माझा आवडता प्राणी हत्ती | Maza avadta prani Hatti Marathi Nibandh.
हत्तीवर मराठी निबंध (elephant essay in marathi)
आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी जाती पाहायला मिळतात. पण आजच्या काळात पृथ्वीवर जिवंत असलेल्या प्राण्यांमध्ये सर्वात मोठा व शक्तिशाली प्राणी हत्ती आहे. हत्ती हा जंगलात राहतो, परंतु त्याला प्राणिसंग्रालय तसेच योग्य प्रशिक्षण देऊन माणसांसोबत पण ठेवले जाते. हत्ती फार पूर्वीपासून मनुष्यासाठी उपयुक्त आहे. मी सुद्धा बऱ्याचदा हत्तीची स्वारी केली आहे. माझा आवडता प्राणी हत्ती आहे. हत्ती ची ताकत आणि शरीर रचना मला खूप आवडते.
जास्तकरून हत्तीचा रंग भुरा असतो. हत्तीचे चारही पाय खाब्याप्रमाने मजबूत असतात. इतर प्राण्याचे तुलनेत हत्तीला एक अवयव विशेष असतो आणि तो अवयव आहे त्याचे नाक. हत्तीला एक मोठी सोंड असते जीच्याने तो श्वास घेतो. या सोंडेच्या आजूबाजूला मोठे मोठे दोन दात असतात. हत्तीचे दोन कान मोठं मोठाल्या पंख्या प्रमाणे असतात. पण त्याचे डोळे शरीराच्या तुलनेत लहान असतात. मागे एक शेपटी पण असते.
हत्ती हा जास्तकरून जंगलात राहतो व तो पूर्णपणे शाकाहारी असतो. हत्ती लहान फांद्या, झाडाची पाने, भुसा आणि जंगली फळे खातात. पाळीव हत्ती हे पोळी, ऊस, केळे अश्या गोष्टी पण खातात. आज कल लोक जड सामान वाहने, सर्कस मध्ये काम करणे इत्यादी गोष्टी साठी हत्तीला वापरतात. प्राचीन काळात हत्ती राजा महाराजा द्वारे युद्धासाठी वापरले जायचे. हत्तीचे आयुष्य भरपूर असते. एक स्वस्थ आणि निरोगी हत्ती 100 वर्षांपर्यंत जगू शकतो. जिवंतपणी ज्याप्रमाणे हत्ती उपयोगी असतो, मृत्यू नंतर पण त्याचे अनेक उपयोग असतात. मेल्यानंतर हत्तीचे दात व शरीरावरील इतर अवयव वेग वेगळे औषधी आणि सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी उपयुक्त असतात.
आजच्या काळात भरपूर हत्तींना पाळीव प्राणी म्हणून वापरले जात आहे. परंतु जंगली हत्ती पकडणे फार कठीण कार्य आहे. हत्ती हा जरी शांत स्वभावाचा असला तरी त्याला त्रास दिल्यावर तो खूप खतरनाक होऊन जातो.
माझा आवडता प्राणी हत्ती (my favourite animal elephant essay in marathi)
हत्ती हा चपळ, आज्ञाकारी व पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी आहे. हत्ती हा प्राणी आफ्रिका आणि आशिया खंडात सापडतो. जास्त करून हत्तीचा रंग भुरा असतो. पण थायलंडमध्ये पांढऱ्या रंगाचे हत्ती देखील आढळतात. हत्ती हे जास्त करून समूहात राहतात. हत्ती हे 100 वर्षापेक्षा अधिक आयुष्य जगतात.
हत्ती हे जास्त करून जंगलात राहतात. पण त्यांना प्राणीसंग्रहालय आणि सर्कस मध्ये देखील ठेवले जाते. हत्तीची उंची 11 फूट पर्यंत असू शकते. त्याचे वजन दोन हजार पासून ते सहा हजार किलोपर्यंत असते. हत्तीचे कान खूप उंच असतात, ते 5 मैल पर्यंतचे आवज ऐकू शकतात. त्याचे चारही पाय पण खूप मजबूत असतात. त्याला नाकाऐवजी श्वास घ्यायला एक लवचिक सोंड असते. हत्तीच्या या अश्या रूपा लहान मुलांना हत्ती खूप आवडतो.
पृथ्वीवर हत्तीचे दोन प्रकार आढळतात. आफ्रिकी व एशियन. आफ्रिकन हत्तीचा आकार एशियन हत्ती पेक्षा मोठा असतो. हत्ती हे शाकाहारी असल्या कारणाने, ते अन्नाच्या आवश्यकते साठी जंगल व झाड झुडपा वर अवलंबून असतात.
वाढती लोकसंख्या व जंगल तोड मुळे हत्तींना अन्न व राहण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. यामुळे बऱ्याचदा हत्ती जंगला जवळील गावामध्ये घुसून येतात. हत्ती हा शांत आणि बुद्धिमान प्राणी आहे व यासोबतच मनुष्या साठी पण तो खूप उपयुक्त आहे. पण आजकाल हत्तीचे महागडे दात व शरीरावरील इतर महत्वाचे अवयव काढण्यासाठी अवैधपणे हत्तीची हत्या केली जात आहे, असे करणे योग्य नाही सरकार ने या घटना रोखण्यासाठी कठीण कायदे पण केले आहे. पण सर्व नागरिकांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी जंगली पशुचे रक्षण करायला हवे व जर कोणी पशुहत्या करीत असेल तर त्याला रोखायला हवे.
Watch video: