अक्षय तृतीया मराठी माहिती- Akshaya tritiya Marathi Info
हिंदू सणांपैकी अक्षय तृतीया हा एक महत्त्वाचा सण आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. शुक्लपक्ष म्हणजे अमावस्या नंतरचे 15 दिवस ज्यामध्ये चंद्राचा आकार हळूहळू वाढत जातो. अक्षय तृतीया शुक्ल पक्षातच येते व याला 'अखाजी' देखील म्हटले जाते. आजच्या या लेखात आपण importance of Akshaya tritiya अर्थात अक्षय तृतीयाची मराठी माहिती पाहणार आहोत.
अक्षय चा अर्थ होतो जो कधीही नष्ट होणार नाही. म्हणून असे म्हटले जाते की अक्षय तृतीया या तिथित सोभाग्य आणि शुभ फळाची प्राप्ती होते. या दिवशी केले जाणारे कार्य मनुष्याच्या जीवनात कधी न समाप्त होणारे फळ देतात. म्हणून असे म्हटले जाते की या दिवशी मनुष्य जेवढे पुण्य कार्य व दान धर्म करतो त्याचे शुभ फळ त्याला निश्चितच मिळते.
अक्षय तृतीया का साजरी केली जाते? Akshaya tritiya importance in Marathi.
अक्षय तृतीयेला विवाहासाठी शुभ दिवस मानले जाते. ह्या दिवशी विवाह केल्याने विवाहित जोड्याचे बंधन मजबूत राहते. अक्षय तृतीयेला साजरे करण्यामागे अनेक मान्यता आहे आहेत. त्यातील काही प्रमुख ऐतिहासिक गोष्टी पुढील प्रमाणे आहेत.
- असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता.
- अक्षय तृतीयेच्याच दिवशी आकाशगंगेत निवास करणारी पवित्र गंगा नदी राजा भगीरथांच्या तपामुळे भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठवली होती.
- देवी अन्नपूर्णानेला देवी पार्वती चे रुप मानले जाते, देवी अन्नपूर्णेचा जन्म अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी झाला होता. या दिवशी लोक अन्नपूर्णा देवीची पूजा करून गरिबांना दान देतात.
- दक्षिण भारतातील मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीने कुबेराच्या तपाने प्रसन्न होऊन त्यांना धनाचे देवता बनवले होते. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी यंत्र आणि भगवान कुबेराची देखील पूजा केली जाते.
- महाभारतामध्ये देखील अक्षय तृतीयेचा उल्लेख सापडतो. महर्षी वेद व्यास यांनी याच शुभ दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. युधिष्ठिराला अक्षय तृतीयेच्या दिवशी 'अक्षय पात्र' वरदान म्हणून मिळाले. वनवासा दरम्यान द्रौपदी चे भोजन होत नाही तोपर्यंत या अक्षय पात्रातील अन्न संपत नसे.
- एका कथेनुसार असे ही म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या याच शुभ दिवशी भगवान कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती.
- भविष्यपुराण नुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग चा आरंभ झाला होता.
अक्षय तृतीयेची पूजन विधि-
या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी च्या पूजेचे महत्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णु भगवान ची पूजा करून त्यांना तांदूळ चढवले जातात. पुजे नंतर तुळशी च्या पान सोबत त्यांना भोजन दिले जाते. सर्व पूजा झाल्यावर धूप बत्ती लावून आरती केली जाते.
अक्षय तृतीया चे उपाय- Akshay tritiya che upay marathi
अक्षय तृतीयेच्या दिवशी लहान लहान गोष्टी दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. म्हणून म्हटले जाते की या दिवशी दान केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होते. शुद्ध मनाने केलेले दान अधिक फलदायी असते. या दिवशी बरेच लोक इलेक्ट्रॉनिक सामान दान देतात.
2021 मध्ये अक्षय तृतीया केव्हा आहे? 2021 मधील अक्षय तृतीया चे मुहूर्त.
तसे पाहता अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिवस असतो. विद्वान पंडित आणि धर्माचे ज्ञान असणारे लोक म्हणतात की या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नाही. परंतु तरीही या वर्षी अक्षय तृतीयाचा शुभ दिवस 14 मे ला आहे. व पूजेचे मुहूर्त सकाळी 05:40 ते 12:17 आहे.
Read More: