संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी। Sant Dnyaneshwar Information in Marathi

आपला देश भारत महान संताची भूमी आहे. वेगवेगळ्या काळात भारतात अनेक साधू संत होऊन गेलेत. खास करून महाराष्ट्रात मोठमोठे संत झाले आहेत. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास इत्यादी अनेक साधू संत महाराष्ट्रात होऊन गेलेत. आजच्या या लेखात आपण महान संत ज्ञानेश्वर याच्या बद्दल माहिती (Sant Dnyaneshwar Information in Marathi) जाणणार आहोत. 


Sant Dnyaneshwar Information in Marathi. Sant Dnyaneshwar Marathi Mahiti

संत ज्ञानेश्वर मराठी माहिती - Sant Dnyaneshwar Information in Marathi

पुढे आपणास संत ज्ञानेश्वर यांचे प्रारंभीक जीवन, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील प्रसंग व समाधी इत्यादि ची माहिती देत आहोत. 

संत ज्ञानेश्वर प्रारंभिक जीवन

संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी 1275 साली भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात झाला. ज्ञानेश्वर भारताचे महान संत व कवी होते. ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठल पंत हे एक संन्यासी होते. विवाहात असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. परंतु तेथील गुरूंना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी विठ्ठलपंतांना वापस गृहस्थाश्रमात पाठवले. गुरूंच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. त्यांचे नावं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई असे होते. 

विठ्ठलपंतांनी संन्यास सोडून परत संसारात प्रवेश केल्याने त्या काळी संन्यासाची मुले म्हणून समाज यांच्या कुटुंबाची हेटाळणी करीत असे. समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. यामुळे त्या सर्वांना खूप कष्ट सोसावे लागले. समाजातून बहिष्कृत झाल्यानंतर त्यांना राहण्यासाठी झोपडी सुद्धा नव्हती. लोकांद्वारे होत असलेला त्रास सहन करत करत शेवटी विठ्ठलपंत यांनी आपली पत्नी रुक्मिणीबाई सोबत आत्महत्या करून प्रायश्चित केले. 

आई वडिलांच्या मृत्यूनंतरही कित्येक वर्ष ज्ञानेश्वर व त्याच्या भावंडाना समजाद्वारे फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न पाणी या सारख्या गोष्टी देण्यासही नकार देण्यात आला. या नंतर ते भावंड पैठण ला गेले. 15 वर्षाच्या कमी वयात त्यांनी भगवान कृष्णाच्या भक्तीत स्वताला तल्लीन करून दिले. कमी वयात ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली व ते एक साक्षात्कारी योगी बनून गेले.


ज्ञानेश्वरांचे कार्य ग्रंथ साहित्य

ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1290 साली "भावार्थदीपिका" नावाचा ग्रंथ लिहिला याला "ज्ञानेश्वरी" देखील म्हटले जाते. हा ग्रंथ भगवदगीतेचा मराठी अनुवाद होता. या ग्रंथाद्वारे ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत सर्वांना समजेल अश्या पद्धतीने दिले. 

ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ 'अमृतानुभव' हा होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा व जीव ब्रह्म एक्याचा ग्रंथ आहे. यात 800 ओव्याचा समावेश आहे.  

चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेव महाराजांचे गर्वहरण करून त्यांना योग्य उपदेश पण दिला. संत ज्ञानेश्वर व संत चांगदेव याचा प्रसंग पुढील प्रमाणे आहे.

dnyaneshwar and changdev maharaj in marathi

संत ज्ञानेश्वर व चांगदेव महाराज (dnyaneshwar and changdev maharaj in marathi) 

चांगदेव महाराज हे अनेक सिद्धी प्राप्त केलेले योगी होते. त्यांनी जवळपास 42 वेळा मृत्यूला पण हरवले होते. या मुळे म्हटले जाते की ते 1400 वर्ष आयुष्य जगले. लोकांच्या तोंडून त्यांना संत ज्ञानेश्वरांची ख्याती ऐकायला आली. इतक्या कमी वयाच्या मुलाला समाजाकडून एवढी ख्याती कशी मिळत आहे असा प्रश्न त्याच्या मनात आला. त्यांना ज्ञानेश्वरांनप्रती मत्सर वाटायला लागला. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याचे ठरविले. परंतु जेव्हा त्यांनी पत्रलेखनाला सुरुवात केली तेव्हा पत्राची सुरुवात कश्याने करावी हेच त्यांना सुचत नव्हते. ज्ञानेश्वराला चिरंजीव म्हणावे की तीर्थरूप, कारण जर चिरंजीव म्हणावे तर विधनात्मक ज्ञान त्याच्या तोडून निघता आहे व तीर्थरूप म्हणावे तर तो वयाने खूप लहान आहे.


शेवटी चांगदेवांनी कोरे पत्रच ज्ञानेश्वरांना पाठून दिले. ते पत्र संत ज्ञानेश्वरांच्या बहीण मुक्ताबाई च्या हातात आले. पत्राला पाहून मुक्ताबाई म्हणाल्या 1400 वर्ष जगूनही चांगदेव अजून पण कोराच आहे. चांगदेवांच्या या पत्राला उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी पासष्ट ओव्या लिहून पाठवल्या. हाच तो चांगदेव पासष्टी ग्रंथ होय.


हे पण वाचा> माझे आवडते संत ज्ञानेश्वर मराठी निबंध


संत ज्ञानेश्वर समाधी (sant dynaneshwar samadhi)

केवळ 21 वर्षाच्या अल्प वयात इसवी सन 1296 मध्ये महान संत ज्ञानेश्वर यांनी सांसारिक मोहमाया त्यागून समाधी धारण केली. त्यांची समाधी ही आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्थित आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधी च्या अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या तीन भावंडांनी सुद्धा आपली इहलोकीची यात्रा संपवली. संत ज्ञानेश्वरांच्या कविता, महान ग्रंथ व उपदेशांना आज सुद्धा आठवण केले जाते.


तर मित्रानो हि होती महान संत ज्ञानेश्वर यांची माहिती. तुम्हाला हि Sant Dnyaneshwar information in Marathi कशी वाटली आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की सांगा व आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद...

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने