शेतकऱ्याची आत्मकथा निबंध | Shetkaryachi Atmakatha in Marathi

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध/ शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध  Shetkaryachi atmakatha in marathi nibandh


Shetkaryachi atmakatha in marathi

शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध (Essay on Shetkaryachi Atmakatha in Marathi) (450 शब्द)

माझा जन्म पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्य प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करण्याकरिता झाला आहे..! मित्रांनो मी एक शेतकरी आहे. माझे जीवन इतरांपेक्षा कठीण आहे. पण तरीही मी लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधून खूश राहण्याचा प्रयत्न करतो. इतर लोकांपेक्षा मला सकाळी लवकर उठून शेतात जावे लागते. माझे शेत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून, माझ्यासाठी सर्वकाही आहे. त्याच्याशिवाय मी एक क्षणही जीवन जगू शकता नाही. ज्याप्रमाणे आई वडील आपल्या मुलाचे पालनपोषण करतात, त्याच पद्धतीने मी शेताची मशागत करून त्याला सुपीक करतो. 


माझे अर्ध्यापेक्षा जास्त जीवन शेतात जाते. दिवस-रात्र शेतात राबून धान्य उगवणे माझे काम आहे. शेतकरी बनणे सोपे काम नाही. एका शेतकऱ्याचे जीवन खूप सार्‍या कष्टांनी भरलेले असते. मला सतत 12 महिने एकही दिवस सुट्टी न घेता मेहनत व प्रामाणिकपणे कार्य करावे लागते. माझ्या शेताच्या कार्यात माझे बैल देखील खूप मदत करतात  मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतातच काम करतो. दिवसभर उन्हात चालल्याने माझ्या पायाला जमिनी प्रमाणे तडे पडून जातात. पण मला या गोष्टीची अजिबात चिंता नाही, कारण मला माहित आहे की माझ्या एक एक कष्टाचे फळ माझ्या जीवनात आनंद निर्माण करणार आहे. 


थंडीच्या दिवसात लोक घट्ट पांघरून झोपून राहतात. मला मात्र थंडीच्या रात्री शेतात जाऊन पिकाचे रक्षण व पिकाला पाणी द्यावे लागते. जास्त काम केल्यामुळे कधी कधी तर मला ताप पण येऊन जातो. माझी तब्येत बिघडून जाते. 


आधीच्या काळात माझी परिस्थिती चांगली होती. कारण तेव्हा महागाई पण कमी होती. मला दोन वेळचे अन्न मिळून जात होते. पण आजच्या काळात माझी परिस्थिती खूप खालावली आहे. आज शेतात लावण्यासाठी लागणाऱ्या बी चे भाव वाढले आहे. कीटकनाशके व इतर शेतीसाठी उपयुक्त साहित्याचे भाव देखील वाढत आहेत. अश्यामध्ये मला कोणाकडून तरी पैसे उसनवार घ्यावे लागतात. 


पावसाच्या येण्याआधी मी शेतात बी लावून देतो. त्यानंतर दररोज शेतात जाऊन मला काम व रक्षण करावे लागते. पिकांना वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते म्हणून मी पावसाची वाट पाहत बसतो. पण माझं नशीब खूप खराब आहे. कधी कधी जोरदार पाऊस येऊन जातो तर कधी कधी पाऊस येतच नाही. यामुळे माझ्या पिकांचे खूप नुकसान होते. सर्व पीक वाया गेल्याने मी कर्जबाजारी होतो. माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करणे कठीण होऊन जाते. आमचे जीवन भिकाऱ्या पेक्षा पण वाईट होते. पण मी कोणीतरी मदत करेल या आशेवर बसून राहत नाहीत.


परत एकदा मी मेहनतीला लागतो. मग तो दिवस पण उजळतो जेव्हा माझ्या कष्टाचे फळ मला मिळते आणि माझे शेत पुन्हा एकदा पिकानी बहरून जाते. या पिकाला पाहून माझ्या मनातील आनंद गगनात मावेनासा होतो. जगभरातील लोक मला अन्नदाता म्हणतात. पण ही गोष्ट खुप दुःखद आहे की जेव्हा माझ्यावर संकट येते तेव्हा कोणीही मदतीला पुढे येत नाही. माझ्यासारखे कित्येक शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करून टाकतात. 


संकटात मी मेहनत करायला मागेपुढे पाहत नाही. शेताची मी ईश्वर म्हणून पूजा करतो. माझी इच्छा फक्त एवढीच आहे की माझ्या कठीण काळात सरकार तसेच तुमच्यासारखे इतर लोकांनी माझ्या बाजूला उभे राहावे व जास्त नाही तर फक्त दोन वेळेचे अन्न माझ्या कुटुंबाला उपलब्ध करून द्यावे.


या निबंधाचे शीर्षक पुढील प्रमाणे देखील असू शकते:

  • मी शेतकरी बोलतोय
  • Shetkari atmakatha
  • शेतकऱ्याची व्यथा
  • शेतकऱ्याचे मनोगत
  • Shetkari che manogat
  • शेतकऱ्याची आत्मकथा
  • mi Shetkari boltoy
  • शेतकऱ्याचे आत्मकथन
  • autobiography of farmer in marathi 


तर मित्रानो हि होती शेतकऱ्याची आत्मकथा (Shetkaryachi Atmakatha) या मराठी निबंधाला तुम्ही तुमच्या शाळा कॉलेज मध्ये वापरू शकतात. तुम्हाला हि गरीब shekaryachi atmakatha कशी वाटली आम्हाला कंमेंट मध्ये सांगा. जर निबंध लिहितांना काही चूक झाली असेल तर ते पण कंमेंट्स मध्ये सांगा.. 


WATCH VIDEO:


Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने