प्राणायामचे विविध आणि करण्याची विधी। Pranayam in marathi
आपल्या भारतीय समाजात योग प्राणायाम व ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. प्राणायाम हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे प्राण आणि आयम या मध्ये प्राण चा अर्थ जीवन शक्ती व आयाम म्हणजे विस्तार होय. म्हणजेच जीवन शक्तीचा विस्तार. प्राणायामाचे अनेक प्रकार व लाभ आहेत. आज आपण प्राणायामाचे फायदे, प्राणायामाचे प्रकार व प्राणायाम कसे करावे याबद्दल माहिती मिळवणार आहोत.
प्राणायाम केल्याने होणारे फायदे | Benefits of exercise in Marathi
- शरीरासाठी व्यायाम, प्राणायाम खूप आवश्यक आहे व्यायाम करण्याचे आश्चर्यजनक फायदे देखील आहेत.
- नियमित व्यायाम केल्याने हृदय रोगाचा धोका कमी होते.
- रक्तदाब मध्ये सुधार.
- शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधार.
- व्यायाम केल्याने मास पेशींची क्षमता वाढते ज्यामुळे पाठ दुखणे या सारख्या समस्या पासून मुक्ती मिळते.
- नियमित योग प्राणायाम केल्याने दीर्घ आयुष्य प्राप्त करणे शक्य होते.
- व्यायाम केल्याने आंतरिक शांती प्राप्त होते, चिंताना दूर करून आत्मविश्वास वाढविण्यात मदत मिळते.
- व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते व अति वजनामुळे होणाऱ्या समस्या तथा रोग दूर होतात.
प्राणायाम प्रकार मराठी | Types of pranayama in Marathi
भारतीय योगमध्ये प्राणायमचे अनेक प्रकार सांगितले आहेत, त्यातील काही प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत.
- नाड़ीशोधन
- भ्रस्त्रिका
- उज्जाई
- भ्रामरी
- कपालभाती
- केवली
- कुंभक
- दीर्घ
- शीतकारी
- शीतली
- मूर्छा
- सूर्यभेदन
- चंद्रभेदन
- प्रणव
- अग्निसार
- उद्गीथ
- नासाग्र
- प्लावनी
- शितायु
1) नाड़ीशोधन प्राणायाम कसे करावे (अनुलोम विलोम कसे करावे)
शास्त्रामध्ये नाड़ीशोधन प्राणायामला अनुलोम विलोम पण म्हटले गेले आहे. शरीरासाठी हे प्राणायाम खूप लाभदायक आहे. याला करण्यासाठी सर्वात आधी आपल्या उजव्या नाकाला हाताने बंद करा, या नंतर डाव्या नाकाने श्वास आत भरा. श्वास थोडा वेळ आत रोखून उजव्या नाकाने बाहेर सोडा. याच पद्धतीला उलट्या पद्धतीने करण्यासाठी उजव्या नाकाने श्वास घेऊन डाव्या नाकाद्वारे बाहेर सोडा. सुरुवातीला हे प्राणायाम 5 ते 10 वेळा करा या नंतर तुम्ही वेळ वाढवू शकतात.
अनुलोम विलोम चे फायदे
ह्या प्राणायाम ला केल्याने शारीरिक लाभ तर होतातच पण या सोबतच ताण तनाव आणि चिंता पासून मुक्ती मिळते.
2) भ्रस्त्रिका प्राणायाम कसे करावे
या प्राणायमामध्ये जोरात श्वास घेतला जातो या नंतर श्वास रोखून परत सोडला जातो. तसे पाहता हे प्राणायाम शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे पण हृदय रोग व रक्तदाब कहा धोका असणाऱ्यानी याला करणे टाळावे.
भ्रस्त्रिका प्राणायाम करण्याचे फायदे
ह्या प्राणायाम ला केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. अस्थमा, गळ्याची सुजन कमी करण्यात सहायक आहे. कुंडलिनी शक्ति जागरण व श्वास संबंधी विकार दूर करण्यासाठी उपयुक्त प्राणायाम आहे.
3) उज्जाई प्राणायाम कसे करावे
या प्राणायाम ला करण्याची पद्धत सोपी पण अति उपयुक्त आहे. या साठी सर्वात आधी नाकाद्वारे दीर्घ श्वास आत घ्या. या नंतर तोंड उघडून तोंडावाटून 'हा' अशी ध्वनि काढत हळू हळू श्वास सोडा. सुरुवातीला 5-10 मिनिट अभ्यास कर नंतर तुम्ही वेळ वाढवू शकता.
उज्जाई प्राणायाम करण्याचे फायदे
या प्रणायमामुळे शरीर स्वस्थ, चमकदार आणि मजबूत बनते. सर्दी खोकला दूर होतो.
4) भ्रामरी प्राणायाम कसे करावे
भ्रामरी शब्दाचा अर्थ होतो भुंगयाप्रमाणे आवाज काढणे. हे प्राणायाम करण्यासाठी सर्वात आधी आपल्या दोघी कानात दोन बोटे लाऊन बंद करा. या नंतर नाकाने श्वास आत घ्या व नाकानेच भुंगयाप्रमाणे भूsss भूsss आवाज करीत बाहेर सोडा. या शिवाय श्वास सोडताना ओम चे उच्चारण पण केले जाऊ शकते. या प्राणायामला 5 ते 10 मिनिट करा.
भ्रामरी प्राणायाम करण्याचे फायदे
हे प्राणायाम मेंदूला शांत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. तान तनाव कमी करून एकाग्रता वाढवण्यात उपयुक्त आहे. शालेय विद्यार्थ्यानी हे प्राणायाम दररोज करायला हवे.
5) कपालभाती प्राणायाम कसे करावे (kapalbhati pranayam in marathi)
'कपाल' चा अर्थ होतो कपाळ आणि 'भाती' म्हणजे चमकणे. हे प्राणायाम करण्यासाठी दीर्घ श्वास पोटात भरून पोट बाहेर लोटा या नंतर श्वास बाहेर सोडत पोट आत घ्या. प्रणायमाची ही क्रिया 10 वेळा लागोपाठ करा.
कपालभाती प्राणायाम करण्याचे फायदे
शरीरातील वात, पित्त आणि कफ कमी करून संतुलन वाढवते. श्वासासंबंधी रोग दूर होतात. रक्त शुद्धी होते.
6) केवली प्राणायाम कसे करावे
केवली प्राणायाम मध्ये श्वासला इच्छा नुसार रोखून ठेवले जाते. याला करण्याकरीता दोघी नाकातून श्वास आत घ्यावा, आता आपल्या क्षमतेनुसार श्वास शरीरात थांबून ठेवावा व काही वेळानंतर हळू हळू श्वास बाहेर सोडावा.
केवली प्राणायाम करण्याचे फायदे
पचन शक्ति वाढून पोटा संबंधी रोग दूर होतात. स्मरणशक्तीचा विकास होतो, हे प्राणायाम केल्याने व्यक्तीला भूक लागते.
7) कुंभक प्राणायाम कसे करावे
कुंभक प्राणायाम करण्यासाठी सुखासन मध्ये बसावे. या नंतर हळू हळू श्वास आत घ्यावा. श्वास पूर्ण भरल्यानंतर मानेला हृदयावर टेकावे. शक्य होईल तेवढा वेळ श्वास रोखून या मुद्रेत थांबावे. या नंतर हळू हळू संपूर्ण श्वास बाहेर काढावा. सुरुवातील 15 वेळ याचा अभ्यास कर नंतर क्षमतेनुसार वाढवावा.
कुंभक प्राणायाम करण्याचे फायदे
या प्राणायामला करण्याचे जेवढे शारीरिक लाभ आहेत त्या पेक्षा आध्यात्मिक लाभ जास्त आहेत. हे प्राणायाम केल्याने प्राणशक्ती चा विकास होतो.
8) दीर्घ प्राणायाम कसे करावे
सर्वात आधी जमिनीवर पालथे झोपावे, या नंतर हाताना पोटावर व दोघी हातचे मध्य बोट नाभिवर ठेवावेत, श्वास बाहेर सोडून पोटाला ढिल्ले सोडावे. आत श्वास अंत घेत पोटाला पूर्ण भरा. या क्रियेला 5 मिनिट पर्यन्त करा.
दीर्घ प्राणायाम करण्याचे फायदे
हे प्राणायाम मानसिक शांती साठी उपयुक्त आहे. आयुष्य वाढवण्यासाठी लाभदायक आहे.
9) शीतकारी प्राणायाम कसे करावे
सुखासन मध्ये बसावे व वरचे व खालचे दांत एकमेकाना जोडावे. या नंतर जिभेला वर टाळू ला लावावे आणि दातामधून श्वास आत ओढावा. श्वास आत घेताना सिस असा आवाज येईल. हळू हळू पूर्ण शरीरात श्वास भरा, या नंतर नाकामधून श्वास बाहेर सोडावा.
शीतकारी प्राणायाम करण्याचे फायदे
शीतकारी प्राणायाम गळ्याच्या आजाराला दूर करतो, शरीरात थंडावा निर्माण करते, तोंडातील छाले दूर करण्यासाठी उपयुक्त प्राणायाम आहे.
10) शीतली प्राणायाम कसे करावे
या प्राणायामला करण्यासाठी जमिनीवर बसून जिभेला गोलाकार नळी प्रमाणे बनवा, या नंतर जिभेने शक्य होईल तेवढा श्वास आत ओढा, श्वासला शक्य होईल तेवढा वेळ आत थांबून ठेवा. या नंतर हळू हळू नाकाद्वारे श्वास सोडा. ही क्रिया 10-15 वेळा करा.
शीतली प्राणायाम करण्याचे फायदे
हे प्राणायाम भूक व तहान वाढवते. मानसिक शांती निर्माण करते. रक्त शुद्धतेत उपयुक्त आहे. पचन शक्ति वाढवते. डोळे व त्वचेसाठी लाभदायक आहे. या प्रणायममुळे क्रोध कमी होऊन त्वचा चमकते.
11) मूर्छा प्राणायाम कसे करावे
शरीराला आराम देऊन सुखासन मध्ये बसा. आता डोके थोडे मागे घेऊन वरच्या बाजूला पहात नाकाद्वारे हळू हळू श्वास घ्या. गुडघ्याना दोघी हातानी दाबा शक्य होईल तेवढा वेळ श्वास आत ठेवावा, या नंतर हळू हळू श्वास सोडा.
मूर्छा प्राणायाम करण्याचे फायदे
अस्थमा व गळ्याचे रोग चांगले करण्यात उपयुक्त आहे. मन स्थिर होऊन इच्छाशक्ती वाढते. शरीर,मन आणि आत्मा मध्ये संतुलन येते.
12) सूर्यभेदन प्राणायाम कसे करावे
सुखासनात बसावे. आता डाव्या नाकाला बंद करून उजव्या नाकाने हळुवार श्वास आत भरावा. या नंतर श्वास आत ठेवून दाढीला हृदयावर दाबावे. काही वेळ या स्थितीत थांबल्यानंतर उजवे नाक बंद करून डाव्या बाजूने श्वास सोडावा. या क्रियेला 5- 10 वेळा करा. सूर्य नाडी साठी उपयुक्त प्राणायाम आहे.
सूर्यभेदन प्राणायाम करण्याचे फायदे
शास्त्रामध्ये सांगितले आहे की या प्राणायाम ला केल्याने मृत्यू ला रोखून ठेवणे संभव होते. कुंडलिनी शक्ति जागृती साठी उपयुक्त प्राणायाम आहे. या शिवाय डोकेदुखी, वात, पोटातील किडे नष्ट करणे, श्वासा संबधी रोग इत्यादि मध्ये उपयुक्त आहे.
13) चंद्रभेदन प्राणायाम कसे करावे
हे प्राणायाम करण्यासाठी सूर्य भेदन प्राणायाम प्रमाणेच सुखसानात बसावे. या नंतर उजव्या नाकाला बंद करून डाव्याने श्वास अंत भरावा. या नंतर श्वास आत ठेवून दाढीला हृदयावर दाबावे. काही वेळ या स्थितीत थांबल्यानंतर डावे नाक बंद करून उजव्या बाजूने श्वास सोडावा. या क्रियेला 5- 10 वेळा करा. चंद्र नाडी साठी उपयुक्त प्राणायाम आहे.
चंद्रभेदन प्राणायाम करण्याचे फायदे
डोळ्यासंबंधी समस्या दूर होतात. ज्या लोकाना कमी दिसण्याची समस्या असेल त्यांनी हे प्राणायाम करायला हवे. त्वचे संबंधी समस्या मध्ये पण उपयुक्त प्राणायाम आहे.
14 ) प्रणव प्राणायाम कसे करावे
ध्यानाच्या मुद्रेत डोळे बंद करून बसावे. या नंतर अतिशय हळुवारपणे श्वास आत घ्या व आपले संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित असू द्या. या स्थितीला ध्यानाची स्थिति पण म्हटले जाते. या प्राणायामला 15-20 मिनिटे करावे.
प्रणव प्राणायाम करण्याचे फायदे-
हे प्राणायाम केल्याने मानसिक शांती मिळते. मनाची चंचलता कमी होते. ध्यानाच्या स्थितीमुळे आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते.
15) अग्निसार प्राणायाम कसे करावे
हे प्राणायाम उभे राहून केले जाते. या साठी उभे राहून दोन्ही पायामध्ये अर्ध्या फुटाचे अंतर ठेवावे. आत शरीराच्या वरच्या भागाला 60 अंश पर्यन्त वाकवा. दीर्घ लांब श्वास भरून पोटाला पुढे मागे करा. सुरुवातीला 10-15 वेळा हे प्राणायाम करावे.
अग्निसार प्राणायाम करण्याचे फायदे-
ह्या आसनाने पचनशक्ती वाढते, पोटाची चरबी कमी होते, गर्भवती स्त्रीयासाठी हे प्राणायाम उपयुक्त आहे. अॅसिडिटी, पचन, डायबीटीज या समस्या दूर होतात।
16) उद्गीथ प्राणायाम कसे करावे
पूर्व दिशेला तोंड करून ध्यान मुद्रेत बसावे. डोळे बंद करून श्वास अंत घ्यावा व ओम उच्चारण करत श्वास बाहेर सोडवा. या क्रियेला 5-11 वेळा करावे.
उद्गीथ प्राणायाम करण्याचे फायदे
अनिद्रा, ताण तनाव, चिंता या सारख्या रोगापासून मुक्ती मिळते. एकाग्रता वाढवण्यात उपयुक्त प्राणायाम आहे. डोळे व चेहऱ्याची चमक वाढवते.
17) नासाग्र प्राणायाम कसे करावे
ध्यानच्या मुद्रेत खाली बसा आणि उजव्या हातचे तर्जनी व मधल्या बोटाला कपाडाच्या मध्यभागी ठेवा. अंगठा नाकाच्या उजव्या बाजूला तर अनामिका बोट डाव्या बाजूला ठेवा. या पद्धतीत नाकाच्या एका बाजूने श्वास आत भरा तर दुसऱ्या बाजूने सोडा. या प्राणायामला करताना लक्ष श्वासावर ठेवावे.
नासाग्र प्राणायाम करण्याचे फायदे
ह्या प्राणायामला केल्याने शरीरात पर्याप्त प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होतो. रोग प्रतिकार शक्ति वाढते. इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी संतुलनात येते.
18) प्लावनी प्राणायाम कसे करावे
प्लावनी प्राणायाम करण्यासाठी सुखासनात बसावे दोघी नाकफुडी मधून हळुवार श्वास आत घ्या. आता श्वासाला क्षमतेनुसार आत रोखून ठेवा. या नंतर दोघी नाकामधून हळुवार श्वास बाहेर सोडा. अश्यापद्धतीने 10-15 वेळा ही क्रिया करावी.
प्लावनी प्राणायाम करण्याचे फायदे
या प्रणायमाणे ध्यान चांगले लागते, मानसिक शांती सोबत पचनशक्ति पण वाढते. ताणतनाव, चिंता कमी करणे व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त प्राणायाम आहे.
तर मित्रहो हे होते काही प्राणायाम Pranayam in marathi. जर आपण नित्य हे प्राणायाम करण्याची सवय लावली तर निश्चितच आपल्या जीवनात परिवर्तन घडून येईल व आपले आरोग्य आधी पेक्षा चांगले होईल.