माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध| Maza Avadta Khel Football Marathi Nibandh.

मित्रानो आपल्या देशात वेगवेगळे खेळ खेळले जातात. पण आजच्या या निबंधाचा विषय आहे माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध (Football Marathi Nibandh.). या निबंधाला तुम्ही आपल्या शाळेचा होमवर्क म्हणून वापरू शकतात. तर चला मग सुरू करू....


माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध| Maza Avadta Khel Football Marathi Nibandh.

1) माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध (Maza Avadta Khel Football Nibandh).

खेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. पण या सर्वात माझा आवडता खेळ फुटबॉल हा आहे. फुटबॉल ला जगातील सर्वात मनोरंजक खेळामधून एक मानले जाते. हा खेळ विविध देशातील युवकाद्वारे मोठ्या आवडीने खेळला जातो. फुटबॉल व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक रूपाने मजबूत बनवतो. पूर्वीच्या काळी हा खेळ फक्त पश्चिमी देशाद्वारे खेळला जायचा. नंतरच्या काळात हा पूर्ण जगात पसरत गेला.


फुटबॉल खेळाच्या उत्पत्ति बद्दल म्हटले जाते की हा खेळ चीनी खेळ सुजू सारखा आहे, व सुजू पासूनच फुटबॉल विकसित झाला. पूर्वी जपान मध्ये असुका वंशाचे लोक फुटबॉल खेळत असत. या नंतर या खेळाचा विस्तार जगभरातील वेगवेगळ्या देशात झाला. भारतात फुटबॉल खेळाला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले त्यांचे नाव 'नागेन्द्र प्रसाद सर्वाधिकारी' आहे. त्यांना 'भारतीय फुटबॉल चे जनक' म्हणूनही संबोधले जाते. नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला. त्यानंतर त्यांनी अनेक शाळांमध्ये या खेळाला खेळवणे सुरू केले.


फुटबॉल खेळण्यासाठी वापरला जाणारा बॉल मजबूत रबर पासून बनवला जातो. यात टाईट हवा भरलेली असते. फुटबॉल खेळत असतांना खेळाडूला आपले संपूर्ण लक्ष चेंडूवर ठेवावे लागते. हा खेळ दोन संघाद्वारे खेळला जातो. प्रत्येक टीम मध्ये 11 खेळाडू असतात. फुटबॉल चे मैदान आयाताकृती असते. दोघी बाजूंना नेट ने बनवलेले गोल पोस्ट असते. प्रत्येक संघाला विरोधी पक्षाच्या गोल पोस्ट मध्ये बॉल टाकून जास्तीत जास्त गोल करायचे असतात. या खेळाचे काही नियम पण असतात. जसे यात फूट बॉल ला हात लावण्याची परवानगी नसते, ठराविक अंतरावरून गोल करावे लागते. हा खेळ 90 मिनिटाचा असतो. 


आज आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅचेस सुद्धा आयोजित केल्या जातात. हा खेळ मनोरंजन, आनंद व शरीराचा व्यायाम व्हावा या हेतूने खेळला जातो. फुटबॉल खेळल्याने शरीराला अनेक फायदे होतात. या खेळात लगातार पळत राहावे लागते. ज्यामुळे शरीराचा चांगलाच व्यायाम होतो. अन्न पचन लवकर होते व भूक पण चांगली लागते. मी माझ्या मित्रांसोबत शाळेत दररोज फुटबॉल खेळतो. फुटबॉल मुळे माझे शरीर मजबूत झाले आहे. व माझी रोगप्रतिकार शक्ति वाढली आहे. 


फुटबॉल जगभरात लोकप्रिय आहे. परंतु आजकाल फुटबॉल च्या बऱ्याच सामन्यामध्ये मॅच फिक्सिंग केली जाते, असे करणे योग्य नाही. खेळाला शारीरिक लाभ, सहयोग आणि शिस्ती च्या भावनेने खेळायला हवे. या खेळात एक संघ हरतो व एक जिंकतो परंतु या हार जीत मुळे प्रेम कमी न होता वाढतेच.


फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती वाचा येथे 


2) माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध (Maza Avadta Khel Football Nibandh).

खेळणे मुलांना खूपच आवडते. आमच्या शाळेत देखील वेगवेगळे खेळ खेळले जातात. क्रिकेट हा त्यातील सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ आहे. खेळणे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.  आमच्या वर्गातील अधिकाधिक मुले क्रिकेट खेळतात पण माझा आवडता खेळ फुटबॉल आहे. मला फुटबॉल खेळायला तर आवडतेच पण फुटबॉल च्या मॅचेस बघायला पण खूप आनंद वाटतो. 


फुटबॉल चा खेळ मोकळ्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन्ही बाजूंना गोल पोस्ट असतो. हा खेळ दोन संघामध्ये खेळला जातो. खेळात 9-9 किंवा 11-11 खेळाडू असतात. फुटबॉल हा खेळ 90 मिनिटाचा असतो. प्रत्येक संघाला विरोधी पक्षाच्या गोल पोस्ट मध्ये बॉल टाकून जास्तीत जास्त गोल करायचे असतात. या खेळला खेळणारे व पाहणारे दोघेही आनंद घेतात. हा खेळ तेव्हा जास्त रोमाचक वाटायला लागतो, जेव्हा कोणत्याही एका टीम मधील खेळाडू बॉल घेऊन दुसर्या टीम चे पोस्ट मध्ये गोल करायला जात असतो. फुटबॉल खेळल्याने शरीराच्या सर्व अवयवांना व्यायाम मिळतो. शरीरात स्फूर्ती वाढते. सहयोग आणि शिस्तीची भावना पण वाढते. कोलकत्यात तर हा खेळ अधिकच लोकप्रिय आहे.


Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

5 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने