महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि माहिती | Mahatma Jyotiba Phule information in Marathi
नमस्कार मित्रानो महान समाज सुधारक आणि विचारवंत ज्योतिराव फुले यांनी शिक्षित होऊन समाजाच्या कुरीतीना संपवले आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे पण उघडून दिलीत. त्यांनी जातपात विरुद्ध सुद्धा आपली आवाज बुलंद केली. ज्योतिबाच्या या कार्यात त्याच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा खूप सहकार्य केले.
आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती जाणणार आहोत. या माहितीला आपण ज्योतिबा फुले मराठी भाषण (Speech on jyotiba phule in marathi) म्हणून देखील वापरू शकतात.
महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती | Mahatma Jyotiba Phule information in Marathi
महान विचारक, समाजसेवी, लेखक, दार्शनिक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली साताऱ्यात झाला. त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या उत्थानासाठी महत्त्वाचे कार्य केले. त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते. ते एकोणिसाव्या शतकातील एक महान समाज सुधारक आणि विचारवंत होते.
प्रारंभिक जीवन
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा मध्ये झाला. एका वर्षाच्या वयातच त्यांच्या आईचे निधन झाले. ज्योतिबाचे पालन सगुणाबाई नावाच्या एका स्त्री ने केले. सगुणाबाई ने त्यांना आईचे प्रेम लावले. 7 वर्षाच्या वयात ज्योतिबांना गावातील एका शाळेत शिकायला पाठवले. पण जातिगत भेदभाव मुळे त्यांना शाळा सोडावी लागली. पण शाळा सोडल्यानंतर देखील त्यांच्यात शिक्षणाची ओढ जशीच्या तशी राहिली. म्हणून सगुणाबाईंनी ज्योतिबांना घरच्या घरी शिकवणे सुरू केले. याशिवाय ज्योतिबा आजूबाजूचा वृद्ध लोकांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकत असत. ज्योतीबांच्या सुक्ष्म आणि तर्कसंगत गोष्टींमुळे लोकांनाही ते खूप आवडत असत. 21 वर्षाच्या वयात ज्योतीबांनी सातवी इयत्तेचे शिक्षण पूर्ण केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य
1840 साली त्यांच्या विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले या देखील क्रांतिकारी विचारांच्या स्त्री होत्या. ज्योतीबांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईं सोबत मिळून समाज सुधारणेच्या कार्यात योगदान दिले. समाजातील स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी भारतातील पहिले विद्यालय सुरू केले. त्या काळात या विद्यालयात केवळ तीन मुलींनी प्रवेश घेतला. सावित्रीबाई या अशिक्षित होत्या, ज्योतीबांनी त्यांना आपल्या घरात शिक्षण देऊन शिक्षित केले. मुलींसाठी बनवलेल्या या विद्यालयात सावित्रीबाई शिक्षिका होत्या.
त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून समाजातील लोकांद्वारे ज्योतिबांना धमक्या मिळू लागल्या, या धमक्यांना घाबरून ज्योतीबांच्या वडिलांनी त्यांना व सावित्रीबाईंना घरातून काढून दिले. या मुळे काही काळासाठी त्यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य थांबले पण लवकरच त्यांनी आपल्या कार्याला पुनः सुरुवात करत 3 नवीन विद्यालय उघडले. ज्योतीबांच्या या कार्यामुळे समाजात नवीन बदल येऊ लागला. या नंतर बालविवाह, सती प्रथा, जातीवाद या सारख्या कुप्रथाच्या विरुद्ध आवाज उठू लागल्या. ज्योतीबांनी स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, जातीवाद, अस्पृश्यता, बालविवाह, सती प्रथा, पुनर्विवाह इत्यादी विषयांवर लोकांना जागृत करण्याच्या प्रयत्न केला.
24 सप्टेंबर 1873 रोजी दलित व निर्बल वर्गाना न्याय मिळवून देण्यासाठी जोतिबांनी 'सत्यशोधक समाज' या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या या समाज कार्यामुळे 1888 साली मुंबईमधील एका सभेत त्यांना महात्मा ही 'उपाधी' देण्यात आली.
महात्मा ज्योतिबा फुले मृत्यू
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कोणीही अपत्य नव्हते. यामुळे त्यांनी एका अनाथ मुलाला दत्तक घेतले. 1988 मधील जुलै महिन्यात त्यांना पक्षघात चा झटका आला. ज्यामुळे त्यांचे शरीर कमजोर व्हायला लागले. 27 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबा फुले यांनी आपला देह त्यागला. ज्योतिबा ही गोष्ट जाणून होते की जोपर्यंत जातपात बंधने नष्ट होणार नाही तोपर्यंत समाजाची उन्नती होणे कठीण आहे. म्हणून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या समाज कार्यासाठी खर्ची केले. अश्या या महान समाज सुधरकाला माझा प्रणाम.
तर मंडळी वरील लेखात आपल्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती शेअर करण्यात आलेली आहे. आम्ही आशा करतो की आपणास ही Mahatma Jyotiba Phule information in Marathi नक्कीच उपयोगाची ठरली असेल. हा लेख आपले मित्र मंडळी व इतरांसोबत शेअर करून त्यांनाही याविषयी चे ज्ञान प्राप्त होऊ द्या. धन्यवाद..!