पंडित जवाहरलाल नेहरू भाषण मराठी | Pandit jawaharlal nehru information in marathi

पंडित जवाहरलाल नेहरू माहिती व भाषण मराठी| Pandit jawaharlal nehru bhashan marathi.

नमस्कार मित्रानो स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना चाचा नेहरु देखील म्हटले जाते. आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू बद्दल मराठी माहिती जाणणार आहोत. ही माहिती भाषण च्या रुपात आहे म्हणून 14 November Speech in Marathi म्हणून देखील आपण वापरू शकतात. शाळेत पंडित नेहरू भाषण स्पर्धा होतात या साठीच हे भाषण तयार केले आहे.


पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध भाषण (Essay/Nibandh on pandit Nehru in Marathi) (३०० शब्द)

अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 


स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद शहरात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू नामांकित वकील होते. पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडत असत. यामुळेच त्यांना चाचा नेहरू म्हणून देखील संबोधले जाऊ लागले. प्रत्येक वर्षी त्यांच्या जन्म दिवसाला 'बाल दिन' म्हणून साजरा होतो. 


पंडित नेहरू 15 वर्षाचे असतात त्याच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी इंग्लंड च्या हैरो स्कूल मध्ये पाठून दिले. या नंतर केब्रिज विश्वविद्यालयातुन त्यांनी पुढील उच्च शिक्षण मिळवले. 1912 साली पंडित नेहरू आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करून भारतात परत आले. 


भारतात परत आल्यावर ते भारतीय स्वतंत्र लढ्यात सामील झाले. या दरम्यान त्यांची गांधीजीशी चांगली ओळख झाली. गांधीजी द्वारे प्रभावित होऊन ते 1919 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सामील झाले. 1920 ते 1930 दरम्यान इंग्रजांनी पंडित नेहरूंना बऱ्याचदा तुरुंगात टाकले. 1928 साली काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. याच अधिवेशनात 'पूर्ण स्वराज्य' ची मांग करण्यात आली. 26 जानेवारी 1930 ला पंडित नेहरूंनी लाहोर मध्ये स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवला. 1942 मध्ये जेव्हा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली, तेव्हा या आंदोलनात पंडित नेहरूंनी पुढाकार घेतला. इंग्रजांनी पंडित नेहरू समेत गांधीजी व अन्य काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बंदी बनवले आणि तीन वर्षानंतर म्हणजेच 1945 मध्ये मुक्त केले. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यसाठी त्यांनी इंग्रज सरकार सोबत महत्त्वाची चर्चा केली. 


1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींनी पंडित जवहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडून दिले. भारतातील सर्व संस्थानांना एकत्रित करण्याचे काम पंडित नेहरू यांनी केले. त्यांनी एकाच झेंड्याखाली सर्व स्वतंत्र रियासतांना आणले. पंडित नेहरूंनी भारताच्या पुननिर्माण कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी 50 व्या दशकात खूप सारे राजनेतिक, आर्थिक आणि सामाजिक निर्णय घेतले. 27 मे 1964 ला सकाळच्या वेळी अचानक त्यांची तब्येत बिघडली व दुपारी 2 वाजेच्या सुमारास हृदय विकाराने त्यांचे निधन झाले.

या भाषणाचा विडिओ पहा- 



पंडित जवाहरलाल नेहरू मराठी भाषण(Speech on pandit Nehru in Marathi) (५०० शब्द)

अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 

आजचा दिवस आपण बाल दिवस म्हणून साजरा करीत आहोत. आज 14 नोव्हेंबरला आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडत असत म्हणून त्यांच्या जन्मदिवस बालदिन म्हणून देखील साजरा केला जातो. 

लहान मुले ही देशाचे भविष्य असतात. प्रत्येक वर्षी १ जूनला आंतरराष्ट्रीय बाल दिवस साजरा केला जातो आणि 14 नोव्हेंबरला भारतीय बाल दिन साजरा होतो. चाचा नेहरूंना मुलांशी गप्पा गोष्टी करायला आणि खेळायला खूप आवडत असे. भारताचे प्रधानमंत्री असतानादेखील ते मुलांमध्ये वेळ घालवत असत.

ते मुलांना एक चांगला नागरिक आणि देशभक्त बनण्याची प्रेरणा देत असत. चाचा नेहरूंचे मत होते की देशात मुलगा-मुलगी भेदभाव व्हायला नको. लोक मुलगा झाल्यावर खुश होतात आणि मुलगी झाल्यावर दुःख व्यक्त करतात, असे करणे सरळ सरळ चुकीचे आहे. मुलगीसुद्धा मुलान एवढीच अमुल्य आहे. म्हणून भेदभाव करणे योग्य नाही.

चाचा नेहरूंचे मत होते की जर आपल्या देशाचे युवक योग्य शिक्षित आणि मेहनती बनले तर आपला देश खूपच पुढे जाईल. आज मुलांप्रमाणे मुलीसुद्धा देशाचे नाव वाढवित आहेत. सुनीता विल्यम्स नासा द्वारे अंतरिक्ष यात्रा करणाऱ्या प्रथम महिला बनून गेल्या आहेत. कल्पना चावला या देशातील पहिल्या अंतरिक्ष यात्री बनल्या आहेत. खेळाच्या क्षेत्रात आज सानिया नेहवाल, सानिया मिर्झा, पी व्ही सिंधू, ज्वाला गट्टा, हिमा दास यासारख्या देशाच्या मदतीने आपले नाव रोशन केले आहे. 

लहान मुलांना देखील आपले कर्तव्य निभवायला हवे. आपले आई-वडील व शिक्षकांचा सन्मान करायला हवा. आज आपल्या देशात 1 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना प्राथमिक शिक्षण पूर्ण तऱ्हेने निःशुल्क केले आहे. शाळेत मुलांना मोफत पुस्तके, कपडे, बूट, स्कॉलरशिप आणि भोजन उपलब्ध केले जाते. कोणताही मुलगा अशिक्षित राहायला नको हा त्यामागील उद्देश आहे. 

1956 मध्ये पहिल्यांदा आपल्या देशात बाल दिवस साजरा केला गेला. या दिवशी मुलांना मिठाई, फळे, चॉकलेट, फुग्गे इत्यादी अनेक गोष्टी दिल्या जातात. हा दिवस मुले खूपच आनंदाने साजरा करतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 ला अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू व आईचे नाव स्वरूप राणी होते. त्यांनी इंग्लंडला जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना बऱ्याचदा तुरुंगात देखील जावे लागले. पंडित नेहरू हे एक महान लेखक होते. 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ते प्रथम पंतप्रधान बनले.

त्यांनी 1921 ते 1922 मधील असहयोग आंदोलनात सहभाग घेतला. आणि 1929 ला सविनय कायदेभंग मध्ये त्यांनी भाग घेतला. यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, विदेशी वस्तू आणि कपड्यांच्या त्यांनी त्याग केला. 

आजच्या सर्व मुलांना आवश्यक आहे की त्यांनी पंडित नेहरूंचे आदर्श पाळायला हवे. त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालायला हवे, एक चांगला नागरिक बनून दाखवायला हवे.

जर पंडित नेहरू यांच्या स्वप्नाला सत्यात आणायचे असेल तर देशातील मुलांना त्याचे हक्क द्यायला हवे. चांगले शिक्षण मिळाल्यावर मुले शिक्षक, इंजिनिअर, सायंटिस्ट, वकील, जज आणि अन्य सरकारी पदांवर जाऊन देशाचे नाव रोशन करतील. आपण सर्वांनी बाल दिवस आनंद आणि उल्हासाने साजरा करायला हवा. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो, धन्यवाद...
Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने