ससा निबंध मराठी | Sasa marathi nibandh
1) ससा निबंध मराठी | Sasa marathi nibandh
जगभरातील लोकांद्वारे वेगवेगळे पाळीव प्राणी पाळले जातात. माझा आवडता प्राणी ससा आहे, आम्ही आमच्या फार्म मध्ये ससे पाळले आहेत. ससा हा खूपच सुंदर दिसतो, त्याचा स्वभाव चंचल असतो व तो दिवसभर इकडून तिकडे उड्या मारीत असतो. लहान मुलांना तर ससे खूपच आवडतात. जगभरात सशांच्या जवळपास 305 प्रजाती आढळतात. अंटार्टिका ला सोडून हा प्राणी प्रत्येक खंडात आढळतो. दक्षिण अमेरिकेमध्ये सशाच्या सर्वात जास्त प्रजाती आहेत.
सशाचे स्नायू खूपच लवचिक असतात, यामुळे तो लांब उड्या मारू शकतो. सशाच्या पायातील नखे खूपच मजबूत व धारदार असतात. या नखांच्या मदतीने तो जमिनीत बिळ करतो. साश्याचा आकार मांजरी सारखा लहान असतो. याचे पूर्ण शरीर लहान केसांनी झाकलेले असते. या केसामुळे थंडीच्या ऋतूत त्याचे रक्षण होते. ससे हे भुरे, काळे आणि पांढऱ्या रंगाचे असतात. सशाचे कान व नाक खूप तेज असतात. सशाला एक लहान शेट्टी पण असते. सशाच्या तोंडात 28 दात असतात, या दाताच्या मदतीने ते आपल्या भोजनाला कुरतडून खातात.
ससे हे जास्त करून इतर सश्यासोबत राहणे पसंद करतात. सशांच्या जास्त करून प्रजाती जंगलात आढळतात. ससे हे जमिनीच्या खाली खड्डे करून राहणे पसंद करतात. ससा शाकाहारी प्राणी आहे. तो जास्त करून हिरवे गवत, फळे, गाजर, मुळा खाणे पसंद करतो. सशांच्या जीवन काल आठ ते दहा वर्षांचा असतो.
ससा हा अतिशय गोंडस प्राणी आहे. बरेच मांसाहारी लोक सशांना मारून खातात. असे करणे योग्य नाही खाण्यासाठी दुसरे चांगले चांगले पदार्थ पण आहेत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ससे व अन्य पाळीव प्राण्यांचे रक्षण आपण करायला हवे. मला ससा हा खूप आवडतो व माझा आवडता प्राणी ससा आहे.
***
2) माझा आवडता प्राणी ससा निबंध मराठी | maza avadta prani sasa
ससा हा अतिशय शांत व चंचल स्वभावाचा प्राणी आहे. सशाचे कान लांब असतात. सशांची डोळे गोल गोल असतात. ससे अतिशय चंचल असतात यामुळे ते दिवसभर इकडून तिकडे उड्या मारत असतात. ससे भारतासह जगभरात पाळले जातात. जगभरात सशांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती जंगलात राहतात तर काही प्रजातीचे ससे पाळले जातात. सशाचे वजन 2 किलो पर्यंत असते. त्यांची उंची 20 इंच पर्यंत असते.
ससे जास्त करून घासफुस खाणे पसंद करतात. गाजर त्यांचे आवडते फळ आहे. ससे जास्त करून बिळात राहतात. कारण जमिनीवर कुत्रा मांजरी सारखे शिकारी त्यांची शिकार करू शकतात. सशांचे कान खूपच तेज असतात, थोड्याशा आवाजाने देखील ते घाबरून सावध होतात. ससे वेगवेगळ्या रंगात जसे काळा, पांढरा, भूरा इ. आढळतात. ससे स्वतःला ओले होण्यापासून वाचवतात कारण त्यांच्या शरीरावर मऊ मुलायम केस असतात. हे केस त्यांना थंडीपासून वाचवतात.
आपल्या देशात सशांच्या अनेक गोष्टी प्रचलित आहे. ससा व कासवाची शर्यत ही गोष्ट देखील खूप प्रसिद्ध आहे. ससा खड्डे करण्यात खूप कुशल असतो. त्याचे नखे धारदार आणि तेज असतात. पण या नखांनी तो कधीही कोणावर हल्ला करीत नाही. ससा खूपच शांतीप्रिय असतो.
***
- अधिक वाचा:
Nice
उत्तर द्याहटवा