शिवाजी महाराजांविषयी माहिती | Shivaji Maharaj information in marathi

शिवाजी महाराजांविषयी माहिती | Shivaji Maharaj information in marathi



शिवाजी महाराज बालपण माहिती (shivaji maharaj balpan mahiti) 

मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. एक आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या सात्विक स्त्री होत्या, त्या शिवरायांना लहान असताना युद्धाच्या गोष्टी सांगत असत. रामायण महाभारतातील कथा सुद्धा त्या सांगायच्या. या सर्व गोष्टींचा शिवरायांवर खूप प्रभाव झाला. ज्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा भारतात विदेशी व अत्याचारी मुस्लिम शासकांचे राज्य होते. मुस्लीम शासकांद्वारे भारतीयांवर होत असलेली आक्रमणे, लूट व धार्मिक सक्ती पाहून शिवरायांनी 16 वर्षाच्या वयातच स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला. शिवराय लहान असताना शहाजी राजांनी त्यांना व जिजाबाईंना दादाजी कोंडदेव यांच्या जवळ सोडून दिले. दादाजी कोंडदेवानीच शिवरायांना युद्ध कला, जसे घोडस्वरी, तलवारबाजी, बान मारणे असे शिक्षण दिले.


शिवरायांचा विवाह/लग्न-

10 वर्षाच्या असताना 14 मै 1640 रोजी महाराजांचे लग्न सईबाई यांच्याशी लाल महल पुणे येथे करण्यात आला. शिवाजी महाराज्यांच्या पत्नीचे चे पूर्ण नाव सईबाई निबळकर असे होते.


शिवाजी महाराजांचे आदिलशाह साम्राज्यावर आक्रमण-

मुघलांच्या ताब्यात असलेले गड किल्ले परत मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात, त्यांच्याशी सहमत असलेल्या समवयस्क तरुणान सोबत केली. वर्ष 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह आदिलशाहच्या कोंढाणा किल्यावर हल्ला करून त्याला जिंकून घेतले. या नंतर आदिलशाह च्या सेनेने शहाजी राजांना बंदी बनून घेतले व शिवरायांना कोंढाणा सोडण्याची मांग केली. वडिलांना वाचवण्यासाठी त्यांना कोंढाणा सोडावा लागला. शाहजी राजाच्या मुक्ततेनंतर 1645 सालीच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर शिवाय महाराजांनी परत आक्रमण करणे सुरू केले.


अफजलखानाचा वध (shivaji maharaj afzal khan vadh)-

वर्ष 1659 मध्ये आदिलशाह ने आपला सगळ्यात बहादुर सेनापती अफजलखानाला शिवरायांना मारण्यासाठी पाठवले. त्या वेळी महाराज प्रतापगडावर होते. अफजलखानाने मैत्रीच्या नात्याने शिवरायांना भेटण्याचे खोटे नाटक केले. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका झोपडीत शिवराय व अफजलखान 10 नोव्हेंबर 1659 ला भेटले. दोघांमध्ये शर्त होती की सोबत एका तलवारी शिवाय कोणतेही हत्यार आणायचे नाही. शिवरायांना माहीत होते की अफजलखान त्यांना मारण्यासाठी आलेला आहे म्हणून त्यांनी आपल्या कपड्यांखाली चिलखत चढविले होते व हातात वाघाची नखे लपवून ठेवली. ज्या वेळी शिवराय झोपडीत पोहचले तेव्हा अफजल खानाने त्यांना मिठी मारण्यासाठी हाथ पुढे केले, शिवरायांनी सुद्धा त्याला मिठी मारली पण दुसऱ्याच क्षणी अफजल खानाने आपल्या हातात असलेल्या चाकूच्या सहायाने शिवरायांच्या पाठीवर वार केला. परंतु चिलखत घातले असल्याकारणाने महाराज बचावले. दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपल्या हातात असलेल्या नखांनी अफजलखानावर हमला केला. जोरदार हमल्याने अफजल खान घायाळ झाला व काही मिनिटातच तो मारला गेला. भेटीपूर्वी ठरलेल्या हालचाली नुसार महाराजांनी सैन्याला इशारा दिला. शिवरायांचे सैन्य अफजलखानाच्या बेसावध सैन्यावर तुटून पडले. या युद्धात महाराजांनी हत्ती, घोडे, उंट, मौल्यवान रत्न, अलंकार ई. संपत्ती लुटली.


शिवाजी महाराज शाहिस्तेखान हल्ला (shivaji maharaj shahistekhan)- 

मुघल शासक औरंगजेबाचे लक्ष उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वळले. औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल जाणून होता. त्याने दक्षिण भारतात त्याचा मामा शाहिस्तेखान याला सुभेदार म्हणून नेमले. शाहिस्तेखान आपल्या 1 लाख 50 हजार सैनिकांना घेऊन पुणे पोहचला व तेथे त्याने लूटपाट सुरू केली. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील लाल किल्ल्यात त्याने तळ ठोकला. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला मारण्यासाठी योजना बनवली. महालाजवळून जाणाऱ्या एका लग्न मिरवणुकीचा आधार घेत शिवाजी महाराज आपल्या काही साथीदारांसोबत पहारेकरीच्या नजरा चुकवत महालात शिरले. महाराजांना लाल महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. आवाजाने शाहिस्तेखान जागे झाला, महाराजांना समोर पाहून तो घाबरला जीव वाचवण्यासाठी त्याने महालाच्या खिडकीतून उडी मारली. शिवाजी महाराजांनी चपळाईने त्याच्यावर तलवारीचा वार केला पण या हा वार त्याच्या हाताच्या बोटावर लागला व त्याची तीन बोटे कापली गेली. शाहिस्तेखान तेथून पडून गेला. महाराजांच्या या शौर्य मुळे त्यांची कीर्ती अधिकच वाढून गेली.


शिवाजी महाराजांचा मृत्यु कसा झाला. (Shivaji Maharaj death in marathi.)

नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी मुघलांना सळो कि पळो करून सोडले. महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या सुरत शहरावर लूट करून खूप सारे धन मिळवले. आज शिवाजी महाराज महाराष्ट्रीयनासाठी दैवता प्रमाणे आहेत. शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आजही महाराष्ट्रासह पूर्ण देशात सांगितल्या जातात. शिवाजी महाराज गोरिल्ला युद्ध कलेचे जनक म्हणून देखील ओळखले जातात. मराठा साम्राज्याचे जनक शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 साली अवघ्या चाळीस वर्षाच्या वयात निधन झाले. परंतु अवघ्या 340 वर्षानंतर आजही महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात ते जिवंत आहेत.  जय हिंद जय शिवराय.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने