शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Shikshanache Mahatva Marathi Nibandh
शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. शिक्षण या यंत्राचा उपयोग करून आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो. शिक्षणाचा स्तर लोकांचा सामाजिक आणि कौटुंबिक आदर वाढतो व स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात मदत करतो. शिक्षणाचा कालावधी प्रत्येकासाठी सामाजिक आणि व्यक्तिगत रुपाने महत्त्वपूर्ण वेळ असतो. शिक्षण मोठ मोठ्या कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्यांना हरवण्याची क्षमता प्रदान करते. म्हणूनच आजच्या युगात कोणीही जीवनातील शिक्षणाचे महत्त्व दुर्लक्षित करू शकत नाही. शिक्षण मेंदूला सकारात्मकतेकडे वळवते व नकारात्मक विचारांना दूर करते.
कोणताही व्यक्ती हा शिक्षक व समाजातील वरिष्ठ मंडळी च्या मार्गदर्शनाने जीवनात शिक्षित होतो. आपल्याला शिक्षण देणारी सर्व मंडळी आपले शुभचिंतक आहेत व ते आपल्या जीवनाला यशाकडे घेऊन जाण्यात मदत करतात. आजकाल शिक्षणाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत. ग्रामीण क्षेत्रात लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले जात आहे. टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र इत्यादी प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरात दाखवून शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे.
आधीच्या काळात शिक्षण प्रणाली खूप महाग होती. गरीब लोक जास्तीत जास्त बारावीपर्यंत चे शिक्षण प्राप्त करू शकत होते. जातिव्यवस्थेमुळे हलक्या जातीच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, परंतु अनेक समाजसेवक व विचारवंतांनी समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले. या कार्यात शासनाने देखील मदत केली. गरीब, आदिवासी व दलित वर्गातील लोकांना आरक्षणाद्वारे शिक्षणात मदत मिळाली.
शिक्षण हे आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. आधुनिक शिक्षण प्रणाली आजच्या युगात शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोफत प्राथमिक शिक्षण सर्वांना दिले जात आहे. ज्यामुळे कमी पैसे असतानाही विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतो. याशिवाय गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शासनाकडून मासिक व वार्षिक स्कॉलरशिप देखील देण्यात येते.
शिक्षण व्यक्तीला जीवनात एक चांगला डॉक्टर, इंजिनिअर, पायलट, शिक्षक इत्यादी बनण्यात सहाय्य करते. म्हणून आजच्या युगात जे काही थोडे फार लोक शिक्षणापासून वंचित राहिले असतील त्यांना शिक्षित करायला हवे व शिक्षणाचे महत्व प्रत्येकाला समजावून द्यायला हवे.
--समाप्त--
2] शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Shikshanache Mahatva nibandh marathi
शिक्षण आपल्या बुद्धीला चमक प्रदान करते. आपल्या विचारांना उच्च करते आणि दुसऱ्यांच्या विषयी आपले चरित्र व व्यवहाराला मजबूत करते. शिक्षण आपल्याला विविध क्षेत्रांची माहिती प्रधान करते. विशेषतः आपल्याला आपली नोकरी व करिअरच्या क्षेत्रात तज्ञ बनवण्याचे कार्य शिक्षण करीत असते.
म्हणूनच शिक्षणाशिवाय आपण व्यवस्थित जीवन जगू शकत नाही. शिक्षण व्यक्तीला समाजात मानसन्मान व उच्च स्थिती प्रधान करते. शिक्षण समाजातील लोकांना इतरांविषयी नैतिकता आणि शिष्टाचार शिकवते. या शिवाय शिक्षित व्यक्ती समाजात रोल मॉडेल असतो. अश्या व्यक्तीकडून अनेक लोक मार्गदर्शन व सल्ला मिळवतात. अशा पद्धतीने शिक्षित व्यक्तीला समाजाची सेवा व उन्नती मध्ये योगदान करण्याची संधी मिळते.
वास्तविक ते मध्ये शिक्षित समाज समजदार व समृद्ध समाज असतो. आत्मविश्वास हा शिक्षणाने निर्माण होतो आत्मविश्वासी व्यक्तीला कोणत्याही कार्यात यश जलद मिळते. उचित शिक्षण(shikshan) मिळाल्याने व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये शिक्षण व ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता असते. शिक्षण यशस्वी आयुष्यासाठी अति महत्वाचे आहे.
आज आपल्या देशात शिक्षणाच्या खूप विकास झाला आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या शाळा व कॉलेज प्रत्येक गावात उपलब्ध आहेत. अभ्यासाशिवाय मुलांना मध्यान्न भोजन, मोफत पुस्तके, कपडे व स्कॉलरशिप दिली जाते. आदिवासी व दलित विद्यार्थ्यांना आरक्षणाची व्यवस्था केली आहे. म्हणून जर आज आपण शिक्षणाचे महत्त्व जाणले नाही तर येणाऱ्या काळात जगात खूप मागे राहून जाऊ. मुलगा असो वा मुलगी शिक्षणाला घरा घरात पोहचविण्यासाठी सरकार कार्यरत आहे. शिक्षण वाढेल तर प्रत्येक क्षेत्रात लोक प्रगती करतील आणि देशातील लोक प्रगती करतील तर देश सुद्धा प्रगती करेल.
--समाप्त--
तर मित्रहो हा होता शिक्षणाचे महत्व या विषयावरील मराठी निबंध. आशा आहे की हा निबंध वाचून तुम्हाला Shikshanache Mahatva कळले असेल. ह्या निबंधला आपल्या मित्रांसोबतही शेअर करा धन्यवाद..
thank you, very useful
उत्तर द्याहटवाKhup sundar
उत्तर द्याहटवा