पोपट पक्षी संपूर्ण मराठी माहिती | Parrot Marathi Information

पोपट पक्ष्याची माहिती Information About Parrot In Marathi.

पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर व बहुसंख्य लोकांच्या पसंतीचा जर कोणता पक्षी असेल तर तो आहे पोपट. पोपटाला इंग्रजीत parrot म्हटले जाते. पोपट (Parrot) हे वेगवेगळ्या रंगीबिरंगी रंगांचे असतात. पोपट जवळपास संपूर्ण जगात आढळतात. जगभरात पोपटांच्या 350 पेक्षा जास्त जाती आहेत. आज आपण Parrot म्हणजेच पोपटा बद्दल मराठी माहिती मिळवणार आहोत. ही Parrot information in Marathi आपण आपले ज्ञान वाढवण्यासाठी तसेच शाळा कॉलेजमधील प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी वापरू शकतात.


Information About Parrot In Marathi. पोपट पक्ष्याची माहिती

पोपटा बद्दल माहिती (Popat Marathi Mahiti)

पोपटा हा मध्यम आकाराचा पक्षी असतो जो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळते. पोपट हे वेगवेगळ्या रंगांचे असू शकतात जसे पांढरा, निळा, हिरवा, रंगबिरंगी, पिवळा, लाल इत्यादी. जगभरात पोपटांच्या 350 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. पोपटाची लंबाई 10 ते 12 इंच असते. पोपट हा समजदार व बुद्धिमान पक्षी आहे. कोणतीही गोष्ट तो इतर पक्षांच्या तुलनेत लवकर शकतो. पोपट हा मनुष्याप्रमाणे बोलणे देखील शिकू शकतो. 


पोपटे उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. त्यांच्या आहार प्रत्येक प्रजाती नुसार वेगवेगळा असतो, पोपट हे शाकाहारी असतात ते वेगवेगळ्या भाज्या, फळे, बिया इत्यादी खातात. बरेच पोपट हे आपल्या पायाच्या सहाय्याने भोजन तोंडात पोचवतात. 


घरातील पिंजऱ्यामध्ये पोपट पाळले जातात. पाळीव पक्षाच्या रूपाने पोपट हा लोकप्रिय आहे. पोपट पकडून विक्री करणे मोठा व्यापार बनून गेला आहे.


पोपटा बद्दल उपयुक्त माहिती (Parrot Marathi Information)

1) पोपट मनुष्याच्या आवाजाचे अनुकरण करू शकतात.

पोपटांना मोठ्या प्रमाणात पाळण्यामागे एक कारण हे देखील आहे की पोपट मनुष्याच्या आवाजाचे हुबेहूब अनुकरण करू शकतात. माणसाशिवाय ते इतर पक्षी, प्राणी, घरातील वस्तू जसे फोन, व्याक्युम क्लिनर, वाहणारे पाणी, दरवाजे ची घंटी, मोबाईलची बेल इत्यादी आवाज काढू शकतात.


2) पोपट सर्वात समजदार पक्षांपैकी एक आहे

वैज्ञानिकांचे मत आहे की पोपटाकडे एका चार वर्षाच्या मुलाएवढी बुद्धी असते. पोपट खूप चंचल स्वभावाचा असतो. 


3) पोपट एक मात्र पक्षी आहे जो आपल्या पायाने खाऊ शकतो

पोपटाच्या प्रत्येक पायात चार पंजे असतात, दोन पुढे आणि दोन मागे. पोपटाचे पाय मजबूत असतात, ह्या पायांच्या मदतीने तो झाडाच्या फांद्यांना घट्ट पकडून ठेवतो. पोपटाचे पाय मनुष्याच्या हाताप्रमाणे कार्य करतात. तो आपल्या पायाने कोणतीही वस्तू उचलू शकतो, पोपट त्याचे अन्न पायांच्या मदतीने उचलून खातो.


4) काही पोपट 80 वर्षापेक्षा जास्त जगू शकतात

तसे पाहता पोपटांच्या प्रत्येक प्रजातीच्या जीवन काळ वेगवेगळा असतो. मध्यम आकाराचे पोपट 25 ते 30 वर्षे जगतात तर मोठ्या आकाराचे काही पोपट 60 ते 100 वर्षे जगतात. 


5) पोपटाची चोच खूप मजबूत असते

पोपटाच्या मुख्य विशेषता पैकी एक आहे त्याची चोच. त्याची चोच घुमावदर असते वरील चोच ही खालील चोचे पेक्षा मोठे असते. या शिवाय ही चोच मजबूत पण असते. पोपट या चोचेच्या मदतीने अक्रोड व नारळ सारखे टणक फळ पण तोडून टाकतात. 



पोपटा बद्दल रोचक माहिती (parrot Marathi information)

  • भारतात पोपटाला पाळणे बेकायदेशीर आहे.
  • पोपटाच्या पंखात अँन्टी बॅक्टेरियल तत्व असतात.
  • पोपट एक मात्र असा पक्षी आहे जो आपल्या पंखांच्या मदतीने अन्नाला पकडू शकतो.
  • पोपटाला वाचणे, मोजणे व बोलणे शिकवले जाऊ शकते.
  • पक नावाच्या एका पोपटाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान दिले आहे. कारण त्याने 1728 शब्द स्मरण केले होते.
  • जगातील सर्वात लहान व कमी वजनाचे पोपट पिग्मी प्रजातीचे आहे. त्याचे वजन दहा ग्रॅम असते.
  • पोपटाला कधीही चॉकलेट खाऊ घालायला नको. चॉकलेट खाल्ल्याने त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
  • अधिकांश पोपट एका पायावर उभे राहून झोपतात.
  • माणसांप्रमाणे पोपट पण लठ्ठपणाचे शिकार होतात.
  • पोपटांच्या उडण्याचा वेग 15 ते 25 किलोमीटर प्रति तास असतो. 
  • काकापो ही एकमात्र पोपटाची प्रजात उडण्यात सक्षम नसते, या मागील कारण त्यांचा लठ्ठपणा आहे.
  • उडण्यात सक्षम नसल्याने काकापो ही प्रजात विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 


पोपट हा जगभरातील लोकांच्या पसंतीचा पक्षी आहे. या मुळेच आज पोपटाचा अवैध पद्धतीने व्यापार केला जात आहे. भारतात पोपट पकडणे तसेच कैद करून ठेवणे कायद्याने अपराध आहे. पण तरीही मोठ्या प्रमाणात लोक पोपटांना कैद करून ठेवतात असे करणे योग्य नाही. झाडावरील पक्ष्याची घरटी नष्ट करणे पण थांबवायला हवे पक्ष्यांना अधिकाधिक संरक्षण मिळवून द्यायला हवे. एक चांगला पक्षीमित्र बनण्यासाठी उपयुक्त माहिती आपण पुढे वाचू शकता.   How to protect birds in Hindi..

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने