[सुट्टी] मिळण्यासाठी अर्ज मराठी। रजा अर्ज नमुना मराठी। Leave application in marathi.

नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे शाळेत किंवा ऑफिस मध्ये सुट्टी मिळण्यासाठी चा अर्ज, हा अर्ज सुट्टीसाठी रजा अर्ज चा मराठी नमुना आहे. हे Leave application in marathi तुम्हाला सुट्टी मिळण्यासाठी खूप उपयुक्त आहे.  


रजा अर्ज नमुना मराठी

शाळेतून सुट्टी मिळवण्यासाठी रजा अर्ज नमुना मराठी Leave application for school in marathi


 प्रति 
माननीय मुख्यध्यापक 
(शाळेचे नाव )
विषय: सुट्टी साठीचा अर्ज.


आदरणीय सर/मॅडम

      माझे नाव मोहित रवींद्र पाटील आहे. मी आपल्या शाळेत इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न आहे. लग्न साताऱ्यात आहे. या लग्नासाठी आम्ही घरातील सर्वजण जाणार आहोत व म्हणून मी 2 फेब्रुवारी ते 6 फेबरुवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहील. या रजा काळात माझा राहिलेला अभ्यास मी माझ्या मित्र मैत्रिणी कडून पूर्ण करून घेईल. मी अभ्यासात मागे पडणार नाही अशीही मी खात्री देतो. 

      तरी कृपया आपण मला या 5 दिवसांची रजा मंजूर करावी. ही नम्र विनंती. तसदी बद्दल क्षमा असावी.      


                                                                                  आपला नम्र 

                                                                               (मोहित पाटील) 

                                                                            (ई. 8वी, तुकडी: अ)


कंपनीतून रजा मिळवण्यासाठी अर्ज - Leave application in Marathi for office


प्रति 

मा. मॅनेजर साहेब

(कंपनीचे नाव)

(कंपनीचा पत्ता)

दिनांक: 


विषय: 1 दिवसाची रजा मिळण्याबाबत

आदरणीय सर / मॅडम

     वरील विषयाला अनुसरून मी आपणास सांगू इच्छितो की उद्या दिनांक: .... रोजी मी आपल्या कंपनीत कामावर उपस्थित राहू शकणार नाही. माझ्या उद्याच्या सुट्टीचे कारण असे आहे की उद्या मला संमेलनासाठी बाहेर गावी जायचे आहे. 

      माझ्या उज्वल भविष्यासाठी मला ह्या संमेलनात उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण मला केवळ एक दिवसाची सुट्टी मंजूर करावी ही विनंती. एका दिवसाच्या सुट्टीनंतर दिनांक: .... पासून मी पुन्हा आपल्या कामावर रुजू होईल. 


आपला विश्वासू

(तुमचे नाव व सही)


तर मित्रहो हे होते काही रजा अर्ज नमुना मराठी आणि सुट्टी मिळण्यासाठी चे मराठी अर्ज. आशा आहे की हे leave application marathi तुम्हास उपयुक्त ठरले असेल. धन्यवाद. 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने