मकर संक्रांत या सणाविषयी माहिती | Makar Sankranti information in Marathi

मकरसंक्रांत मराठी माहिती (makar sankranti marathi mahiti)

आपल्या देशात दरवर्षी खूप सारे सण उत्सव साजरे केले जातात. या सणामुळे लोकामध्ये एकतेची भावना वाढते, सण उत्सव साजरे केल्याने आनंद देखील वाढतो. पण येवढेच नाही तर आपल्या सर्व सणामागे खूप सारे ज्ञान, विज्ञान, निसर्ग, स्वस्थ आणि आयुर्वेद लपलेले आहे. दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. चला आज जाणुया मकरसंक्रांतीची माहिती.



मकर संक्रांत काय आहे. (sankranti information in marathi)

तुमच्या मनात देखील हा प्रश्न आला असेल की मकरसंक्रांत का साजरी केली जाते? तर आज तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देतो. हिंदू धर्मात सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला 'संक्रांती' असे म्हटले जाते. तसे पाहता वर्षभरात 12 संक्रांती येतात. दोन संक्रांतीच्या मधील कालावधीला 'सौर मास' म्हटले जाते. 12 संक्रांती मधून 4 संक्रांती महत्वाच्या असतात. ज्यात मेष, कर्क, तूळ आणि मकर या राश्या आहेत. या चारही राश्यामध्ये मकर राशीचे विशेष महत्त्व आहे. 


मकर संक्रांत चे महत्व- makar sankranti Marathi Mahiti

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होतो. उत्तरायण हे देवतांचे अयन असते. अयन हा देवतांचा एक दिवस असतो. 360 अयन मिळून देवतांचे एक वर्ष बनते. 1 अयन आपल्या 6 महिण्यायेवढे असते. म्हणून वर्षभरात दोन अयन होतात एक उत्तरायण आणि दुसरे दक्षिणायन. सूर्याच्या उत्तर दिशेच्या प्रवेशाला उत्तरायण म्हटले जाते. या काळात सूर्यदेवाची पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या नंतर दिवस मोठे व रात्र लहान होत जातात. 


तिळगुळ खाण्याचे महत्व-

आपल्या देशात वेगवेगळया ऋतूत वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवले जातात. मकर संक्रांतीच्या या काळात तिळ गुळ खाण्याची परंपरा आहे. तिळाचे लाडू बनवून खाल्ले जातात. परंतु तिळ गुड फक्त स्वादासाठी नाही तर यामुळे आपल्या आरोग्याला देखील फायदे होतात. थंडीच्या या काळात जेव्हा शरीराला उष्णतेची आवश्यकता असते तेव्हा तिळ आणि गुळाचे पदार्थ ही कमतरता भरून काढतात. तिळात तेलाचे प्रमाण जास्त असते. तिळामुळे शरीरात तेलाचे प्रमाण वाढते आणि यामुळे शरीराला गरम राखण्यात मदत होते. हेच कारण आहे की मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळ गुळ खाण्याची परंपरा आपल्या देशात आहे. 



मकर संक्रांतीला पतंग उडविण्याचे महत्त्व -

आपल्या देशात प्रत्येक सणाची काही न काही परंपरा असते. दिवाळीला फटाके फोडणे, होळी ला रंग लावणे. अश्याच पद्धतीने मकर संक्रांतीला पतंग उडविण्याचे महत्त्व आहे. विशेषकरून गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये पतंग उडवली जाते. पतंग उडवण्या मागे करमणूक करणे हा उद्देश असला तरी यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. सकाळी सकाळी मोकळ्या आकाशाखाली पतंग उडवल्याने शरीराला उन लागते. उन्हातून भरपूर प्रमाणात विटामिन डी मिळते आणि यामुळे थंड हवेमुळे होणाऱ्या शारीरिक समस्या दूर होतात.

मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश मराठी वाचा येथे 


मकरसंक्रांतीची पूजा विधी- 

मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळ पाण्यात टाकून अंघोळ करावी. या नंतर संक्रांती व्रत करायला हवा. देव्हाऱ्यात पूजा करून सुर्य देवाचा मंत्र 'ओम ह्री सूर्याय नमः' या मंत्राचा जाप करावा.


तर मित्रानो हि होती मकर संक्रांत या सणाविषयी मराठी माहिती (Makar Sankranti information in Marathi), तुम्हाला हि माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगा व विविध विषयावरील ज्ञानवर्धक लेख वाचण्यासाठी भेट द्या..  https://www.bhashanmarathi.com/ 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने