ब्लॉग म्हणजे काय व ब्लॉग कसा तयार करावा | Blog meaning in marathi

ब्लॉग म्हणजे काय मराठी माहिती आणि ब्लॉग कसा तयार करावा - Blog meaning in marathi

मित्रांनो आजच्या आधुनिक युगात ऑनलाइन काम करून पैसे कमवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. त्यातीलच एक प्रसिद्ध earning प्लॅटफॉर्म म्हणजे blogging करणे होय. 

ज कोणीही काही मिनिटातच स्वताचा ब्लॉग तयार करू शकतो. जर आपणास माहीत नसेल की ब्लॉग म्हणजे काय आणि ब्लॉग कसा तयार करावा तर आजच्या या लेखामध्ये आपण Blog meaning in marathi ब्लॉग बद्दलची मराठी माहिती  मिळवणार आहोत. 


Blog meaning in marathi

ब्लॉग म्हणजे काय - Blog Meaning in Marathi

ब्लॉग म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर एक अशी ऑनलाईन जागा जिथे आपण आपल्या विचारांना कोणत्याही भाषेतील लेख आणि चित्रांच्या माध्यमाने इंटरनेटवर प्रकाशित करू शकतो. ब्लॉग वर कोणत्याही प्रकारचा लेख लिहिला जाऊ शकतो. ब्लॉग वर तुम्ही वैयक्तिक जीवनातील प्रसंग, वाचकांसाठी उपयुक्त माहिती तसेच लोकांना ज्या गोष्टी वाचण्यात आवड असेल त्या सर्व गोष्टी तुम्ही लिहू शकतात. ब्लॉग हा एका डिजिटल मासिक प्रमाणे असतो.


आजकाल शिक्षक, लेखक व आपआपल्या क्षेत्रात तज्ञ असलेले वेगवेगळे लोक ब्लॉग च्या माध्यमाने माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहेत. व blogging च्या या कामाने त्यांना दरमहा वेगवेगळ्या पद्धतींने चांगली कमाई होत असते. 


ब्लॉग कोण बनवू शकतो?

आजकाल इंटरनेटवर blogging करण्याची धूम आहे. आज प्रत्येक व्यक्ती blogger बनण्याचे स्वप्न पाहत आहे. Blogging च्या भाषेत जो व्यक्ती ब्लॉग लिहितो त्याला blogger म्हटले जाते. 


Blogger हे तुम्हा माझ्यासारखेच साधे लोक राहतात. जे घरबसल्या ब्लॉग पोस्ट लिहितात आणि blogging करतात. अट फक्त तेवढी आहे की एका blogger मध्ये मन लाऊन काम करण्याची क्षमता व इतर लोकांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याची इच्छा असावी. Blogging करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उच्च शिक्षण लागत नाही. बस तुमच्या जवळ एक लॅपटॉप किंवा स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असायला हवे. 


ब्लाँगिंग चे प्रकार

ब्लॉग लिहिणारे blogger त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भागांमध्ये वाटले जातात. आम्ही येथे 3 प्रमुख ब्लॉगर चे प्रकार देत आहोत.


1) पर्सनल ब्लाँगिंग (personal blog meaning in marathi)

पर्सनल ब्लॉग (personal blog) लिहिणाऱ्याला hobby blogger देखील म्हटले जाते. या प्रकारचे ब्लॉग जास्त करून प्रसिद्ध सेलिब्रिटी द्वारे लिहिले जाते. या ब्लॉगच्या मदतीने ते आपल्या चाहत्यांना आपल्याबद्दल अधिकाधिक माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतात. पर्सनल ब्लॉग द्वारे कोणत्याही प्रकारचे पैसे कमावले जात नाहीत.


2) प्रोफेशनल ब्लाँगिंग (professional blog meaning in marathi)

प्रोफेशनल ब्लॉगर ते असतात जे ब्लॉगिंग मुखतः पैसे कमवण्यासाठी करतात. हे लोक वाचकांद्वारे इंटरनेटवर शोधली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची माहिती लिहितात. अश्या पद्धतीची माहिती लिहिल्याने, माहितीला शोधात त्यांच्या ब्लॉग वर जास्तीत जास्त लोक येतात. व आपल्या ब्लॉग वर ads दाखवून ते ब्लॉगर्स पैसे कमवतात. 


3) Niche & Micro Niche Based ब्लॉगिंग

या प्रकारचे ब्लॉग कोणत्यातरी एका विशिष्ट विषयाला आधारून बनवलेले असतात. या प्रकारच्या ब्लॉग 

मधून जास्त प्रमाणत पैसे कमावणे शक्य असते. परंतु असा ब्लॉग बनवण्यासाठी विशिष्ट विषयात तुम्ही तज्ञ असायला हवेत. 


ब्लॉग कसा तयार करावा - How to create Blog in Marathi

नवीन ब्लॉग हा सुरुवातीला काही पैसे गुंतवून तसेच कोणताही पैसा न गुंतवता देखील बनवता येतो. जर तुम्ही पहिल्यांदाच ब्लॉग बनवत असाल व तुमच्याकडे सुरुवातील पैसे नसतील तर तुम्ही पैसे न गुंतविता मोफत Blogger.com वर ब्लॉग बनवू शकतात.  

Steps to Create Blog in Marathi 


how to create blog in marathi

1) सर्वात आधी आपल्या chrome ब्राउझर मध्ये blogger.com उघडा.

2) यानंतर create Your Blog निवडा व आपले Gmail अकाउंट लॉंग इन करा. 


3) या नंतर आपल्या ब्लॉगला एक टायटल नाव द्या.

4) आता तुम्हाला blog साठी URL लिहायची आहे. URL टाकताना लक्षात असू द्या की तुमची ही URL या आधी कोणीही वापरात घेतलेली नको.


5) आता तुमचा ब्लॉग तयार झाला आहे येथे New Post वर क्लिक करून तुम्ही नवीन पोस्ट लिहायला सुरुवात करू शकतात.


ब्लॉग कसा तयार करावा विडियो 



तर मित्रांनो ही होती ब्लॉग म्हणजे काय, ब्लॉग कसा तयार करावा व ब्लॉग बद्दल काही महत्वाची माहिती. मला आशा आहे की ब्लॉग कसा तयार करावा आणि ब्लॉग काय आहे - Blog meaning in marathi  या संबंधी तुमच्या सर्व शंका दूर झाल्या असतील. 

जर तुमच्या मनात Blogging विषयी अजूनही काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये विचारू शकतात. आणि याशिवाय ब्लॉगिंग शिकण्यासाठी Blogging Ninja या आमच्या हिन्दी यूट्यूब चॅनल ला देखील आपण subscribe करा.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

9 टिप्पण्या

  1. मस्त आहे माहिती.. मला आधी कळतच नव्हत काय आहे blogging ते... thank you for your help ☺️.....

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने