंती चोला.