मित्रांनो भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय इतिहासात मोलाचे स्थान प्राप्त आहे. बाबासाहेबांनी संविधानाची रचना करून देशात एक सशक्त शासन रचना निर्माण केली. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथि दरवर्षी 6 डिसेंबर ला साजरी केली जाते. या दिनाला "महापरिनिर्वाण दिन" म्हणून साजरे केले जाते.
या दिवशी शाळा कॉलेज मध्ये भाषणाचे आयोजन केले जात असते. जर आपल्या विद्यालयात देखील महापरिनिर्वाण दिन भाषण चे आयोजन करण्यात आलेले असेल तर हा लेख आपल्यासाठी फारच उपयोगाचा ठरणार आहे. या लेखात आम्ही आपल्यासोबत 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी मध्ये (Mahaparinirvan Din Speech in Marathi) घेऊन आलेलो आहोत. हे dr babasaheb ambedkar mahaparinirvan din hashan आपण नक्कीच उपयोगात घेऊ शकतात.
महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी - Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din Bhashan
1)
"सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…"
आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो…
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बालपणापासूनच खूप हुशार होते. त्यांना वाचनाची फार आवड होती. इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले. त्यांनी अतोनात प्रयन्न करून दलितांमध्ये जागृती घडवून आणली. महाड येथील चवदार तळे खुले करण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य केले. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. अशा या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. शेवटी मी एवढेच म्हणेन की,
"दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात ! होतात तुम्ही गरीबच, मात्र या जगाचा कोहिनूर होऊन गेलात.
जय भीम जय भारत
2)
आपण सर्वांना माझा नमस्कार. आज मी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताना विनम्र अभिवादन करतो. व त्यानंतर त्यांच्या बद्दल दोन शब्द आपणास सांगू इच्छितो. माझे हे भाषण तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती
महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमि येथे त्यांच्यावर बौध्द पध्दतीने अंतिम संस्कार करण्यात आले.
नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौध्द धर्माचा स्वीकार केला होता. त्यांना लोक 'बोधिसत्त्व' मानतात. त्यामुळेच त्यांच्या पुण्यतिथी ला बौद्ध संकल्पनेतील शब्द महापरिनिर्वाण हा वापरण्यात आलेला आहे. दरवर्षी मुंबईत असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात व चैत्यभूमी स्वरूपात ठेवलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अस्ती कलशास व प्रतिमेस अभिवादन करून त्याचे दर्शन घेतात. या दिवशी जगभरातील सर्व आंबेडकरवादी विचारधारेने प्रभावित असणारे लोक बाबासाहेबांची प्रतिमा व मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करीत असतात.
2017 पासून या दिवशी पंधरा मिनिटे मौन धारण करून व बुद्ध वंदना म्हणून महापरिनिर्वाण दिन केला जातो. अशा या महान व्यक्तीला मी नमन करून आजचे भाषण संपवतो आणि आशा करतो की त्यांचे महान गुण मी माझ्यात अवलंबवण्याचा प्रयत्न कायम करेल.
जय भीम जय भारत
3)
"आले किती गेले किती, उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या भीमाचा दरारा...!"
नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना, सर्वप्रथम आपणा सर्वांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले. परंतू न डगमगता ते प्रत्येक प्रसंगाला सामोर गेले. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी. मोलाचे कार्य केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित बनले, दलितांचे कैवारी म्हणून अनेक कार्य त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. ज्ञानाचा अथांग सागर बनून भारताचे संविधान समितीत स्थान मिळवले आणि संविधानाचा मसुदा तयार केला.
क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. जगभरात सर्वत्र हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतात. बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर जमतात. तेथील बाबासाहेबांच्या अस्थिना नमन करतात आणि दर्शन घेतात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते, अशा महान आत्म्यास माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद.
तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे भाषण मराठी मध्ये दिलेले आहेत. यात देण्यात आलेल्या 3 विविध Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Bhashan पैकी आपण आपल्या आवडीचे भाषण उपयोगात घेऊ शकतात. याशिवाय वर देण्यात आलेल्या Mahaparinirvan Din Speech in Marathi मधून प्रेरणा घेऊन आपण आपले स्वतः चे भाषण बनवू शकतात. धन्यवाद