माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध | Maza Avadta Abhineta Nibandh Marathi

माझा आवडता अभिनेता - Maza Avadta Abhineta / kalakar marathi essay. 


essay on actor marathi, maza avadta abhineta
Majha Avadta kalakar/Abhineta

1) अमिताभ बच्चन 

तसे पाहता हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेता व अभिनेत्री आहेत. प्रत्येकामध्ये काही न काही विशेषता आहे. भारताचा चित्रपट व्यवसाय हॉलिवुड नंतर जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. म्हणूनच भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोक मुंबई शहरात येऊन अभिनय करण्याचे स्वप्न पाहतात. टीव्ही चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार कोणतातरी अभिनेता आवडतो. 


मला बॉलिवुड चे शहंशाह म्हणून ओळखले जाणारे जुने अभिनेता अमिताभ बच्चन आवडतात. ते माझे आवडते अभिनेता आहेत. अमिताभ बच्चन कोणतीही भूमिका अतिशय सहजपणे निभावतात. मग ती कॉमेडी असो वा ट्रॅजेडी, अँक्शन असो किंवा भावुकता. 78 वर्षाच्या वयातही त्यांचे डोळे चमकदार आणि आवाज दमदार आहे. नव्वदच्या दशकात अनेक नवनवीन कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीत आले. परंतु बच्चन साहेबांची प्रसिद्धी अजिबात कमी झाली नाही. फक्त मीच नाही तर माझे पूर्ण कुटुंब अमिताभ बच्चन यांचे प्रशंसक आहेत. 


अमिताभ बच्चन हरिवंश राय बच्चन यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील एक प्रसिद्ध लेखक होते. ज्यामुळे अमिताभ बच्चन साहित्यिक वातावरणात वाढले. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पूना फिल्म येथे अभिनयाचे शिक्षण प्राप्त केले. सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनी ख्वाजा अहमद अब्बास यांचा चित्रपट 'सात हिंदुस्तानी' मध्ये काम केले. या चित्रपटांमुळे त्यांची एक वेगळी ओळख बनत गेली. अमिताभ बच्चन यांच्या पहिला महत्त्वपूर्ण चित्रपट 'आनंद' होता. या चित्रपटाने पाहणाऱ्याच्या मनावर एक वेगळी छाप सोडली. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. यानंतर त्यांनी जंजीर, मुकद्दर का सिकंदर, कुली, अमर अकबर अँथनी, शोले, अभिमान, शराबी, इंकलाब इत्यादी एकाहून एक सुपरहिट चित्रपट केले व या नंतर त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहचून गेली.


अमिताभ बच्चन यांचे आजचे वय 78 वर्ष आहे तरही ते न थकता नवनवीन चित्रपटात काम करीत आहेत. इत्यादी अनेक कारणांमुळे अमिताभ बच्चन माझे आवडते अभिनेता आहेत.


2) सलमान खान 

अभिनेता हा असा व्यक्ती असतो जो चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाचा आवडता असतो. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगवेगळी असते. मला फाईटींग आवडते म्हणून माझा आवडता हिरो सलमान खान आहे. सलमान खान हा फक्त त्याच्या अभिनयाने नव्हे तर स्वभावामुळे पण लोकप्रिय आहे. सलमान खानचा वाढदिवस दरवर्षी 27 डिसेंबर ला येतो. त्यांच्या चित्रपट करीयर ची सुरुवात बीवी हो तो ऐसी या चित्रपटापासून झाली होती. 1989 मध्ये त्यांनी मैने प्यार किया या पहिल्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. सलमान खान यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यांचा बॉलिवुड मध्ये प्रवेश झाला. 


आजपर्यंत सलमान खान यांनी अनेक मोठं मोठ्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक सुपर हिट चित्रपटात काम केले आहे. मला त्यांचे दबंग आणि बजरंगी भाईजान हे चित्रपट विशेष आवडतात. सलमान खान यांना फोर्ब्स द्वारे जगातील 100 सर्वात जास्त पैसे कमावणार्या लोकांमध्ये देखील स्थान देण्यात आले आहे. सलमान खान यांच्या बिगबॉस या टीव्ही कार्यक्रमाला भारतासह जगभरात पहिले जाते. 


चित्रपट व अभिनय क्षेत्रा ऐवजी सलमान खान यांनी गरीब व गरजू लोकांसाठी अनेक कार्य केले आहेत. त्यांनी बिंग ह्यूमन फाऊंडेशन ची स्थापना करून गरजूंना मदत केली आहे व अजुनही करीत आहेत. सलमान खान यांना लोक प्रेमाने भाईजान म्हणतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय छान आहे. टीव्ही शोज मध्ये ते अतिशय शांत व दयाळू स्वभावाचे दिसतात. भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोक त्यांचे व त्यांच्या चित्रपटांचे चाहते आहेत. आणि माझा आवडता अभिनेता देखील सलमान खानच आहे.

WATCH VIDEO:तर मित्रानो हा होता माझा आवडता अभिनेता अमिताभ बच्चन या विषयावरील निबंध, जर तुम्हाला अजून दुसऱ्या अभिनेता अथवा अभिनेत्री वर निबंध हवा असेल तर आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा. 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

5 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने