विराट कोहली मराठी माहिती (virat kohli marathi mahiti)
क्रिकेट च्या जगातील महान खेळाडू विराट कोहली ला आज प्रत्येक जण ओळखतो. मित्रांनो आज आपण भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांच्या बद्दल माहिती (Virat Kohli marathi mahiti) मिळवणार आहोत. विराट कोहली हे प्रसिद्ध फलंदाज आहेत. आपल्या क्रिकेट कौशल्याने ते सर्वांचे मन मोहून घेतात. आज भारतासह जगभरात विराट कोहली यांचे करोडो चाहते आहेत.
आजच्या या लेखात आपण विराट कोहली मराठी माहिती (Virat Kohli information in marathi) मिळवणार आहोत. विराट कोहली जीवन परिचय तुम्हाला या लेखाद्वारे वाचायला मिळेल. माझा आवडता खेळाडू विराट कोहली निबंध मराठी.
जन्म व प्रारंभिक जीवन (Virat Kohli Marathi Mahiti)
विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 साली दिल्ली मधील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रेम कोहली हे एक वकील आहेत. त्यांची आई सरोज कोहली या गृहिणी आहेत. विराट कोहलीच्या कुटुंबात त्याच्यापेक्षा मोठे एक भाऊ आणि बहीण आहेत. विराट लहान असताना त्यांचे वडील त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत असत. ज्यावेळी ते तीन वर्षाचे होते तेव्हा त्यांना आपल्या सर्व खेळण्यामधून बॅट ही सर्वाधिक प्रिय होती. हळू हळू त्यांना क्रिकेट ची गोडी निर्माण झाली.
शिक्षण व क्रिकेट करियर-
- विराट कोहली यांचे प्राथमिक शिक्षण भारती पब्लिक स्कूल दिल्ली येथे झाले. क्रिकेट मधील त्यांची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी नऊ वर्षाच्या वयात त्यांना क्रिकेट क्लब मध्ये प्रवेश मिळवून दिला. ज्यामुळे लहान वयापासूनच ते क्रिकेट शिकू लागले. ज्या शाळेत त्यांचे प्रारंभिक शिक्षण सुरू होते तिथे फक्त शिकण्यावर भर दिला जायचा, खेळांचे प्रशिक्षण त्यांना मिळत नव्हते. तेव्हा त्यांच्या वडिलांनी नवव्या इयत्तेत त्यांना सेवियर कॉन्व्हेंट सीनियर सेकंडरी स्कूल, पश्चिम विहार दिल्ली येथे प्रवेश करून दिला. खेळांमध्ये आवड असल्याने त्यांनी फक्त बारावीपर्यंत शिक्षण प्राप्त केले व क्रिकेट मध्ये मेहनत करणे सुरू केले.
- दिल्लीच्या क्रिकेट क्लब मध्ये राजीव कुमार शर्मा यांनी विराट कोहली यांना क्रिकेट चा सराव करवणे सुरू केले.
- साल 2004 मध्ये त्यांना अंडर सेव्हन्टीन दिल्ली क्रिकेट टीम मध्ये सदस्य म्हणून निवडण्यात आले. विजय मर्चंट ट्रॉफी साठी त्यांनी चार मॅच खेळल्या यादरम्यान त्यांनी 450 पेक्षा जास्त रन बनवले.
- याच्या एक वर्षानंतर च्या सामन्यात ते अधिक प्रसिद्ध झाले त्यांनी सात मॅच मध्ये 757 रन काढले व या पद्धतीने सर्वाधिक रण बनवण्याचा रेकॉर्ड त्यांनी तयार केला.
- जुलै 2006 मध्ये विराट कोहली यांना भारताच्या अंडर नाईन्टीन क्रिकेट खेळाडू मध्ये सामील केले. त्यांच्या पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडमध्ये होता या इंग्लंड सामन्यात त्यांनी तीन एक दिवसीय सामन्यात 105 रन बनवले व भारताची त्या सामन्यात विजय झाली.
- क्रिकेटमध्ये त्यांचे प्रदर्शन पाहून त्यांना 2012 मध्ये आशियाई कप साठी व्हाईस कॅप्टन म्हणून निवडण्यात आले.
- 11व्या ओडीआय मध्ये त्यांनी पाकिस्तान सोबत खेळून 148 बॉल्स मध्ये 183 रन काढले. ज्यात 22 चौके एक छक्का सामील होते. हा एशिया कप मधील सर्वात मोठा रेकॉर्ड होता. म्हणून त्यांना मॅन ऑफ द मॅच चा किताब देण्यात आला.
- सन 2014 मध्ये भारतीय क्रिकेट टीम चे कप्तान महेंद्रसिंग धोनी यांना दुखापत झाल्याने विराट कोहलीला कॅप्टन म्हणून निवडण्यात आले. या टेस्ट मॅच मध्ये लगातार चार शतक बनवणारे विराट कोहली प्रथम भारतीय क्रिकेटर बनले. आणि तेव्हापासून तर आतापर्यंत विराट कोहली हे भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन आहेत.
विराट कोहली विवाह-
विराट कोहली यांच्या लग्नाआधी त्यांच्या आयुष्यात खूप साऱ्या मुली आल्यात व बऱ्याचदा त्यांना विराट कोहली शी जोडले जाऊ लागले.
पण विराट कोहली यांनी डिसेंबर 2017 मध्ये बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याशी विवाह केला. 2013 साली विराट आणि अनुष्का यांनी पहिल्यांदा एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीसाठी काम केले होते. ही त्यांची पहिलीच भेट होती. यानंतर दोघांची मैत्री वाढत गेली व शेवटी त्यांनी विवाह केला. वर्तमानात अनुष्का या गरोदर आहेत आणि विराट व अनुष्का लवकरच आईवडील बनणार आहेत.
तर मित्रानो हि होती विराट कोहली यांच्याबद्दल काही थोडीशी माहिती/ विराट कोहली जीवन परिचय तुम्हाला हि विराट कोहली मराठी माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा.