सचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती। Sachin Tendulkar Marathi Mahiti, information in Marathi

सचिन तेंडुलकर मराठी माहिती । Sachin Tendulkar Mahiti in Marathi

मित्रांनो आज आपण क्रिकेटचे देवता म्हटले जाणारे भारतीय क्रिकेट संघाचे भूतपूर्व कप्तान सचिन तेंडुलकर यांची माहिती (Sachin Tendulkar mahiti) मिळवणार आहोत. सचिन तेंडुलकर हे एक प्रसिद्ध फलंदाज आणि क्रिकेटमध्ये आजपर्यंत सर्वात जास्त रन बनवणारे खेळाडू आहेत. आपली जिद्द आणि कौशल्याने त्यांनी क्रिकेटच्या जगात आपले नाव अमर केले आहे. सचिन तेंडुलकर यांना भारतातील सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्नाने सन्मानित केले आहे. 

आजच्या या लेखात आपण सचिन तेंडुलकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (Sachin Tendulkar information in Marathi) जाणणार आहोत सचिन तेंडुलकर जीवन परिचय तुम्हाला या लेखाद्वारे वाचायला मिळेल. माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर.


sachin tendulkar in marathi, information about sachin marathi mahiti

सचिन तेंडुलकर प्रारंभिक जीवन | Sachin Tendulkar marathi mahiti

सचिन तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 साली मुंबईमधील एका मराठा ब्राह्मण परिवारात झाला. त्यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे होते. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी लेखक होते, त्यांची आई रजनी ही एका विमा कंपनीमध्ये कामाला होती. सचिन तेंडुलकर यांना दोन भाऊ व एक बहीण होते, चारही भावंडांमध्ये मध्ये सचिन तेंडुलकर हे सर्वात लहान होते.


शिक्षण-

सचिन हे अभ्यासात फार चांगले नव्हते ते मध्यम श्रेणी चे विद्यार्थी होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण बांद्रा मधील इंडियन एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. शाळेत असताना त्यांची क्रिकेट मध्ये खूप आवड होती. क्रिकेटमध्ये असलेली त्यांची ही आवड पाहून त्यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी  त्यांना दादरमधील शारदाश्रम विद्यालयात ऍडमिशन करवून दिले. रमाकांत आचरेकर हे दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मध्ये क्रिकेट चा अभ्यास शिकवत असतं. 


क्रिकेट ची सुरुवात-

आचरेकरांनी सचिनला सकाळी शाळेच्या आधी आणि संध्याकाळी शाळा सुटल्यावर क्रिकेटचा अभ्यास शिकवणे सुरू केले. सचिन हे रोज चार तास क्रिकेटच्या सराव करत असत. ज्यावेळी सचिन हे थकून जात असतं, तेव्हा त्यांचे गुरु त्यांना प्रलोभन दाखवत एक रुपयाचे नाणे स्टंप वर ठेवायचे आणि सांगायचे की जर सचिन त्यांच्याद्वारे आऊट नाही झाला तर तो एक रुपया त्याचा. अश्या पद्धतीने सराव करून सचिन तेंडुलकर यांनी 13 नाणी जिंकली, ज्यांना आज पण सचिन आपली अमूल्य संपत्ती मानतात. 


क्रिकेट करिअर-

  • 15 वर्षाच्या वयात सचिन ची निवड मुंबई क्रिकेट संघात करण्यात आली. 1988 मध्ये त्यांनी गुजरात विरुद्ध नाबाद शतक पूर्ण केले. 
  • वर्ष 1989 मध्ये सोळा वर्षाचे असताना सचिन यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून पाकिस्तान विरुद्ध कराची येथे पहिला सामना खेळला. पण या खेळात 15 रन काढून ते आऊट झाले. यांनी याच सीरिज मध्ये पेशावर मध्ये खेळात असताना सचिन याच्या नाकावर बॉल लागल्याने ते जखमी झाले. पण येवढे सर्व झाल्यावर देखील ते थांबले नाहीत आणि पूर्ण सामना खेळून 54 रन बनवले. 
  • 1990 मध्ये पहिल्यांदा त्यांनी इंग्लंड मध्ये नाबाद शतक काढले. या सामन्यानंतर सचिन यांची तुलना महान खेळाडूंमध्ये केली जाऊ लागली. 
  • 1991-1992 मधील ऑस्ट्रेलियातील खेळात त्यांनी 148 रन बनवले. 1994 मध्ये त्यांना भारतीय संघात ओपणर म्हणून निवडले. 
  • सचिन चा खेळ प्रत्येकाला मोहित करू लागला म्हणून 1996 मध्ये वर्ल्ड कॅप च्या दरम्यान त्यांना भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून निवडण्यात आले. 
  • यानंतर 1998 मध्ये त्यांनी आपले कॅप्टन पद सोडून दिले, 1999 मध्ये पुन्हा एकदा त्यांना कॅप्टन बनवण्यात आले. पण या टेस्ट मॅचेस मध्ये भारतीय संघाने 25 मधून फक्त 4 मॅच जिंकले. यामुळे त्यांनी कॅप्टन पद सोडून दिले व कधीच कॅप्टन न बनण्याचा निर्णय घेतला. 
  • सन 2001 साली वन डे मॅच मध्ये 10 हजार रन बनवणारे सचिन प्रथम खेळाडू बनून गेले. 2003 मधील Cricket World Cup मध्ये सचिन यांनी 673 रन बनवले व भारतीय संघाला फायनल मध्ये घेऊन गेले. पण ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची हार झाली. पण सचिन यांना मॅन ऑफ द टुर्नामेँट (Man of the tournament) हा सन्मान देण्यात आला.
  • यानंतर सचिन यांनी खूप साऱ्या मॅच खेळल्या. एक वेळ अशी आली जेव्हा त्यांच्यावर मॅच हरवण्याचे आरोप लागायला लागले. पण त्यांनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित ठेवले. 
  • 2007 मध्ये त्यांनी टेस्ट मॅच मध्ये 11000 रन बनवण्याच्या विश्व रेकॉर्ड बनवला. 
  • 2011 मधील वर्ल्डकप मध्ये त्यांनी आपली पूर्ण शक्ती लावून दिली. या सीरिज मध्ये त्यांनी एकूण 482 रन काढले. 2011 च्या वर्ल्डकप फायनल मध्ये त्यांनी भारताला जिंकून दिले. सचिन यांची ही पहिलीच वर्ल्डकप विजय होती. 

विवाह -

सचिन यांच्या पत्नीचे नाव 'अंजली तेंडुलकर' आहे. अंजली या एक शिशु रोग तज्ञ आणि प्रसिद्ध उद्योगपती अशोक मेहता यांच्या पुत्री आहेत. सचिन आणि अंजली यांची पहिली भेट मुंबई एअरपोर्टवर झाली होती. यानंतर त्यांची दुसरी भेट त्यांच्या एका मित्राकडे झाली, तेव्हापासून सचिन व अंजली मध्ये बोल चाल सुरू झाली.


सचिन व अंजली हे पाच वर्षांपर्यंत एकमेकांना ओळखत राहिले नंतर 24 मे 1995 त्यांनी लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर 12 ऑक्टोबर 1997 ला त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव सारा तेंडुलकर ठेवण्यात आले. दोन वर्षानंतर त्यांच्या घरात अजून एक मुलाचा जन्म झाला, मुलाचे नाव त्यांनी अर्जुन ठेवले.


क्रिकेटमधून संन्यास-

सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटच्या जगात आपले नाव कोरले. जेव्हा सचिन यांनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या चाहत्यांना खूप दुःख झाले. त्यांच्या या निर्णयाचा विरोध देखील केला गेला. परंतु 23 डिसेंबर 2012 मध्ये सचिन यांनी वन-डे क्रिकेटमधून संन्यास घेतला. 16 नोव्हेंबर 2013 मध्ये मुंबईमधील आपल्या शेवटच्या सामन्यात त्यांनी 74 रण बनवले. Sachin Tendulkar यांनी आपल्या संपूर्ण जीवनात 34 हजार रन बनवले त्यांनी 200 पेक्षा जास्त टेस्ट मॅच खेळल्या, त्यांच्या नावावर 51 शतक आणि 68 अर्धशतक आहेत.



सचिन तेंडुलकर पुरस्कार-

क्रिकेटमधील या महान कामगिरीबद्दल सचिन तेंडुलकर यांना अनेक पुरस्कार देण्यात आले.

  • 1994- अर्जुन पुरस्कार, क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट उपलब्धतेसाठी भारत सरकार द्वारा त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
  • 1997-1998- राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार, भारत सरकार द्वारे खेळामध्ये कामगिरी साठी दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे
  • 1999- पद्मश्री पुरस्कार, हा पुरस्कार भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे.
  • 2001- महाराष्ट्र भूषण पुरस्कार, हा पुरस्कार महाराष्ट्रातील नागरिकांचा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
  • 2008- पद्मविभूषण पुरस्कार, भारत सरकारद्वारे मिळणारा हा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • 2014- भारतरत्न, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने