माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

माझा आवडता ऋतू | उन्हाळा निबंध मराठी| Maza avadta rutu nibandh



1] माझा आवडता ऋतू (Summer essay in Marathi) (200 words)

भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही लोकांना हा ऋतु खूप आवडतो. उन्हाळा 4 महिन्यासाठी असतो (मार्च, एप्रिल, मे आणि जून) पण या महिन्यापैकी मे आणि जून हे सर्वात जास्त गरम महिने असतात. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 


उन्हाळ्याची सुरवात होळी च्या उत्सवानंतर व्हायला लागते. या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे बाषपीभवन होऊन त्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलजाना सुट्ट्या असतात. त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो. 


पण एकीकडे हा ऋतु लहान मुलांना आनंद देतो तर दुसरी कडे याचे नुकसान पण सहन करावे लागतात. उन्हाळा लोकांना खूप साऱ्या संकटात देखील टाकतो. अतिउच्च उष्णते मुळे उन्हाळ्याच्या दुपारी शरीरात पाण्याच्या कमतरतेने लोकांना लू लागल्याने आजार वाढतात. यामुळे बरेच लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात. 


उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच ठिकाणी लोक पाण्याच्या कमतरते मुळे दुष्काळाला सामोरे जातात. कारण या दरम्यान सर्व नद्या, नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडतात. या सोबतच झाडांचे पाने सुद्धा पाण्याचे कमतरतेने गळून पडतात. चारही बाजूंना धूळ युक्त गरम हवा वाहत असते, हि हवा लोकांच्या आरोग्याला हानिकारक असते. म्हणून अश्या काळात अधिकाधिक फळ खायला हवीत. थंड पेय प्यायला हवीत व उन्हापासून स्वतःचा बचाव करायला हवा.



2] माझा आवडता ऋतू उन्हाळा. (Summer marathi essay 2) (300 words)

उन्हाळा हा वर्षातील 4 ऋतु पैकी एक आहे. वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असताना देखील मुलांना हा ऋतु खूप आवडतो. कारण या ऋतूत खूप साऱ्या पद्धतींनी मुलांना आनंद मिळतो. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 


उन्हाळ्याला उष्णतेचा ऋतु म्हटले जाते. यालाच ग्रीष्म ऋतु देखील म्हटले जाते. ग्रीष्म ऋतू ची सुरुवात वसंत ऋतु नंतर होते. आपण सर्व जाणून आहोत की पृथ्वी गोलाकार आहे आणि ती स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक गोलार्ध सुर्याचा जवळ पोहोचतो त्यावेळी पृथ्वीच्या त्या भागावर उष्णता निर्माण होतो. व या कालावधीला उन्हाळा म्हटले जाते. भारतात उन्हाळ्याचा काळ हा एप्रिल महिन्यांपासून सुरू होतो. 


हिवाळ्यात हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन देखील उन्हाळ्यात नकोसे होऊन जाते. कारण या काळात सुर्याचा प्रकाश खूप प्रखर असतो. परंतु मुलांना हा काळ खूप आवडतो. उन्हाळ्याच्या या काळात शाळा कॉलेजला दीर्घ सुट्टी मिळाली असते. लहान मुलांना शाळेत जाण्याचे टेन्शन राहत नाही. 


शहरी भागातील लोक जास्त प्रमाणात उष्णता सहन करू शकत नसल्याने ते सुट्टीच्या काळात आपल्या कुटुंबासह सुट्या साजऱ्या करण्यासाठी थंड स्थानांना भेट देतात. समुद्र, पहाडी क्षेत्र अश्या ठिकाणी पिकनिक स्पॉट बनवले जातात. लोकांना उन्हाळ्यात पोहणे, उन्हाळ्याचे फळ खाणे व शीतल पेय पिणे आवडते. 


काही लोकांना उन्हाळा चांगला वाटतो कारण ते थंड प्रदेशात जाऊन आनंद घेतात व स्वतःचे मनोरंजन करवून घेतात. पण ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना साठी उन्हाळा सहन करण्याजोगा नसतो. उष्णतेमुळे नैसर्गिक स्रोतांचे कमी व्ह्यायाला लागते. नद्या, तलाव व विहिरी सुखल्या मुळे लोकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यासाठी हा काळ पेरणी चा असतो त्यामुळे त्याला अधिक मेहनत घ्यावी लागते. 


मुलांसाठी हा ऋतु खूप मस्त आहे कारण याच महिन्यामध्ये त्यांना उन्हाळी सुट्ट्या मिळतात. मुले परिवारासोबत मौज करतात. फिरायला जातात आणि उन्हाळ्याच्या फळांसोबत शीतल पेय व आईस क्रीम देखील खातात. सुर्य उगवण्याआधी लोक सैर सपाटा मारायला जातात. आणि इत्यादि अनेक करणे आहेत ज्यामुळे मला देखील उन्हाळा खूप आवडतो. 


3] माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध (My Favourite season summer essay in Marathi) (400 words)

उन्हाळा हा वर्षातील तीन ऋतु पैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असला तरी लहान मुलांना हा ऋतु इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो. कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतुत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात. 


संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसांच्या असतात. या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे. 


मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा, मावशी व आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यामध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो.


दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अश्यावेळी मी मस्त पैकी कूलर लाऊन टीव्ही वर माझे आवडते कार्टून पाहतो. थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजाच वेगळी असते. या शिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू शरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस क्रीम या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडते. 


मागील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मी स्केटिंग शिकण्याचा विचार केला होता. स्केटिंग एक मनोरंजक खेळ आहे. माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता. लवकरच मी या खेळात तरबेज झालो. उन्हाळ्याच्या या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दरवर्षी काही न काही नवीन शिकत असतो.


उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोज च्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो. या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देखील देतात. आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो. समुद्र, पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प करून दिवस घालवले आहेत. पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याची योजना देखील बनवली आहे. 


उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळवा म्हणून तर आहेच पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते. जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्ट्यांचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकू शकतात. या वेळेत सामान्य ज्ञान वाढवणे नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्याचा सुट्ट्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत. म्हणूनच माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे.



तर मित्रांनो हे होते माझा आवडता ऋतू उन्हाळा (maza avadta rutu nibandh) या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. आमच्या या website वर तुम्हाला मराठी भाषणे व मराठी निबंध मिळतील, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला निबंध किंवा भाषण तयार करायचे असेल तेव्हा भेट द्या https://www.bhashanmarathi.com/ ला


माझा आवडता ऋतू उन्हाळा विडिओ पहा-


  • अधिक वाचा- 

  1. पावसाळा मराठी निबंध।
  2. हिवाळा मराठी निबंध।

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने