मला पंख असते तर मराठी निबंध। Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

मित्रानो आकाशात उडणाऱ्या पक्ष्याना तुम्ही पाहातच असाल आणि तुम्ही देखील बऱ्याचदा असा विचार केला असेल की पक्ष्याप्रमाणे मला पंख असते तर म्हणूनच आजच्या या मराठी निबंधाचा विषय आहे, जर मला पंख असते तर मराठी निबंध भाषण (mala pankh aste tar nibandh bhashan) 



मला पंख असते तर मराठी निबंध - mala pankh aste tar marathi nibandh (250 शब्द)

मला आकाश पाहायला खूप आवडते आकाशाची भव्यता आणि सौंदर्य माझ्या मनाला मोहून घेते. आकाशातील स्पष्ट निळा रंग मला खूप आवडतो आणि या आकाशाला व उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून मला वाटते की काश जर माझे सुद्धा पंख असते तर...! किती मजा आली असती. मी सुद्धा पक्षाप्रमाणे हवेला कापत उडालो असतो. 


संपूर्ण आकाशाची मी भटकंती केली असती. आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी जायला वाहनांची आवश्यकता असते पण जर माझे पंख फुटले असते तर मला कुठल्याही वाहनाची आवश्यकता राहिली नसती. माझे पंखच मला एक स्थानावरून दुसऱ्या स्थानाला घेऊन गेले असते. पंखांच्या मदतीने मी आकाशात इकडून तिकडे गिरक्या मारल्या असत्या. 


आपल्याला कधी पण नातेवाईक किंवा मित्राचा फोन आला की आपण त्यांच्याशी गप्पागोष्टी करतो पण जर मला पंख राहिले असते तर फोनवर गप्पागोष्टी करण्याची गरजच राहिली नसती. पक्ष्यांसारखा आकाशात उडत मी माझे मित्र व नातेवाईकांच्या घरी पोहचून गेलो असतो. मला आकाशात पक्षी आणि पतंगासारखे उडण्यात खूप आनंद झाला असता. कोणत्याही गाडी मोटरीची मला आवश्यकता राहिली नसती. 


मला उडायचे आहे आकाशाची सैर करायची आहे. लोक विमानाद्वारे आकाशाची सैर करतात, पण स्वतःच्या पंखाद्वारे आकाशात उडायची गोष्टच वेगळी आहे. पंख मला जर असते तर मी पक्ष्यांप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडत गेलो असतो. वेगवेगळ्या झाडांच्या थंड हवा अनुभवल्या असत्या. स्वादिष्ट फळ खाल्ले असते. या फळांसाठी मला पैसेही द्यावे लागले नसते. 


जेव्हा मी पंखांच्या मदतीने आकाशात उडत राहिलो असतो, तेव्हा बऱ्याच पक्षांना मी त्यांचा बंधू वाटलो असतो. ते माझ्या सोबत उडाले असते. आम्ही सोबत मिळून जलद उडण्याची शर्यत लावली असती. खरोखरच जर मला पंख राहिले असते तर हे जग माझ्यासाठी अजून सुंदर होऊन गेले असते. काश मला पंख असते तर...!

---


मला पंख फुटले तर | mala pankh futle tar (300 शब्द)

मोकळ्या आकाशाला पाहून एक प्रश्न मनात येतो की जर मला पंख राहिले असते तर काय झाले असते? किती मजा आली असती मी इतरांपेक्षा वेगळा राहिलो असतो. माझे पंख कधीही थांबले नसते. जिथे मला जायचे आहे त्या ठिकाणी मला उडवून घेऊन गेले असते. शाळेत जायला मला बस ची वाट पाहावी लागली नसती, उडत उडत मी तेव्हाच शाळेत पोहोचलो असतो. पक्षी ज्या पद्धतीने हवेला कापत उडतात त्याच पद्धतीने मी आनंदाने हवेला कापले असते. 


पंखामुळे मला विमानाची मोफत सैर मिळाली असती. वेगवेगळ्या देशाबद्दल माहिती वाचून मी त्या देशांमध्ये मुक्काम ठोकला असता. पंखांच्या मदतीने मी शहराच्या उंच जाऊन सुंदर दृश्य पाहली असती. शहराची ही दृश्य मोबाइल मध्ये टिपून मित्रांना दाखवली असती. पंखांनी मी माझ्या आईला दररोज कुठ न कुठ फिरवायला नेले असते. माझ्या मित्रांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून पंखांची एक सैर दिली असती. थंड हवेमध्ये माझी सैर झाली असती. पंखाच्या मदतीने मी कापसासारख्या मऊ मऊ ढगांमध्ये हात पुरवला असता. 


पंख असल्याने मी एखाद्या सुपर हीरो सारखा राहीलो असतो. शहरातील चोर डाकूना पकडण्यासाठी मी उंच उडून त्यांचा पत्ता लावला असतं. पंखामुळे मला संपूर्ण जग वरून पाहता आले असते सुंदर दृश्य मी माझ्या डोळ्यामध्ये भरले असते. पाऊस कुठून येते हे पाण्यासाठी मी वर गेलो असतो. पळापळी च्या खेळात मला कोणीही हरवू शकले नसते. पंखांमुळे मला निसर्गाबद्दल अधिकाधिक माहिती कळली असती. मी उडत उडत उंच उंच पर्वत आणि खोल दऱ्यांची सैर केली असती. उडत उडत समुद्राच्या अंत काय आहे ते पाहण्यासाठी गेलो असतो.


पंख असण्याची कल्पना खूप सुखद आहे. परंतु परमेश्वराने पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याची रचना वेगवेगळी केली आहे. मनुष्याला पंख जारी नसले तरी त्याला बुद्धी मिळाली आहे. ज्या बुद्धी च्या बळावर तो काहीही करू शकतो. जरी आज माझ्याकडे शारीरिक पंख नसले तरी माझे ज्ञान माझी आवड माझे पंख आहेत. कारण आजच्या जगात ज्ञानाने कोणताही व्यक्ती उंच उडू शकतो. ज्याचा कडे ज्ञान रुपी पंख आहेत असा व्यक्ती कुटुंब, समाज व देशाचे कल्याण करतो. म्हणून वेळोवेळी नवनवीन पुस्तके व माहिती वाचून मी माझे ज्ञानरूपी पंख मोठे करीत राहील.

---


       तर मित्रानो हा होता जर मला पंख असते तर - mala pankh aste tar या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि मराठी निबंध व भाषण प्राप्त करण्यासाठी भेट द्या.. Bhashanmarathi.com

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने