सिंह प्राण्याबद्दल मराठी माहिती । Information about lion in Marathi

सिंहाची माहिती मराठी मध्ये (Lion Information In Marathi)

मित्रानो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण जंगलाचा राजा सिंह बद्दल मराठी माहिती मिळवणार आहोत. सिंहाला इंग्रजीत Lion म्हटले जाते. सिंह दिसण्यात खूपच हिंसक आणि भयानक असतो. सिंहाच्या एका डरकाळीने पूर्ण जंगल घाबरायला लागते. सिंह हे सस्तन प्राणी असतात. आज आपण या सिंहाबद्दल मराठी माहिती मिळवणार आहोत या माहितीला तुम्ही सिंह मराठी निबंध म्हणून देखील वापरू शकतात.


सिंह बद्दल काही रोचक व सामान्य माहिती | Few lines on lion in Marathi.

  1. सिंहाचे वैज्ञानिक नाव Panthera Leo आहे.
  2. सिंह हा मांसाहारी प्राणी आहे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते. 
  3. सिंह मुख्यतः आशिया आणि आफ्रिका मध्ये आढळतात.
  4. सिंहाच्या मानेवर केस असतात या केसांना आयाळ म्हटले जाते. 
  5. सिंह एका दिवसात 18 तासांपर्यंत झोपतात.
  6. सिंहाच्या तुलनेत सिंहीण जास्त शिकार करते, जवळ पास 80 शिकार सिंहीण द्वारे केले जातात.
  7. सिंहाची डरकाळी 6 ते 7 किलोमीटर दुरून देखील ऐकायला येते. 
  8. सिंहाला पोहता पण येते.
  9. सिहिणीच्या गर्भधारणेचा वेळ 110 दिवसाचा असतो व ती आपल्या जमलेल्या मुलाला 8 महिन्या पर्यंत दूध पाजते.
  10. सिंह 80 किलोमीटर प्रति तास च्या वेगाने धावू शकतो. 


सिंह प्राण्याबद्दल मराठी माहिती (Information about lion in Marathi)

सिंह हा जंगलातील असा प्राणी आहे ज्याला पाहून इतर सर्व प्राणी घाबरतात. या मुळेच सिंहाला जंगलाचा राजा देखील म्हटले जाते. सिंह हा अतिशय शक्तिशाली असतो, तो आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्यांची शिकार सहजतेने करतो. सिंह हरण व जंगली म्हशी सारख्या प्राण्यांची शिकार तर करतोच पण या सोबतच तो जिराफ व हत्ती सारख्या मोठ्या प्राण्यांना पण आपले शिकार बनवतो.


 सिंह मांसाहारी असतो, तो शाकाहारी प्राण्यांची शिकार करून त्यांना आपले भोजन बनवतो. सिंहाच्या शिकारी बद्दल विशेष गोष्ट अशी आहे की ते जास्त करून रात्रीच्या अंधारात शिकार करतात. रात्री शिकार करण्याचे त्याला अनेक फायदे होतात. सिंह हे रात्रीच्या अंधारात पण पाहू शकतात व अंधारात इतर प्राण्यांना सिंहाला पाहणे शक्य होत नाही, म्हणून सिंह त्याची शिकार सहजतेने करतो. जास्त करून शिकार सिंहिणी द्वारे केले जातात व सिंह हे इतर सिंहापासून आपल्या क्षेत्राचे रक्षण करतात. 


एका वयस्क सिंहाची उंची 3.5 फूट पर्यंत असते. त्याचे वजन 190 किलो पर्यंत असते. सिंहाच्या तोंडात 30 दात असतात या दाताच्या मदतीने तो आपल्या शिकराला घट्ट पकडून मारतो. सिंहाचा पळण्याचा वेग हा 40 ते 80 किलोमीटर प्रति तास असतो. सिंहाची डरकाळी ही 8 किलोमीटर दुरूनही ऐकू येते. सिहाचा सरासरी जीवन काळ 20 वर्षांपर्यंत असू शकतो. 


सिंह आपल्या जीवनातील अर्ध्या पेक्षा जास्त वेळ झोपण्यात घालवतात. सिंह दिवसात 20 तासापर्यंत झोपतो तर सिंहीण ही 18 तासापर्यंत झोपते. एक वयस्क सिंह एका दिवसात आठ ते नऊ किलो मांस खातो. सिहिणीची गर्भधारणा 110 दिवसाची असते आणि एका वेळी ती 6 मुलांना जन्म देऊ शकते. सिंहाच्या मुलाला बछडा म्हटले जाते. जन्माच्या वेळी एका बछड्याचे वजन 0.9 ते 1.8 किलोपर्यंत असते. नवीन जमलेल्या बछडा 8 महिन्यापर्यंत सिंहीणीचे दूध पितो.


जंगलाचा राजा असताना देखील सिंहाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या मागील सर्वात मोठे कारण म्हणजे जंगलाची तोड व शिकारीद्वारे सिंहाची शिकार आहे. परंतु आपल्या देशात आता सरकारच्या प्रयत्नामुळे सिंहाची संख्या वाढवण्यात मदत झाली आहे. 2010 मध्ये सिंहाची संख्या 411 होती तर 2015 मध्ये ही संख्या वाढून 523 होऊन गेली. भारतात सिंह व इतर जंगली प्राण्यांची संख्या वाढत आहे. सिंह हा पृथ्वीवरील सर्वात महत्त्वपूर्ण प्राण्यापैकी एक आहे. यांच्या रक्षणाची जवाबदारी आपण सर्वांनीच स्वीकारायला हवी.


माझा आवडता प्राणी सिह निबंध वाचा येथे...

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने