[भ्रष्टाचार] भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध मराठी | bhrashtachar essay in marathi

मित्रांनो आजच्या काळात भ्रष्टाचार समाजासाठी एक कलंक आहे. भ्रष्टाचाराने भारतीय समाजात स्थान केले आहे. प्रत्येक ठिकाणी मोठ्या परांनात भ्रष्टाचार पहायला मिळत आहे. म्हणून भ्रष्टाचार मुक्त भारत करणे खूप आवश्यक आहे. आजच्या या लेखात आपण भ्रष्टाचार मराठी निबंध bhrashtachar essay in marathi पाहणार आहोत. तर चला सुरू करूया...



भ्रष्टाचार मुक्त भारत मराठी निबंध- bhrashtachar mukt bharat 

भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दांपासून मिळून बनलेला आहे. भ्रष्ट आणि आचार यात भ्रष्ट अर्थात चुकीचा आणि आचार म्हणजे वागणूक चुकीच्या वागणुकीला भ्रष्टाचार म्हटले जाते. चुकीच्या पद्धती वापरून जो व्यक्ती अनैतिक कार्यात सलग्न होतो त्याला 'भ्रष्टाचारी' म्हटले जाते. आज आपल्या देशात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नेते व देशातील लोक सत्याचा मार्गावर तरक्की मिळवणे सोडून भ्रष्ट निती आचरणात आणत आहेत. उदाहरण म्हणून जर तुम्हाला एखाद्या नोकरीत प्रमोशन हवे असेल किंवा नवीन नोकरी हवी असेल तर ते काम लाच देऊन केले जातात. लाच देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु आजकाल ची वास्तविकता ही आहे की जर कोणी लाच देताना पकडले गेले तर पोलिस स्टेशन मध्ये पुन्हा लाच देऊन ते सुटून जातात. बरेच दुकानदार स्वस्त आणि हलक्या दर्जाचा वस्तू महाग किमतीत विकून अधिक फायदा प्राप्त करतात.


आजकाल लोकांची मानसिकता अशी झाली आहे की त्यांना वाटते जर ते योग्य मार्गावर राहतील तर त्यांचे काम व्ह्यायला खूप दिवस लागून जातील. आजच्या व्यस्त जिवनात प्रत्येकाला लवकर यश हवे असते. या साठी काही लोक आपल्या प्रतिस्पर्धीना लाचखोरी व इतर खोट्या आरोपांमध्ये फसून टाकतात. आजकाल मोठ मोठे श्रीमंत व्यापारी आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणात धान्य साठवून ठेवतात. ज्यामुळे सामान्य माणसाला अन्नाच्या कमतरतेला सामोरे जावे लागते. 


भ्रष्ट्राचार एका संक्रामक रोगप्रमाने देशात पसरत आहे. दिवसेंदिवस भ्रष्टाचार च्या घटना वाढत आहेत. अधिकतर लोक बेइमानी आणि चोरी चा मार्ग अवलंबत आहेत. कोर्टात खोटे साक्षीदार दाखवून गुन्हेगार सुटत आहेत. बऱ्याच श्रीमंतांची मुले आजकाल पैसे भरून खोट्या पदव्या मिळवत आहेत. आज आपल्या देशाची राजनैतिक प्रणाली भ्रष्टाचारात लिप्त आहे. देशाचे जास्तकरून नेते, खासदार अशिक्षित आहेत. जर देशाची लगाम या लोकांच्या हाती असेल तर देश प्रगती करू शकणार नाही. अश्या देशाचे भ्रष्ट नेते लोकांना पैसे वाटून मत विकत घेतात आणि देशात निवडून येतात. 


आपल्या देशात वाढत्या भ्रष्टाचाराची अनेक कारणे आहेत. कधी कधी पैश्याच्या कमतरतेमुळेही लोक भ्रष्टाचाराच्या मार्गावर चालू लागतात. शासनाला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कठोर कायदे बनवायला हवेत. आज आपल्या देशात असे कोणतेही क्षेत्र नाही जे भ्रष्टाचार मुक्त आहे. खेडे असो किंवा शहर प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार मनुष्यातील माणुसकीला नष्ट करीत आहे. पैश्यांची आवश्यकता प्रत्येकालाच आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपण अयोग्य मार्गाने पैसे कमावणे सुरू करू. आपण सर्वांनी मिळून एक भ्रष्टाचार मुक्त समाजाची स्थापना करायला हवी. जे नेते भ्रष्टाचारी असतील अश्याना मत द्यायला नको. जेव्हा आपण भ्रष्टाचार कमी करायला प्रयत्न करू तेव्हाच देशाची प्रगती आणि विकास होईल.

समाप्त 

प्लास्टिक मुक्त भारत वाचा येथे 


तर मित्रांनो हा होता भ्रष्टाचार मराठी निबंध मला आशा आहे की तुमच्यासाठी हा निबंध उपयुक्त ठरला असेल, तुम्हाला हा निबंध कसा वाटला मला कमेन्ट करून नक्की कळवा. जर निबंध लिहीत असतांना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ते पण सांगा.. धन्यवाद...! 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने