डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मराठी माहिती | dr apj abdul kalam mahiti
Apj Abdul Kalam Information in Marathi : अब्दुल कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांना राष्ट्रपतीचे हे पद विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आले. राष्ट्रपती बनल्यानंतर अब्दुल कलाम संपूर्ण देशवासीयांच्या नजरेत सन्मानित व्यक्ती होते. अब्दुल कलाम यांनी जवळपास चार दशकांपर्यंत शास्त्रज्ञाच्या रूपात कार्य केले. आज आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या बद्दल मराठी माहिती मिळवणार आहोत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन परिचय तुम्हाला वाचावयास मिळेल.
प्रारंभिक जीवन
डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 ला तमिळनाडूमधील रामेश्वरम मध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुल्लाब्दीन नाविक व मत्स्य व्यवसाय करत असत. त्यांच्या आईचे नाव असिम्मा होते. अब्दुल कलाम यांना तीन मोठे भाऊ आणि एक बहिण होती.
अब्दुल कलाम यांचे पूर्वज धनिक व्यापारी होते. परंतु 1920 च्या दशकात त्यांना व्यापारात भरपूर नुकसान झाले व जेव्हा अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. तेव्हा त्यांना अतिशय गरिबीत दिवस काढावे लागले. लहान असताना शिक्षणासाठी ते संघर्ष करू लागले, घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटू लागले व मिळालेले पैसे आपल्या शिक्षणासाठी लावू लागले. अब्दुल कलाम त्यांच्या वडिलांकडे इमानदारी, शिस्त व उदारता शिकले.
त्यांचे प्रारंभिक शिक्षण रामेश्वरम् मधील एलिमेंट स्कूलमध्ये झाले. 1950 मध्ये त्यांनी BSC ची परीक्षा St. Joseph's College मधून पूर्ण केली. यानंतर 1954 ते 57 मध्ये त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा केला. लहान असतांना त्याचे स्वप्न पायलट बनण्याचे होते, परंतु वेळे सोबत त्याचे स्वप्न बदलून गेले.
करीयर
1958 मध्ये अब्दुल कलाम यांनी D.T.D. and P. मधील तंत्रज्ञान केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्य करणे सुरू केले. त्यांनी DRDO चे लहान होवर्क्राफ्ट डिझाईन करून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवाती दिवसात त्यांनी भारतीय सेनेसाठी एक हेलिकॉप्टर तयार केले. 1969 मध्ये त्यांना इस्रो पाठवण्यात आले. तेथे त्यांनी प्रोजेक्ट डायरेक्ट च्या रूपात कार्य केले. त्यांनी पहिला उपग्रह प्रक्षेपण यान आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान बनविण्याच्या कार्यात महत्त्वाचे योगदान दिले.
1980 मध्ये भारत सरकारने एक आधुनिक मिसाइल प्रोग्राम अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात सुरू केला. अब्दुल कलाम यांच्या निर्देशानुसार अग्नि मिसाईल, पृथ्वी मिसाईल यासारख्या मिसाईल बनवणे शक्य झाले. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना भारताचे मिसाइल मॅन म्हणून संबोधले जाऊ लागले.
डॉक्टर अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती
10 जून 2002 ला एनडीए सरकारने राष्ट्रपतिपदासाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव सुचवले. राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना 922,884 मत मिळाले व लक्ष्मी सहगल यांना हरवून ते निवडणूक जिंकले.
डॉक्टर अब्दुल कलाम यांनी 15 जुलाई 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले. ते राष्ट्रपती भवनात राहणारे पहिले अविवाहित शास्त्रज्ञ होते. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे ते तिसरे राष्ट्रपती होते. त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. 2007 मध्ये परत निवडणूक न लढविण्याचा त्यांनी निश्चय केला व 27 जुलै 2007 ला राष्ट्रपती पदावरून राजीनामा दिला.
अब्दुल कलाम यांचा मृत्यू
27 जुलै 2015 ला अब्दुल कलाम एका कार्यक्रमासाठी शिलाँग गेले होते. या दरम्यान त्यांची तब्येत खराब झाली. तेथील एका कॉलेजमध्ये मुलांना ते लेक्चर देत होते व कार्यक्रमादरम्यान अचानक ते खाली पडले. ज्यानंतर त्यांना शिलाँग मधील दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. पण त्यांची स्थिती अतिशय नाजूक होती, त्यांना आयसीयूमध्ये ऍडमिट करण्यात आले. परंतु त्याचे स्वस्थ बिघडत गेले व शेवटी त्यांनी आपले शेवटचा श्वास सोडला, व 84 वर्षाच्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला.
मृत्यूनंतर त्यांना 28 जुलैला दिल्ली आणले गेले. दिल्लीमधील त्यांच्या घरी सर्व नेत्यांनी येऊन श्रद्धांजली दिली व 30 जुलै 2015 ला अब्दुल कलाम यांना त्यांच्या पैत्रक गावी आणून अंतिम संस्कार करण्यात आले.
अब्दुल कलाम यांचे स्वप्न
डॉक्टर कलाम यांना ही गोष्ट माहीत होती की कोणत्याही राष्ट्राच्या विकासात नागरिकांच्या शिक्षणाची भूमिका किती आहे. त्यांनी नेहमी देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी कार्य केले. त्यांच्याकडे देशाला पुढे नेण्यासाठी भविष्याचा एक स्पष्ट खाका तयार होता, त्यांनी आपले स्वप्न त्यांच्या पुस्तकात 'इंडिया 2020: अ विजन फॉर द न्यू मिलिनियम' मध्ये प्रस्तुत केले आहे. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की भारताला 2020 पर्यंत एक विकसित देश आणि नॉलेज सुपर पावर बनावे लागेल. त्यांचे मत होते की देशाच्या विकासात मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावायला हवी. नकारात्मक बातम्या काहीही देत नाही, लोकांना अधिकाधिक सकारात्मक व देशभक्ती निर्माण करणाऱ्या बातम्या दाखवायला हव्यात. डॉक्टर कलाम एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, प्रशासक, लेखक आणि शिक्षण तज्ञ होते. देशाच्या वर्तमान व येणाऱ्या पिढ्या त्याचे व्यक्तिमत्त्व व महान कार्यापासून कायम प्रेरणा घेत राहतील.
अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार
- 1981 भारत शासनाद्वारे पद्म भूषण पुरस्कार मिळाला.
- 1990 भारत शासनाद्वारे पद्म विभूषण पुरस्कार मिळाला.
- 1997 भारत शासनाद्वारे भारतरत्न पुरस्कार मिळाला.
- 1997 राष्ट्रीय एकतेसाठी इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला.
- 1998 वीर सावरकर पुरस्कार.
- 2000 मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर ने रामानुजम पुरस्कार दिला.
- 2007 ब्रिटिश रॉयल सोसायटी युके द्वारे किंग चार्ल्स द्वितीय पदकाचा सन्मान.
- 2007 वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ युके कडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
- 2008 नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर कडून डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी मिळाली.
- 2009 अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स द्वारे हूवर पदक मिळाले.
- 2009 अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कडून आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार.
- 2010 वॉटरलू विद्यापीठ कडून डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग ही पदवी मिळाली.
- 2011 न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व
महत्वाचे प्रश्न
अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव. (abdul kalam full name in marathi)
Ans: डॉक्टर अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम.
अब्दुल कलाम यांचे जन्मगाव (abdul kalam birth place in marathi)
Ans: धनुषकोंडी गाव रामेश्वरम् तामिळनाडू.
डॉक्टर अब्दुल कलाम यांची जन्मतारीख (abdul kalam birth Date in marathi)
Ans: 15 ऑक्टोंबर 1931
डॉक्टर अब्दुल कलाम यांचा मृत्यू कधी झाला? (abdul kalam death date in marathi)
Ans: 27 जुलै 2015
तर मित्रांनो ही होती एपीजे अब्दुल कलाम apj abdul kalam information in marathi. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा. आणि जर लेख लिहिताना काही चूक झाली असेल तर ते पण नक्की सांगा. मराठी निबंध आणि भाषणे मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट https://www.bhashanmarathi.com/