आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच जीवन संभव आहे. पृथ्वीवर अब्जावधी वर्षांपासून झाडे झुडपे, जीव जंतू वास्तव्यास आहेत. पृथ्वीवर जिवंत असणाऱ्या या सर्व जीवांचे रक्षण आणि पर्यावरणाविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल ला पृथ्वी दिवस साजरा केला जातो.
शास्त्रज्ञांनी अनेक शोधानंतर आपल्या या ग्रहाबद्दल महत्त्वाची माहिती मिळवली आहे म्हणून आज आपण पृथ्वीची निर्मिती कशी झाली आणि पृथ्वी ग्रहाची मराठी माहिती Earth information in marathi पाहणार आहोत.
पृथ्वी मराठी माहिती- prithvi chi mahiti
- पृथ्वीचे निर्माण जवळपास 4.54 अब्ज वर्षांपूर्वी झाले होते. आणि शास्त्रज्ञाच्या अनुमानानुसार धरतीवर 4.1 अब्ज वर्षां आधीपासूनच मानव जीवन अस्तित्वात आहे.
- पृथ्वी आपल्या सूर्यमालेतील पाचवा सर्वात मोठा ग्रह आहे.
- दूर अंतरिक्ष मधून पाहिल्यावर पृथ्वी निळ्या रंगाच्या ताऱ्या प्रमाणे दिसते.
- पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवतीपण प्रदक्षिणा घालते. सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यात पृथ्वीला लागल्या वेळेला 'सौर वर्ष' म्हटले जाते.
- पृथ्वीच्या पृष्ठभागावर 70% पाणी आहे.
- गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील पर्वत 15000 मीटर पेक्षा जास्त उंच वाढू शकत नाही.
- सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश पोहचायला 8 मिनीट आणि 18 सेकंद लागतात.
- शास्त्राज्ञानुसार आजपासून 450 करोड वर्षांपूर्वी, सूर्यमालेतील मंगळ ग्रहाच्या आकारा एवढा एक ग्रह होता. जो पृथ्वी सोबत एकाच कक्षेत सूर्याची परिक्रमा करीत असे. परंतु काही कारणास्तव हा ग्रह पृथ्वीला ठोकला गेला. ज्यामुळे पृथ्वी थोडी झुकून गेली आणि पृथ्वीचा एक तुकडा बाहेर निघाला पृथ्वीच्या याच तुटलेल्या तुकड्याला चंद्र म्हटले जाते.
- पृथ्वीवर दररोज 4500 मेघ गर्जना करतात.
- पृथ्वीवर असलेल्या एकूण महासागरांपैकी 95% महासागरांशी आजही माणसाचा संपर्क झालेला नाही.
- अब्जावधी वर्षा आधी अस्तित्वात असलेल्या प्राण्याच्या प्रजाती पैकी 99% प्रजाती विलुप्त झाल्या आहेत.
- पृथ्वीच्या फिरण्याची गती हळू हळू कमी होत आहे ज्यामुळे आजपासून 14 कोटी वर्षानंतर एक दिवस 25 तासांचा असेल.
- पृथ्वीच्या आतील भागातील तापमान 5400 ते 6000 अंश सेल्सिअस पर्यंत असू शकते. याचे एक उदाहरण पृथ्वीच्या आतून निघणारा ज्वालामुखी आहे.
- पृथ्वीच्या आंतरिक भागातील तापमान सूर्यापेक्षाही जास्त असते.
- विमान पृथ्वीपासून जवळपास 60,000 फूट म्हणजेच 18.288 किलोमीटर दूर उडतात.
- पृथ्वीच्या वायु मंडळात ओझोन वायू आढळतो. हा वायू सूर्याच्या शक्तिशाली आणि हानिकारक UV किरणांना (uv rays) पृथ्वीवर येण्यापासून रोखतो.
- पृथ्वीवरील सर्वात उष्ण दिवसाचे तापमान 56.7 अंश सेल्सिअस होते. हा दिवस 10 जुलै 1913 ला ग्रीनलँड मध्ये रेकॉर्ड केला होता.
- पृथ्वीवरील सर्वात थंड स्थान अंटार्टिका आहे.
- पृथ्वीवरील सर्वात जास्त पावसाचे स्थान मेघालय मधील मौसिनराम हे आहे. या स्थानावर 11,871 मिमी सरासरी पाऊस पडतो.
- शास्त्रज्ञानुसार पृथ्वीवरील 1500 खनिज पदार्थ असे आहेत ज्यांना अजून शोधले गेलेले नाही. मनुष्याने आजपर्यंत पृथ्वीवर आढळणारी 5000 पेक्षा जास्त खनिजे शोधून काढली आहेत.
तर मित्रांनो ही होती पृथ्वी ग्रहाची मराठी माहिती- Earth information in Marathi तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा.