आपल्या सभोवताली बागेत अनेक वेगवेगळे फूल फुललेले असतात, फुलांची सुंदरता मनाला मोहून घेते. काही फूल दिसण्यात सुंदर असतात तर काहींचा सुगंध मोहक असतो.
आजच्या या लेखात आपण माझे आवडते फूल गुलाब किंवा गुलाब मराठी निबंध पाहणार आहोत.
गुलाबाचे फूल |
माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी- majhe avadte ful
आपल्या देशात वेगवेगळ्या जातीची सुंदर फुले पाहायला मिळतात. परंतु या सर्वांमध्ये माझे आवडते फुल गुलाबाचे आहे. गुलाब फुल हे दिसण्यात सुंदर रंगाचे आणि सुगंधित असते. गुलाबाचा सुगंध मनाला मोहून घेतो. गुलाब फुलाच्या कडीला काटे लागलेले असतात. पण तरीही सर्वच लोकांद्वारे गुलाब पसंद केले जाते. गुलाबाच्या पाकळ्या अतिशय कोमल असतात.
जगभरात गुलाबाच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. गुलाबच्या रंगानुसार त्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरे, लाल, काळे, गुलाबी अश्या विविध रंगांमध्ये आणि विविध प्रदेशात गुलाब आढळतात. यापैकी पांढरे गुलाब हे पृथ्वीच्या उत्तर भागात सापडते. लाल गुलाब दिसण्यात सुंदर व सुगंधित असते हे फूल सर्वच देशांमध्ये आढळते. काळे गुलाब पूर्णपणे काळे नसते, ते हलक्या काळ्या रंगात आढळते हे गुलाब जास्त करून तुर्की देशात सापडते. गुलाबी गुलाब हे लाल गुलाबाप्रमाणेच दिसण्यात सुंदर व सुगंधित असते याचा उपयोग सुगंधित परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो.
गुलाबाचे फुल जेव्हा फुलते तेव्हा त्याच्या आजूबाजूला भुंगे आणि फुलपाखरे उडू लागतात. गुलाबाचा उपयोग भरपूर कार्यांसाठी केला जातो. पूजेत देवाला अर्पण करण्यासाठी गुलाब वापरले जाते. घरात व इतर ठिकाणी सजावटीसाठी गुलाबाचा उपयोग केला जातो. दक्षिणेकडील भागात गुलाबाची शेती केली जाते ज्यामुळे अनेक आर्थिक लाभ होतात. काही स्त्रिया सुंदरता वाढवण्यासाठी केसांमध्ये गुलाब लावतात. गुलाब पासून गुलाब जल, गुलकंद, अत्तर, शरबत, तेल इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो. गुलाबाचे फुल औषधी प्रमाणे कार्य करते, यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. दररोज गुलाब खाल्ल्याने टीबी चा रोग चांगला होतो. याशिवाय गुलाब सुंदरतेत देखील वृद्धी करतो.
जगभरात 22 सप्टेंबरला तर भारतात 7 फेब्रुवारीला रोज डे म्हणजेच 'गुलाब दिवस' साजरा केला जातो. आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आपल्या जॅकेट मध्ये गुलाबाचे फुल लावत असत. असे म्हटले जाते की पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडत असत. भारतात गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजा म्हटले जाते. अनेक सत्कार समारंभात गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले जाते. गुलाब सुंदर फुल असण्यासोबतच सुंगांधीत फुलही आहे, इत्यादी अनेक कारणांनी मला गुलाबाचे पुष्प आवडते व माझे आवडते फुल पुष्प गुलाब आहे.
समाप्त
विडियो पहा:तर मित्रांनो हा होता my favorite flower essay in marathi हा गुलाब फुल मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा. तुम्हाला गुलाब आवडते का? आणि का कमेन्ट करून नक्की कळवा.
गुलाब फुलावर लिहिलेला हा निबंध इयत्ता 1,2,3,4,5,6,7,8,9,10 साठी उपयुक्त आहे. या शिवाय या निबंधाला तुम्ही पुढील विषयांसाठी देखील वापरू शकतात.
- फुलांचा राजा गुलाब
- माझे आवडते फूल गुलाब
- गुलाब मराठी निबंध
- गुलाबाची वैशिष्टे