माझा आवडता नेता निबंध | Maza Avadta Neta Marathi Nibandh

Maza avadta neta nibandh: मित्रानो आजवर भारतात अनेक महान क्रांतिकारी व नेते होऊन गेले आहेत. यांनी देशासाठी केलेले कार्य खरोखर कौतुकाचे आहे. आज मी तुम्हाला माझा आवडता नेता या विषयावर तीन निबंध देत आहे, यात पाहिला निबंध माझा आवडता नेता महात्मा गांधी, दुसरा सुभाष चंद्र बोस व तिसरा नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. तर चला सुरु करा...


[My Favourite Leader Marathi Essay]

1) माझा आवडता नेता (महात्मा गांधी) Maza Avadta Neta Mahatma Gandhi

माझे आवडते नेता महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातच्या पोरबंदर गावी झाला. भारताच्या स्वतंत्र लढ्यात गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने कार्य केले. त्यांनी इंग्रजांना भारतातून पळवून लावण्यासाठी आंदोलने करून भारतीयांना एकत्रित केले. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून देखील संबोधले जाते. 


गांधीजी लहान वयापासूनच अतिशय शुद्ध, शांत व सात्विक वृत्तीचे होते. ते पूर्णपणे शाकाहारी होते. गांधीजींनी आपले उच्च शिक्षण लंडन येथून पूर्ण केले. येथेच त्यांनी बॅरिस्टर ची पदवी मिळवली. गांधीजीचे सार्वजनिक जीवन दक्षिण आफ्रिकेत सुरू झाले. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना गंभीर वंशवादाचा सामना करावा लागला. भारतीयावार होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकत्रित करून त्यांनी सत्याग्रह केला व भारतीयांना त्याचे हक्क मिळवून दिले.


गांधीजी जेव्हा आफ्रिकेतून भारतात आले, तेव्हा ते राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांनी चंपारण सत्याग्रह, खिलाफत आंदोलन, असहयोग आंदोलन, स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह, हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन असे एक न अनेक आंदोलने केली. गांधीजीच्या भारत छोडो आंदोलनात लाखो लोक सामील झाले व इंग्रजांद्वारे हजारो स्वतंत्र सेनानी मारले देखील गेले. महात्मा गांधी सोबत लढलेल्या या सर्व स्वतंत्र सैनिकांमुळे भारत शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.


महात्मा गांधीचे जीवन अतिशय साधे होते. येवढे साधे जीवन असताना देखील त्याचे विचार अतीउच्च होते. त्यांनी भारतीयांना अहिंसेचा धडा शिकवला. महात्मा गांधी एक समाज सुधारक होते त्यांनी अनेक कूरितीना बंद केले. इत्यादी अनेक कारणांमुळे महात्मा गांधींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. आणि म्हणूनच माझे आवडते नेता महात्मा गांधी आहेत. Read more...
2) माझा आवडता नेता (सुभाष चंद्र बोस) Maza Avadta Neta Subhash chandra bose marathi essay.

तसे पाहता भारतीय स्वातंत्रयलढ्यात अनेक वीरांनी बलिदान दिले. पण माझे आवडते नेता नेताजी सुभाष चंद्र बोस हे आहेत. कारण नेताजींनी भारतीय स्वतंत्र लढ्यात इतर भारतीय नेत्यापेक्षा जास्त कठीण व महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नेताजींच्या जन्म 23 जानेवारी 1887 ला ओडिसा राज्यातील कटक शहरामधील एका बंगाली हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. 


नेताजींनी आपले शिक्षण कटक मधील रेवनशा काँलेजियेट स्कूल मधून पूर्ण केले. नेताजींनी 15 वर्षाच्या लहान वयातच स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण साहित्य वाचून काढले. उच्च शिक्षण त्यांनी इंग्लंड मधून पूर्ण केले. त्यांनी सिव्हिल सर्व्हिस च्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. त्यांनी जर ठरवले असते तर इंग्लंड मध्येच ते एशोआरमाचे जीवन जगू शकले असते पण आपल्या देशासाठी त्यांच्यात प्रचंड देशभक्ती ची भावना भरली होती, त्यांनी भारतात परत येऊन गांधीजींच्या असहयोग आंदोलनात सक्रिय प्रवेश केला.


नेताजी काँग्रेस चे अध्यक्ष देखील बनून गेले. इंग्रज शासनाविरुद्ध त्याच्या उग्र विचारांना पाहून इंग्रजांनी त्यांना नजर कैद केले. आपले रूप बदलवून ते भारतातून जर्मनी पोहोचले. जर्मनीत हिटलर शी त्याची भेट झाली. हिटलर कडून त्यांना मदतीचे आश्वासन पण मिळाले. 1943 साली ते जर्मनी हून जपान पोहोचले. सशस्त्र क्रांती द्वारे भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी "आझाद हिंद फौज" ची स्थापना केली. दुसऱ्या महायुध्दात आझाद हिंद फौज च्या सैनिकांनी आपले शौर्य दाखवले. पण जपान द्वारे समर्पण केल्याने सर्व सैनिकांना इंग्रजांनी अटक केली. 


सुभाष चंद्र बोस यांनी देशवासीयांना आव्हान केले की "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा". 18 ऑगस्ट 1945 ला टोकियो जाताना तैवान हवाई दुर्घटना दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला. परंतु त्याचे मृत शरीर अजुनही मिळालेले नाही. भारताच्या स्वतंत्र लढ्यात आपली अती महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या महान क्रांतिकारीला माझे प्रणाम. Read More...
3) माझा आवडता नेता (नरेंद्र मोदी) Maza Avadta Neta Narendra modi.

भारतात आज पर्यंत अनेक नेते पंतप्रधान व राष्ट्रपती होऊन गेलेत. पण लगातार दोन वेळा प्रचंड बहुमतांनी निवडून येणारे भारतीयाचे सर्वात आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. नरेंद्र मोदी माझे आवडते नेता आहेत. ते स्वतंत्र भारताचे 15 प्रधानमंत्री आहेत. त्याचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये पाहिली निवडणूक लढवली व ते प्रचंड बहुमतांनी विजयी देखील झाले या नंतर 2019 साली देखील त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले.


नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली गुजरातमधील वडनगर गावी झाला. भारत पाकिस्तान युधादर्म्यान त्यांनी रेल्वे स्टेशन वर असलेल्या सैनिकाची मनोभावे सेवा केली. किशोर अवस्थेत त्यांनी आपल्या भावासोबत एक चहा ची दुकान देखील चालवली. लहानपणापासूनच नरेंद्र मोदींची धर्मा मध्ये रुची होती साधू संत याचे सरल जीवन त्यांना प्रभावित करत असे. बऱ्याचदा त्यांनी हिमालयात जाऊन ध्यान व तप पण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते नियमित जात असत. येथूनच त्याच्या देशाविषयी प्रेम व देशभक्तीची भावना विकसित झाली. 


नंतरच्या काळात मोदी राजनीति मध्ये आले, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून ते काम सांभाळू लागले. 2001 साली ते पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री बनले. 2001 पासून ते 2014 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. नरेंद्र मोदींच्या विकास कार्यामुळे गुजरातची खूप प्रगती झाली. मोदी एक चांगले वक्ता आहेत. स्वभावाने अतिशय शांत, प्रेमळ व साधे अशे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी अनेक योजना लागू केल्या. सेनेला मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या निर्णय पण घेतले.


नरेंद्र मोदी भारताच्या सर्वात यशस्वी नेत्या पैकी एक आहेत. देशाच्या विकासामध्ये त्याचे कार्य मोलाचे आहे व अजुनही ते आपले कार्य करीत आहेत. म्हणूनच माझे आवडते नेता नरेंद्र मोदी हे आहेत. READ MORE...


माझा आवडता नेता नरेंद्र मोदीं निबंध विडिओ पहा-


Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने