व्यायामाचे महत्त्व मराठी निबंध | Vyayamache mahatva Marathi
आजच्या आधुनिक युगात नवनवीन शोधामुळे मनुष्याचे जीवन सुखकर झाले आहे. परंतु वाढत्या साधनामुळे मनुष्य आळशी झाला आहे, एकाच जागी तासनतास बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढत आहे, यावर उपाय म्हणून नियमित व्यायामची सवय लावायला हवी.
आजच्या या लेखात आपण व्यायामाचे जीवनातील महत्व या विषयावर मराठी निबंध मिळवणार आहोत. vyayamache mahatva in marathi या लेखात व्यायाम नियमित व्यायाम केल्याने शरीराला कोणकोणते लाभ होतात या विषयी ची माहिती देण्यात आलेली आहे.
Importance of Exercise in Marathi |
1) व्यायामाचे महत्त्व निबंध | vyayamache mahatva in marathi
मनुष्य तेव्हाच सुखी राहू शकतो जेव्हा त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असेल. स्वस्थ शरीरासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. एक निरोगी शरीर प्राप्त करण्यासाठी व्यायामाचे महत्त्व भरपूर आहे, नियमित व्यायाम केल्याने शारीरिक सुखासोबत मनुष्याला मानसिक संतुष्टी ची प्राप्ती होते. कारण व्यायाम केल्याने त्याचे मन प्रफुल्लित, उत्साहपूर्ण आणि आनंदी राहते. इंग्रजीत एक म्हण आहे 'हेल्थ इज वेल्थ'. या म्हणीचा अर्थ होतो की आरोग्य हीच संपत्ती आहे आणि हे आरोग्य व्यायाम केल्याने सुरळीत राहते.
व्यायामाने खूप सारे लाभ होतात. व्यायाम केल्याने मांसपेशी मजबूत होतात, शरीरातील रक्तस्त्राव सुरळीत होतो, व्यायाम केल्याने शरीरात प्रफुल्लता वाढते आणि नियमित व्यायाम करणारा व्यक्ती प्रसन्न राहतो. व्यायाम प्रत्येक दिवशी नियमित पद्धतीने करायला हवा. पश्चिमेकडील देशांमध्ये पुरुषांसोबत महिला देखील नियमित व्यायाम करतात. परंतु आपल्या भारतात खूप कमी ठिकाणी महिला घराबाहेर निघून व्यायाम करताना दिसतात. पुरुषासोबत महिलांनाही व्यायामाचे महत्व समजाऊन नियमित व्यायाम करण्यास प्रेरित केले पाहिजे.
आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खूप सारी नवीन नवीन साधने विकसित झाली आहे. या साधनांमुळे मनुष्याचे श्रमकार्य कमी झाले आहे. यामुळे मनुष्यामध्ये आळस वाढत आहे व तो व्यायामाकडे दुर्लक्ष करीत आहे. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये व्यायामाचे महत्त्व सांगितले आहे. धार्मिक ग्रंथांचे मानने आहे की जर धन गेले तर ते आपण पुन्हा मिळवू शकतो, मनुष्य हा धनाशिवाय जिवंत राहू शकतो. परंतु जर स्वस्थ बिघडले तर आपले संपूर्ण जीवनच निरर्थक होऊन जाते.
मनुष्याचे शरीर व मनाला शुद्ध करण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. व्यायामाचे सर्वात जास्त महत्व विद्यार्थी वर्गासाठी आहे. व्यायामाचे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत. म्हणून विद्यार्थीच नव्हे तर प्रत्येक वयाच्या लोकांनी नियमित व्यायाम करून आपले जीवन सुखी व निरोगी बनवायला हवे.
***
प्राणायामचे विविध प्रकार < वाचा येथे
2) व्यायामाचे महत्त्व निबंध | Vyayamache mahatva Marathi nibandh
आज-काल वाढत्या सुख सुविधा आणि तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन खूप आरामदायी होऊन गेले आहे, बऱ्याच कामांसाठी लोकांना पूर्वीसारखे शारीरिक श्रम करावे लागत नाही. यामुळे हळू हळू लोक आळशी होत आहेत आणि अशा लोकांचे शरीर थोडेसे काम केल्यावर देखील थकून जाते. अश्यात व्यायामाचे महत्व समजून व्यायाम करणे खूप आवश्यक झाले आहे.
व्यायाम केल्याने शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळते आणि शरीरात रक्त प्रवाह वाढतो. व्यायाम केल्याने शरीराची घाण घामाद्वारे काढून टाकण्यात मदत होते. व्यायामामुळे फुफुसामध्ये ऑक्सिजन वाढते. नियमित व्यायाम केल्याने शरीराचा विकास होतो. मोठं मोठे मसल्स बनतात. ज्यामुळे कोणतेही कार्य करण्याची क्षमता विकसित होते, व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला लवकर थकवा येत नाही. तो कोणतेही काम दीर्घ काळापर्यंत करू शकतो.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम केल्याने शरीरात असलेली जास्तीची चरबी काढून टाकण्यात मदत होतें. शरीरावर असलेली ही अत्याधिक चरबी शरीराला नुकसान पोहचवत असते. ज्यामुळे अनेक रोग निर्माण होण्याची देखील शक्यता असते. व्यायाम केल्याने ही चरबी कमी करून अनेक शारीरिक रोगापासून दूर राहिले जाऊ शकते.
असे मानले जाते की नियमित व्यायामाने लोक लवकर वृद्ध होत नाही आणि शरीरात तंदुरुस्ती राहते. जर शरीर स्वस्थ राहील तर मनही शांत राहते आणि बुद्धीचा विकास होतो. ज्यामुळे कार्यक्षमता वाढून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे शक्य होते. म्हणून प्रत्येककाने आपल्या व्यस्त जीवन शैलीतील काही वेळ काढून व्यायामास द्यायला हवा.
***
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय <<वाचा येथे
विडियो पहा:
तर मित्रहो या लेखात आपण व्यायामाचे महत्व मराठी निबंध व vyayamache mahatva in marathi प्राप्त केला. आशा करतो हा निबंध आपणास उपयोगी ठरला असेल. या निबंधाला आपले इतर मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..
फार छान
उत्तर द्याहटवाKhup chan
हटवा👌👌👌
उत्तर द्याहटवाMast mohit
उत्तर द्याहटवाVery nice useful
उत्तर द्याहटवा