मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची करणारे महान नेता महात्मा गांधी यांचा निबंध मिळवणार आहोत. तुम्ही या निबंधाला माझा आवडता नेता महात्मा गांधी म्हणून देखील वापरू शकतात.
१) महात्मा गांधी पर मराठी निबंध (mahatma gandhi essay in marathi)
देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, सर्वांना सत्य आणि अहिंसेच्या मार्ग दाखवणारे गांधीजी अर्थात महात्मा गांधी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान दिले. गांधीजींच्या वचनांचा भारतीय समाजावर खोल प्रभाव आहे. त्यांनी आपल्या विचारसरणीने भारताला एकत्रित केले. समाजातील अनेक कुरितीना संपवले.
गांधीजी यांच्या जन्म 2 ऑक्टोंबर 1869 साली गुजरात मधील पोरबंदर या गावात झाला. इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्यासाठी गांधीजींनी अनेक आंदोलने केली. त्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला. असहयोग आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, दलित आंदोलन, भारत छोडो आंदोलन, चंपारण सत्याग्रह इत्यादी ब्रिटिश शासनाविरुद्ध ची आंदोलने करून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात योगदान दिले.
गांधीजी एक कुशल राजनितिक तर होतेच परंतु ते अतिशय चांगले लेखक देखील होते. आपल्या जीवनातील चढ-उतार त्यांनी लेखणीच्या सहाय्याने मांडले. महात्मा गांधी यांनी हरिजन, इंडियन ऑपिनियन, यंग इंडिया इ. वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केले. गांधीजींनी लिहिलेले प्रमुख पुस्तक हिंद स्वराज्य, दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह, माझ्या स्वप्नातील भारत, ग्रामस्वराज्य व माझे सत्याचे प्रयोग इत्यादी आहेत. गांधीजींची ही पुस्तके आज देखील समाजाला नागरिक घडवण्यासाठी मदत करीत आहे.
इंग्रजांना भारतातून काढण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी शेवटचे आंदोलन 'भारत छोडो' आंदोलनास सुरुवात केली. भारत छोडो स्वातंत्र्य आंदोलन त्या काळातील सर्वात मोठे जनांदोलन होते. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने स्वातंत्र्यसेनानी मारले गेले. इंग्रजांनी गांधीजी सोबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. या दरम्यान दुसरे महायुद्ध सुरू झाले. भारत छोडो आंदोलनामुळे भारतीय संघटित झाले. इंग्रजांना भारतावर राज्य करणे कठीण झाले व त्यांनी भारताला स्वातंत्र्य करण्याचे संकेत देऊन टाकले.
महात्मा गांधींच्या निर्णयाने असहमत असलेल्या नाथूराम गोडसे नावाच्या एका तरुणाने 30 जानेवारी1948 ला महात्मा गांधी यांची छातीत गोळ्या मारून हत्या केली. असे म्हटले जाते की गांधीजींचे शेवटचे शब्द 'हे राम' होते.
२) माझे आवडते नेता महात्मा गांधी (mahatma gandhi nibandh marathi)
माझे आवडते नेता महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातच्या पोरबंदर गावी झाला. भारताच्या स्वतंत्र लढ्यात गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने कार्य केले. त्यांनी इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्यासाठी आंदोलने करून भारतीयांना एकत्रित केले. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून देखील संबोधले जाते.
गांधीजी लहान वयापासूनच अतिशय शुद्ध, शांत व सात्विक वृत्तीचे होते. ते पूर्णपणे शाकाहारी होते. गांधीजींनी आपले उच्च शिक्षण लंडन येथून पूर्ण केले. येथेच त्यांनी बॅरिस्टर ची पदवी मिळवली. गांधीचे सार्वजनिक जीवन दक्षिण आफ्रिकेत सुरू झाले. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना गंभीर वंशवादाचा सामना करावा लागला. भारतीयावार होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकत्रित करून त्यांनी सत्याग्रह केला व भारतीयांना त्याचे हक्क मिळवून दिले.
गांधीजी जेव्हा आफ्रिकेतून भारतात आले, तेव्हा ते राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी चंपारण सत्याग्रह, खिलाफत आंदोलन, असहयोग आंदोलन, स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह, हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन असे एक न अनेक आंदोलने केली. गांधीजीच्या भारत छोडो आंदोलनात लाखो लोक सामील झाले व इंग्रजांद्वारे हजारो स्वतंत्र सेनानी मारले देखील गेले. महात्मा गांधी सोबत लढलेल्या या सर्व स्वतंत्र सैनिकांमुळे भारत शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.
महात्मा गांधीचे जीवन अतिशय साधे होते. येवढे साधे जीवन असताना देखील त्याचे विचार अतीउच्च होते. त्यांनी भारतीयांना अहिंसेचा धडा शिकवला. महात्मा गांधी एक समाज सुधारक होते त्यांनी अनेक कूरितीना बंद केले. इत्यादी अनेक कारणांमुळे महात्मा गांधींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. Read more...
nice
उत्तर द्याहटवाnice
उत्तर द्याहटवा